अमेरिकेतील शिक्षण संधी :12
हे 3 जॉब्स तुम्हाला अमेरिकेतील युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असताना चांगला आर्थिक मोबदला देतात . मागील भागात तुम्ही कॅम्पस जॉब्स बद्दल जाणून घेतलं होते . असेच अजून काही कॅम्पस जॉब्स जे तुम्हाला खूप छान आर्थिक फंड उपलब्ध करून देतात. ते कोणते हे तुम्हाला या भागात वाचायला मिळेल . तेंव्हा हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा . मी अस्मिता खरात , Mission Study In America या हब ची Founder आणि USA Admission Facillitator . येत्या 5 वर्षात 1000 मुलांना अमेरिकेतील कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळवून देणे हा माझा ध्यास आहे. ग्रॅजुएट कॉलेज मधील प्रोफेसर्स हे डॉक्टरेट असतात. त्यांच्याकडे बॅचलर्स तसेच मास्टर्स च्या स्टुडंट्स ला शिकविण्याचे काम असते . तसेच त्यांचे स्वतःचे किंवा कॉलेज प्रोजेक्ट साठी संशीधनाचे काम चालू असते. याच बरोबर टेस्ट पेपर सेटिंग, टेस्ट घेणे , ग्रेडिंग्स , लॅब्स प्रयोगासाठी प्रयोगशाळा तयार करणे अशी अनेक कामे असतात . त्यांना मदतीची गरज असते . यासाठी ते Teaching assistant, Research...