अमेरिकेतील शिक्षण संधी :12
हे 3 जॉब्स तुम्हाला अमेरिकेतील युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असताना चांगला आर्थिक मोबदला देतात .
मागील भागात तुम्ही कॅम्पस जॉब्स बद्दल जाणून घेतलं होते . असेच अजून काही कॅम्पस जॉब्स जे तुम्हाला खूप छान आर्थिक फंड उपलब्ध करून देतात. ते कोणते हे तुम्हाला या भागात वाचायला मिळेल . तेंव्हा हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा .
मी अस्मिता खरात , Mission Study In America या हब ची Founder आणि USA Admission Facillitator . येत्या 5 वर्षात 1000 मुलांना अमेरिकेतील कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळवून देणे हा माझा ध्यास आहे.
ग्रॅजुएट कॉलेज मधील प्रोफेसर्स हे डॉक्टरेट असतात. त्यांच्याकडे बॅचलर्स तसेच मास्टर्स च्या स्टुडंट्स ला शिकविण्याचे काम असते . तसेच त्यांचे स्वतःचे किंवा कॉलेज प्रोजेक्ट साठी संशीधनाचे काम चालू असते. याच बरोबर टेस्ट पेपर सेटिंग, टेस्ट घेणे , ग्रेडिंग्स , लॅब्स प्रयोगासाठी प्रयोगशाळा तयार करणे अशी अनेक कामे असतात . त्यांना मदतीची गरज असते . यासाठी ते Teaching assistant, Research assistant, Graduate teaching assistant यांची मदत घेतात व त्यांना त्याबदल्यात भरपूर मोबदला दिला जातो .
टीचर असिस्टन्स (TA):
तुम्ही ज्या मेजर विषयात शिक्षण घेता त्या डिपार्टमेंट मध्ये तुम्हाला काम करण्याची संधी मिळते . बॅचलर डिग्री करणारे सिनिअर विद्यार्थी तसे ग्रॅजुएट करणाऱ्या विद्यार्थ्यांना हि संधी दिली जाते . ज्या स्टुडंट्सची लिहिणे आणि बोलण्यावर कमांड असते , सोशल असतात , ज्यांना शिकण्याची आणि शिकविण्याची आवड असते आणि जे आपल्या कोर्से मध्ये हाय GPA मिळवितात अश्याना हि संधी मिळते . यासाठी तुम्ही आधीच तुमच्या प्रोफेसर कडे याबद्दल सांगू शकता . तुमचे प्रोफेसर तुम्हाला पारखून , तुमची अकॅडेमिक प्रगती बघून तुम्हाला हि असिस्टन्सशिप देतात . साधारण $18 प्रत्येक तासासाठी म्हणजे महिन्याला 1500 ते 1800 $ एवढा हाय पे मिळतो. तुमच्या प्रोफेसर्सला जर तुमच्या बद्दल विश्वास बसला तर ते तुम्हाला हि संधी देतात. यात तुम्ही विद्यार्थ्यांच्या छोट्या ग्रुप ला शिकविणे , क्लास डिस्कशन , टेस्ट्स घेणे, ग्रेडिंग करणे अशी कामे करता . हा एक छान अनुभव असतो . फक्त हा तुमच्या रिज्युमेवर वर्क एक्सपेरियन्स म्हणून दाखविता येत नाही .
रिसर्च असिस्टन्स (RA):
तुम्ही ज्या डिपार्टमेंटमध्ये अभ्यास करताय त्या डिपार्टमेंटचे किंवा प्रोफेसर्सचे काही फंडेड प्रोजेक्ट्स चालू असतात . तेथे तुम्हाला असिस्टन्सशिप मिळू शकते . तुमच्या प्रोफेसर्सच्या रिसर्च वर लॅब मध्ये काम करणे , डेटा गोळा करणे , ऍनालाईझ करणे . यासारखी कामे करावी लागतात. प्रोजेक्ट जर मोठा असेल आणि चांगला फंड मिळत असेल तर तुमचं प्रोफेसर तुम्हाला तीनही सेमिस्टर साठी फी वेवर करू शकतो . शिवाय तुम्हाला एक्सट्रा क्रेडिट्स , हेल्थ इन्शुरन्स , स्टायपेंडही मिळतो . तसेच रिसर्च असिस्टन्स म्हणून केलेलं काम तुम्ही तुमच्या रिज्युमे मध्ये टाकू शकता . यासाठी तुम्हाला तुमच्या पहिल्या सेमिस्टर मध्ये खूप हार्डवर्क करावे लागेल , प्रोफेसर ला पटवून द्यावे लागेल कि तुम्ही ते करू शकता .
ग्रॅजुएट टीचिंग असिस्टंस :
हे कुठल्याही डिपार्टमेंट साठी काम करतात . ग्रॅजुएशनचा अभ्यास करता करताच तुम्हाला अंडर ग्रॅजुएट विद्यार्थ्यांना शिकविण्याची संधी मिळते . याच बरोबर युनिव्हर्सिटीमध्ये कुठल्याही डिपार्टमधे क्लेरिकल , टेक्निकल सपोर्ट म्हणून, स्टुडन्ट ऍडवायजर यासारखे जॉब्स मिळतात . या जॉब्स साठी तुम्हाला हाय पे मिळतो किंवा पूर्णतः , अंशतः ग्रॅजुएट फी माफ होते. फक्त हा अनुभव तुम्ही तुमच्या रिज्युमेवर वर्क एक्सपेरियन्स म्हणून टाकू शकत नाही . अश्या प्रकारचे पार्ट टाइम जॉब्स विद्यार्थ्यांना खूप चांगली आर्थिक मदत करतात .
जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर like करा , share करा , कंमेंट करा . तुमचा अभिप्राय खूप महत्वाचा आहे . तुमचे काही प्रश्न असतील तर तेही कंमेंट बॉक्स मध्ये नोंदवा . या ब्लॉग खाली माझी youtube व कम्युनिटी ची लिंक देत आहे त्यावर क्लिक करून जॉईन व्हा . तेथे तुम्हाला आणखीन रिसोर्सेस भेटतील .
https://www.facebook.com/groups/861601097705950/?ref=share
तर भेटूयात पुढच्या भागात .
धन्यवाद 🙏🏻



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा