2021 वाटचाल यशपूर्तीकडे : भाग 3

 विद्यार्थ्यांच्या जीवनात फोकस थिंकिंग चे महत्व आणि ते कसे रुजवायचे जाणून घेऊयात या  7 गोष्टीतून. 



2021 कडे वाटचाल करीत असताना नवीन वर्षासाठी संकल्प बनविण्याच्या दृष्टीने आधी आपली बेसिक कौशल्य कशी मजबूत करायची या दृष्टीने हा लेखन प्रपंच ! मागील भागात  तुम्ही ध्येय ठरविण्यासाठी रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग चा कसा उपयोग होतो हे पहिले. तर या भागात विद्यार्थ्यांच्या जीवनात फोकस्ड थिंकिंग  किती महत्वाचे आहे हे पाहुयात .

अभ्यास करताना लक्ष विचलित होतंय ?  हवी तशी अभ्यासात प्रगती होत नाहीये ? विषय नीट समजत नाहीये ? अश्या जर तुमच्या समस्या असतील तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे . 

मी अस्मिता खरात , Mission Study In America या हब ची Founder आणि USA Admission Facillitator . येत्या 5 वर्षात 1000 मुलांना अमेरिकेतील कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळवून देणे हा माझा ध्यास आहे 

        या आणि अश्या अनेक समस्या अभ्यास करताना विद्यार्थ्यांना येतात  याचे कारण म्हणजे एकाच वेळी अनेक गोष्टी करणे . आजकाल मल्टिटास्किंग चा जमाना आहे . एकाच वेळेस अनेक गोष्टी विद्यार्थ्यांना करायच्या असतात . अभ्यास करताना म्युजिक पण ऐकायचे असते , फोन वर सर्फिंग पण चालू असते . असे असताना मग अभ्यासात मन एकाग्र कसे होणार . काही विषय खूप अवघड असतात , त्यासाठी पूर्ण मन एकाग्र केल्याशिवाय ते समजत नाहीत . यासाठीच फोकस्ड थिंकिंग आपल्यामध्ये रुजवणे आवश्यक असते

फोकस्ड थिंकिंग म्हणजे काय? 



    फोकस्ड थिंकिंग म्हणजे जेंव्हा आपण एका जागी शांत पणे काही काळासाठी मन एकाग्र करून  एखाद्या गोष्टीवर पूर्ण लक्ष केंद्रित करतो तेंव्हा आपण फोकस्ड विचार करत असतो . या स्किल मुळे तुम्हाला तुमची डायरेक्ट एनर्जी हि तुमच्या हव्या त्या स्पेसिफिक गोष्टीकडे वळवता येते. तुम्हाला त्या  प्रॉब्लेम बद्दल अजून स्पष्टता आणता येते आणि तुमच्या गोष्टी  अजून नेक्स्ट लेवल ला नेता येतात . 

         विद्यार्थ्यांसाठी फोकस्ड थिंकिंग मनात रुजवणे अतिशय फायदेशीर ठरते. एकाद्या विषयावर प्रभुत्व मिळविण्यासाठी विद्यार्थ्याला एकाग्रचित्ताने त्या विषयाचा अभ्यास करणे आवश्यक असते . अनेक कठीण विषय जसे maths , engineering यासाठी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन हवे असते , त्याशिवाय ते विषय समजत  नाहीत . यासाठीच फोकस्ड थिंकिंग मनात रुजावा. जो हे अंगिकारतो तो खूप लवकर यश मिळवितो आणि हवे ते ध्येय साध्य करतो . यासाठीच तुमच्या ध्येय प्राप्तीच्या दृष्टीने फोकस्ड थिंकिंग खूप महत्वाचे आहे . 

फोकस्ड थिंकिंग साध्य करण्यासाठी तुमच्या समोर काही चॅलेंजेस असतात त्यावर मात केली कि तुमच्यामध्ये फोकस्ड थिंकिंग येऊ शकते . 

फोकस्ड थिंकिंग साध्य करण्यासाठीचे 7 मार्ग : 

1. ध्येय ठरवा ( Set Goals ) - 



      सगळ्यात आधी ध्येय ठरविणे हे खूप महत्वाचे आहे . कारण जर तुमच्या कडे स्पष्ट स्पेसिफिक ध्येय नसेल तर तुम्ही फोकस कशावर करणार . त्यासाठी सर्वात आधी प्रथम  तुमचे ध्येय ठरवा . नक्की तुम्हाला काय हवे हे शोधून काढा . ध्येय कसे ठरवायचे यासाठी माझा आधीचा ब्लॉग वाचा . एक विद्यार्थी म्हणून तुमचे ध्येय पुढील प्रमाणे असू शकतात . जसे A + मिळवणे , रेप्युटेड कॉलेज मध्ये अथवा कोर्सला ऍडमिशन मिळविणे , SAT , TOEFL पास होणे इ . 

