अमेरिकेतील शिक्षण संधी : 14
मेजर आणि मायनर म्हणजे काय ? माझी एक भाची अमेरिकेतील कॉलेज ऍडमिशन साठी तयारी करत होती . तेंव्हा तिला कॉलेज वेबसाईटवर मेजर मायनर यासारखे शब्द आढळले . ते म्हणजे नक्की काय समजून घेताना तिचा गोंधळ उडाला. अमेरिकेत कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतो तेंव्हा अनेक नवीन शब्द ऐकायला मिळतात . मेजर , मायनर , कॉन्सन्ट्रेशन . या शब्दांनी नक्कीच गोंधळ उडू शकतो . तर यांचा अर्थ , त्याचे फायदे काय ? असे अनेक प्रश्न तिच्यासारखेच तुम्हालाही पडू शकतात . तर या ब्लॉगमध्ये याबद्दल अधिक माहिती उलगडून दाखविली आहे . तेंव्हा हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा . मी अस्मिता खरात , Mission Study In America या हब ची Founder आणि USA Admission Facillitator . येत्या 5 वर्षात 1000 मुलांना अमेरिकेतील कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळवून देणे हा माझा ध्यास आहे. जेंव्हा कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळते , त्यावेळेस तुमची कॉलेज advisor बरोबर मीटिंग होते . या मीटिंग मध्ये तुम्हाला तुमचे मेजर, मायनर सिलेक्ट करायचे असतात. तर या टर्म्स काय आहेत हे आता पाहुयात . मेजर : ...