2021 वाटचाल यशपूर्तीकडे : भाग 5
विद्यार्थ्यांच्या जीवनात आरोग्याचे महत्व जाणून घ्या या 5 गोष्टीतून .
2021 कडे वाटचाल करीत असताना नवीन वर्षासाठी संकल्प बनविण्याच्या दृष्टीने आधी आपली बेसिक कौशल्य कशी मजबूत करायची या दृष्टीने हा लेखन प्रपंच !
1. नाश्ता :
खूप जणांना सवय असते घाईघाईत सकाळी उठल्यावर नुसता चहा किंवा दुधाचा एक कप पिऊन कॉलेजला जायचं. पण इतका थोडासा आहार पुरेसा आहे का लंच ची वेळ होई पर्यंत ? अर्थातच नाही. अर्ध्या एक तासातच भूक लागते अन लक्ष विचलित व्हायला लागते . टीचर्स जे काही शिकवितात त्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मन फोकस्ड हवे . पण भूक लागल्याने लक्ष राहत नाही , ब्रेन मेमरी वर पण परिणाम होतो . याचा अर्थातच परिणाम तुमच्या अभ्यासावर होतो .
यासाठीच घराभाहेर पडण्या आधी पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. यामध्ये तुम्ही पारंपरिक नाश्ता , पोहे उपमा , दूध केली अंडी , सिरिअल्स फ्रुटस किंवा सरळ भाजी पोळी खाऊन घ्या . लंच च्या वेळे पर्यंत पोट आणि मन दोन्ही शांत राहायला हवे म्हणजे तुमचे लक्ष विचलित होणार नाही .
2. प्रोटिन्स युक्त आहार :
विद्यार्थ्यांनी आहारात प्रोटीन जास्त घ्यायला हवे . खास करून जे विद्यार्थी स्पोर्ट्स खेळतात . त्यांना एक्सट्रा एनर्जी ची आवश्यकता असते . त्यासाठी आहारात भरपूर अंडी , दूध , प्रोटीन पावडर , नॉनव्हेज पदार्थ , ड्राय फ्रुटस याचा समावेश असावा . जर आहार पुरेसा नसेल तर त्याचा परिणाम तुमच्या खेळावर होतो . खूपदा खेळात मागे पाडण्याचे कारण अपुरा आहार आहे हे लक्षात येत नाही . त्यासाठी खेळाडूंनी प्रोटीन युक्त आहार घेतलाच पाहिजे .
3. ड्राय फ्रुटस :
अक्रोड , बदाम , खजूर , मनुका या सारखे ड्राय फ्रुटस ब्रेन मेमरी वाढविण्यात मदत करतात . तसेच स्ट्रेस दूर ठेवण्यास , स्टॅमिना , एनर्जी वाढविण्यात मदत करतात . यासाठी विद्यार्थ्यांनी शक्य असेल तर रोज 4,5 बदाम , अक्रोड , मनुके खाण्याची सवय ठेवावी .
4. व्यायाम :
प्रत्येक विद्यार्थ्याने रोज किमान अर्धा तास तरी व्यायाम करण्याची सवय लावली पाहिजे . व्यायामाने शरीर हलके होते , स्नायू रिलॅक्स होतात. व्यायाम करताना बाहेर पडणाऱ्या घामा वाटे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि मनावरील ताण हलका होतो . व्यायाम करून ताजेतवाने झालेले मन पुन्हा अभ्यासासाठी तयार होते . व्यायाम म्हणजे अगदी जिमला जायला पाहिजे असे नाही तर धावणे , वॉकिंग, सूर्यनमस्कार , दोरीच्या उद्या मारणे असे सहजा सहजी करू शकणारे व्यायाम करावेत .
5. मेडिटेशन :
शरीराबरोबरच मनाचे आरोग्य व्यवस्थित राखण्या साठी सकाळी अथवा झोपायच्या आधी किमान 15 मी. मेडिटेशन करावे. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटते मेडिटेशन म्हणजे खूप अवघड आणि वेळखाऊ गोष्ट . पण तसे नाही . मेडिटेशन साठी फक्त 15 मी. जरी शांत बसून तुमच्या श्वासांवर लक्ष दिले तरी मनाला आराम पडून स्ट्रेस कमी होतो . सेल्फ इंट्रोस्पेक्शन साठी मेडिटेशन करणे खूप महत्वाचे आहे.
तर अश्या प्रकारे 2021 मध्ये या छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष द्या व तुमचे शारीरिक , मानसिक आरोग्य स्वस्थ ठेवा . आपल्या ध्येयपूर्ती कडे जाण्यासाठी शारीरिक व मानसिक ताकद महत्वाची आहे. म्हणूनच काळजी घ्या , यश तुमचेच आहे !
जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर like करा , share करा , कंमेंट करा . तुमचा अभिप्राय खूप महत्वाचा आहे . तुमचे काही प्रश्न असतील तर तेही कंमेंट बॉक्स मध्ये नोंदवा . या ब्लॉग खाली माझी youtube व कम्युनिटी ची लिंक देत आहे त्यावर क्लिक करून जॉईन व्हा . तेथे तुम्हाला आणखीन रिसोर्सेस भेटतील .
https://www.facebook.com/groups/861601097705950/?ref=share
तर भेटूयात पुढच्या भागात . धन्यवाद 🙏🏻






आरोग्याचे महत्त्व खूप उपयुक्त टिप्स 👍🏻
उत्तर द्याहटवाथँक यु सुनीता
हटवा