2. डिस्ट्रॅकशन्स काढून टाका ( Eliminate Distractions) - 



      ज्या गोष्टींतून तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळणार आहेत त्या गोष्टीवर फोकस करण्यासाठी सर्वात प्रथम तुमच्या समोरील डिस्ट्रॅकशन्स दूर करणे सर्वात महत्वाचे ठरते . सध्या विध्यार्थी हे फोन , सोशल मीडियाला ऍडिक्ट दिसतात . पण जर अभ्यासाच्या वेळेस फोन , इतर इलेक्ट्रॉनिक , सोशल मीडिया पासून दूर राहिलात तर अभ्यास फास्ट आणि नीट आकलन होण्यास मदत होते . 

3. अतिमहत्वाच्या गोष्टी सतत नजरेसमोर ठेवा (. keep items of focus in view) - 



ज्या आवश्यक गोष्टींवर फोकस करायचंय त्या महत्वाच्या गोष्टी सतत डोळ्यासमोर राहील असे ठेवा . त्या विषयाचे पुस्तक अथवा नोट वर तसे लिहून सतत ते डोळ्यासमोर येईल अश्या ठिकाणी ठेवा. म्हणजे सतत त्या गोष्टीवर आपल्याला फोकस करायचंय हे लक्षात राहील . 

4. वेळ काढा ( Make time)  



     मल्टिटास्किंग जरी आजकाल पॉप्युलर असलं तरीही फोकस्ड थिंकिंग ला ते उपयोगी नाही . फोकस्ड थिंकिंग साठी एक ठराविक शांत वेळ काढलाच पाहिजे .  विद्यार्थ्यांना दिवसातून कमीत कमी 2 ते 5 तास ठराविक वेळेत जसे पहाटे लवकर उठून व रात्री उशिरा शांत असा वेळ अभ्यासासाठी काढला पाहिजे . 

5. जागेची निवड ( quite place ) - 



       फोकस्ड थिंकिंग साठी शक्यतो रोज एकाच ठिकाणी बसून काम केल्याने त्या वातावरणाचा फायदा होतो . विद्यार्थ्यांनी शक्यतो स्टडी रूम अथवा आपल्या रूम मधील एकाद्या कोपऱ्यात स्टडी टेबल ठेवून तिथेच रोज अभ्यास केल्याने मन एकाग्र होण्याचा फायदा होतो . 

6. डिस्ट्रॅक्शन ची लिस्ट ( distraction To do list ) - 



    जरी आपण डिस्ट्रॅक्शन फ्री वातावरणात बसलो असलो तरीही कधी कधी आपले विचार आपल्याला त्रास देतात . जेंव्हा तुम्ही अभ्यासाला बसता तेंव्हा मधेच तुम्हाला काहीतरी आठवते . जसे कुणाला फोन करायचंय , ई-मेल महत्वाचा चेक करायचाय किंवा दुसऱ्याच एखाद्या विषया च्या होमवर्क बद्दल आठवेल . अश्यावेळेस आहे तो अभ्यास करायचं न थांबवता एका पेपर वर ज्या ज्या गोष्टीने डिस्ट्रॅक्शन होतंय त्या गोष्टी लिहून काढायच्या आणि जेंव्हा तुमचा त्या विषयाचा अभ्यास करून पूर्ण होईल त्या वेळेस त्या डिस्ट्रक्शन लिस्ट मधील गोष्टींवर ऍक्शन घ्यायची. 

7. प्रोग्रेस मोजा ( question progress ) - 



       वेळोवेळी आपण जे फोकस्ड थिंकिंग वापरून काम करतोय त्या  कामात आपला किती प्रोग्रेस झालाय हे चेक करणे आवश्यक आहे . त्यामुळे आपल्याला कळेल  कि प्रोग्रेस झाला आहे कि नाही . विद्यार्थ्यांना त्यांचे रिपोर्ट कार्ड पाहून त्यांच्या प्रोग्रेस बद्दल कळू शकते . जर दरवेळी मार्क्स मध्ये प्रोग्रेस होत असेलतर समाज  तुमचे फोकस्ड थिंकिंग काम करत आहे  . परंतु हवा तसा रिजल्ट येत नसेल तर स्वतःला प्रश्न विचारा  असे का होतेय, अजून काय बदल करायला हवा अभ्यास पद्धतीत  वा अभ्यासाचे तास वाढवायचे का. याप्रमाणे तुमचा प्रोग्रेस मोजायचा . 

         अशातर्हेने फोकस्ड थिंकिंग मुळे विद्याथ्यांना त्या त्या विषयात प्रभुत्व मिळविता येते व त्यांनी जे ध्येय ठरविले आहे ते साध्य होण्यास मदत  होते .  . 

       जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर like करा , share करा , कंमेंट करा . तुमचा अभिप्राय खूप महत्वाचा आहे . तुमचे काही प्रश्न असतील तर तेही कंमेंट बॉक्स मध्ये नोंदवा . या ब्लॉग खाली माझी youtube व कम्युनिटी ची लिंक देत आहे त्यावर क्लिक करून जॉईन व्हा . तेथे  तुम्हाला आणखीन रिसोर्सेस भेटतील . 

  https://youtu.be/PJIU8VXSKvc

https://www.facebook.com/groups/861601097705950/?ref=share

         तर भेटूयात पुढच्या भागात . धन्यवाद 🙏🏻

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अमेरिकेतील शिक्षण संधी : भाग 13

अमेरिकेतील शिक्षण संधी :12

अमेरिकेतील शिक्षण संधी : भाग 10