2021 वाटचाल यशपूर्तीकडे : भाग 6
एक पालक म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना त्यांचे ध्येय निश्चित करण्यास मदत करा या 3 स्टेप्स मधून ; एक स्वानुभव . ख्रिसमसची सुट्टी लागली आणि मुलगा हॉस्टेल वरून घरी आला . एक आठवडा झाला पाहत होते सारखा झोपायचा . पहिल्यांदा वाटलं ठीक आहे सुट्टी आहे , तिकडे त्यालाच सगळी कामे करावी लागतात . कंटाळला असेल , पण पाहिलं workout पण काहीच करत नाहीये . पूर्वी जिम ला जायचा किंवा मित्रांबरोबर टेनिस , रनिंग असे काही ना काही फिझिकल ऍक्टिव्हिटी असायची . पण आता covid मुळे जिम, मित्राबरोबर जाणे बंद. मग म्हटलं याच्याशी बोलावे आणि त्याच्याशी बोलले , त्याचा प्रॉब्लेम समजून घेतला आणि त्याचे ध्येय ठरवायलाही मदत केली . तुम्हालाही जर तुमच्या मुलांचे ध्येय ठरवायला त्यांची मदत करायची असेल तर हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा . मी अस्मिता खरात , Mission Study In America या हब ची Founder आणि USA Admission Facillitator . येत्या 5 वर्षात 1000 मुलांना अमेरिकेतील कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळवून देणे हा माझा ध्यास आहे ...