2021 वाटचाल यशपूर्तीकडे : भाग 5



 विद्यार्थ्यांच्या जीवनात आरोग्याचे महत्व जाणून घ्या या 5 गोष्टीतून . 


  2021 कडे वाटचाल करीत असताना नवीन वर्षासाठी संकल्प बनविण्याच्या दृष्टीने आधी आपली बेसिक कौशल्य कशी मजबूत करायची या दृष्टीने हा लेखन प्रपंच ! 

          विद्यार्थ्यांचे जीवन खूप स्ट्रेसफुल असते . शाळा, कॉलेज , क्लास यांच्या वेळा सांभाळण्याची कसरत , टेस्ट्स , सबमिशन्स, अभ्यास यात खूपदा खाण्यापिण्याकडे, आरोग्याकडे दुर्लक्ष होते. पण आपल्या ध्येयपुर्ती  कडे प्रवास करण्यासाठी शरीराचे आणि मनाचे आरोग्य उत्तम टिकवून ठेवणे आवश्यक आहे . खूपदा विद्यार्थ्यांना हि दगदग सहन होत नाही , आरोग्याच्या तक्रारी जाणवतात , कधी अभ्यास केलेला आठवत नाही, शारीरिक , मानसिक थकवा जाणवतो . तुम्हालाही हि लक्षणे जाणवत असतील तर हा ब्लॉग शेवट पर्यंत वाचा. काही छोट्या छोट्या गोष्टीतून कसे शरीराचे व मनाचे आरोग्य कसे राखावे याचे मार्गदर्शन या ब्लॉग मध्ये मी केले  आहे . 

मी अस्मिता खरात , Mission Study In America या हब ची Founder आणि USA Admission Facillitator . येत्या 5 वर्षात 1000 मुलांना अमेरिकेतील कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळवून देणे हा माझा ध्यास आहे 
         
         शालेय जीवन म्हटलं कि डोळ्यासमोर येतात अभ्यास  आणि खेळ . विद्यार्थ्यांना जर अभ्यास आणि खेळ या दोन्हीत प्राविण्य मिळवायचं असेल तर सगळ्यात बेसिक गोष्टीवर म्हणजे आरोग्यावर काम करणे आवश्यक आहे. 2021 कडे वाटचाल करण्या आधी विद्यार्थ्यांच्या जीवनात निरोगी आरोग्य  कसे प्रभावी ठरते हे पाहुयात आणि त्यासाठी काय करावे लागेल हे पाहुयात . 

 1. नाश्ता : 



       खूप जणांना सवय असते घाईघाईत सकाळी उठल्यावर नुसता चहा किंवा दुधाचा एक कप पिऊन  कॉलेजला जायचं. पण इतका थोडासा आहार पुरेसा आहे का लंच ची वेळ होई पर्यंत ? अर्थातच नाही. अर्ध्या एक तासातच भूक लागते अन लक्ष विचलित व्हायला  लागते . टीचर्स जे काही शिकवितात त्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मन फोकस्ड हवे . पण भूक लागल्याने लक्ष राहत नाही , ब्रेन मेमरी वर पण परिणाम होतो  . याचा अर्थातच परिणाम तुमच्या अभ्यासावर  होतो . 

       यासाठीच घराभाहेर पडण्या आधी पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. यामध्ये तुम्ही पारंपरिक नाश्ता , पोहे उपमा , दूध केली अंडी , सिरिअल्स फ्रुटस किंवा सरळ भाजी पोळी खाऊन घ्या . लंच च्या वेळे पर्यंत पोट आणि मन दोन्ही शांत राहायला हवे म्हणजे तुमचे लक्ष विचलित होणार नाही . 

2. प्रोटिन्स युक्त आहार : 



      विद्यार्थ्यांनी आहारात प्रोटीन जास्त घ्यायला हवे . खास करून जे विद्यार्थी स्पोर्ट्स खेळतात . त्यांना एक्सट्रा एनर्जी ची आवश्यकता असते . त्यासाठी आहारात भरपूर अंडी , दूध , प्रोटीन पावडर , नॉनव्हेज पदार्थ , ड्राय फ्रुटस याचा समावेश असावा . जर आहार पुरेसा  नसेल तर त्याचा परिणाम तुमच्या खेळावर होतो . खूपदा खेळात मागे पाडण्याचे कारण अपुरा आहार आहे हे लक्षात येत नाही .  त्यासाठी खेळाडूंनी प्रोटीन युक्त आहार घेतलाच पाहिजे . 

3. ड्राय फ्रुटस : 



      अक्रोड  , बदाम , खजूर , मनुका या सारखे ड्राय फ्रुटस ब्रेन मेमरी वाढविण्यात मदत करतात . तसेच स्ट्रेस दूर ठेवण्यास , स्टॅमिना , एनर्जी  वाढविण्यात मदत करतात . यासाठी विद्यार्थ्यांनी शक्य असेल तर रोज 4,5 बदाम , अक्रोड , मनुके खाण्याची सवय ठेवावी . 

 4. व्यायाम : 



      प्रत्येक विद्यार्थ्याने रोज किमान अर्धा तास तरी व्यायाम करण्याची सवय लावली पाहिजे . व्यायामाने शरीर हलके होते , स्नायू रिलॅक्स होतात. व्यायाम करताना बाहेर पडणाऱ्या घामा वाटे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि मनावरील ताण हलका होतो . व्यायाम करून ताजेतवाने झालेले मन पुन्हा अभ्यासासाठी तयार होते . व्यायाम म्हणजे अगदी जिमला जायला पाहिजे असे नाही तर धावणे , वॉकिंग, सूर्यनमस्कार , दोरीच्या उद्या मारणे असे सहजा सहजी करू शकणारे व्यायाम करावेत . 

5. मेडिटेशन : 



        शरीराबरोबरच मनाचे आरोग्य व्यवस्थित राखण्या साठी सकाळी अथवा झोपायच्या आधी किमान 15 मी. मेडिटेशन करावे. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटते मेडिटेशन म्हणजे खूप अवघड आणि वेळखाऊ गोष्ट . पण तसे नाही . मेडिटेशन साठी फक्त 15 मी. जरी शांत बसून तुमच्या श्वासांवर लक्ष दिले तरी मनाला आराम पडून स्ट्रेस कमी होतो . सेल्फ इंट्रोस्पेक्शन साठी मेडिटेशन करणे खूप महत्वाचे आहे. 

          तर अश्या प्रकारे 2021 मध्ये या छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष द्या व तुमचे शारीरिक , मानसिक आरोग्य स्वस्थ ठेवा . आपल्या ध्येयपूर्ती कडे जाण्यासाठी शारीरिक व मानसिक ताकद महत्वाची आहे. म्हणूनच काळजी घ्या , यश तुमचेच आहे ! 

          जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर like करा , share करा , कंमेंट करा . तुमचा अभिप्राय खूप महत्वाचा आहे . तुमचे काही प्रश्न असतील तर तेही कंमेंट बॉक्स मध्ये नोंदवा . या ब्लॉग खाली माझी youtube व कम्युनिटी ची लिंक देत आहे त्यावर क्लिक करून जॉईन व्हा . तेथे  तुम्हाला आणखीन रिसोर्सेस भेटतील .


https://youtu.be/PJIU8VXSKvc


https://www.facebook.com/groups/861601097705950/?ref=share

         तर भेटूयात पुढच्या भागात . धन्यवाद 🙏🏻


      


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अमेरिकेतील शिक्षण संधी : भाग 13

अमेरिकेतील शिक्षण संधी :12

अमेरिकेतील शिक्षण संधी : भाग 10