अमेरिकेतील शिक्षण संधी : भाग 10
अमेरिकेतील कॉलेज मधील सेमिस्टर टर्म्स विषयी जाणून घ्या 5 गोष्टी या ब्लॉग मधून.
मी अस्मिता खरात , Mission Study In America या हब ची Founder आणि USA Admission Facillitator . येत्या 5 वर्षात 1000 मुलांना अमेरिकेतील कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळवून देणे हा माझा ध्यास आहे.
अमेरिकेतील सेमिस्टर सिस्टिम हि दोन सेशन्स मध्ये विभागलेली असते . प्रत्येक सेमिस्टर हे साधारणतः 15 आठवड्यांचे असते . प्रत्येकामध्ये 4 ते 6 classes घेऊ शकतात व दोन्ही च्या मध्ये समर आणि विंटर ब्रेक असतो . या बद्दल अधिक माहिती विस्ताराने जाणून घ्या .
1. Fall semester:
हे साधारणतः ऑगस्ट एन्ड किंवा सप्टेंबर च्या फर्स्ट वीक मध्ये सुरु होते व डिसेंबर 15 पर्यंत संपते . यात तुम्ही 4 ते 6 classes घेऊ शकता .
2. Spring semisters :
हे जानेवारी मध्ये सुरु होते ते मे पर्यंत चालते . यातही तुम्ही 4 ते 6 पर्यंत classes घेऊ शकता . जर तुमचं fall मध्ये ऍडमिशन नाही झालं तर स्प्रिंग मधे घेऊन कोर्से चालू करता येतो .
3. दोन वेळा ऍडमिशन होण्याची कारणे :
दरवर्षी हजारो स्टुडंट्स कॉलेजेस ला apply करतात त्यामुळे सगळ्याच मुलांना fall सेमिस्टर मध्ये सामावून घेणे कॉलेज ला शक्य नसते . मग उरलेल्याना स्प्रिंग मध्ये ऍडमिशन दिले जाते .
तर काही वेळा विद्यार्थ्यांना काही कारणानं मुळे fall सेमिस्टरला apply करणे शक्य होत नाही . कधी फॅमिली issues असतात, कधी हेल्थ समस्या , कुणाचा आर्थिक प्रॉब्लेम , तर कधी apply करायला उशीर होतो . अश्या काही कारणांमुळे ज्यांना fall मध्ये apply करणे शक्य होत नाही ते स्प्रिंग सेमिस्टर ला apply करतात .
4. Fall आणि Spring सेमिस्टरचे तुलनात्मक फायदे तोटे :
a. इंटरनॅशनल स्टुडंट्स ला ऍडमिशन च्या वेळेस खूपदा कागदपत्रांची पूर्तता करण्यास वेळ लागतो . त्यामुळे जर काही कारणाने फॉल मध्ये ऍडमिशन न झाल्यास स्प्रिंग मध्ये ऍडमिशन मिळते . त्यामुळे पूर्ण वर्ष वाया ना जाता कोर्से सुरु होतो .
b. इंटरनॅशनल स्टुडंट्स एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर जॉब करू शकतात . Teaching assistant आणि research assistant jobs वर्षभर मिळतात . पण समर जॉब्स करण्यासाठी फॉल मध्ये ऍडमिशन घेणार्यांना जास्त फायदा होतो . कारण फॉल पासून समर पर्यंत त्यांचे दोन सेमिस्टर्स पूर्ण होऊन एक वर्ष पूर्ण होते . त्यामुळे ते समर जॉब्स किंवा इंटर्नशिप करू शकतात. परंतु स्प्रिंग मध्ये ऍडमिशन घेतल्यास त्यांचे समर पर्यंत एकच सेमिस्टर पूर्ण होते आणि त्यांना समर इंटर्नशिप साठी पुढच्या समर पर्यंत थांबावे लागते . तसेच समर मध्ये तुम्ही fulltime काम करून तुमची कमाई सुरु करू शकतात . त्यामुळे इथे fall मध्ये ऍडमिशन घेणे फायद्याचे ठरते .
c. कॉलेजेस सगळे classes स्प्रिंग मध्ये उपलब्ध करत नाही . विध्यार्थी संख्येवर पण ते अवलंबून असते . त्यामुळे spring मध्ये ऍडमिशन घेतल्यास हवे ते classes तुम्हाला मिळतीलच असे नाही .
5. Summer सेमिस्टर :
अश्या तर्हेने दोन सेमिस्टर intake असण्याचे काही फायदे काही तोटे आहेत . तर तुमच्यासाठी काय महत्वाचे आहे त्यानुसार तुम्ही त्या वेळेस ऍडमिशन घ्यायचा निर्णय घ्या.
जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर like करा , share करा , कंमेंट करा . तुमचा अभिप्राय खूप महत्वाचा आहे . तुमचे काही प्रश्न असतील तर तेही कंमेंट बॉक्स मध्ये नोंदवा . या ब्लॉग खाली माझी youtube व कम्युनिटी ची लिंक देत आहे त्यावर क्लिक करून जॉईन व्हा . तेथे तुम्हाला आणखीन रिसोर्सेस भेटतील .
https://www.facebook.com/groups/861601097705950/?ref=share
तर मग भेटूयात पुढच्या भागात . धन्यवाद 🙏🏻




अतिशय महत्वपूर्ण आणि उपयुक्त ब्लॉग
उत्तर द्याहटवाThank you Sunita
हटवाMast
उत्तर द्याहटवाThank you 🙏🏻
हटवाअस्मिता मस्त लेख पूर्ण वाचला उपयुक्त आहे
उत्तर द्याहटवाThank you Maya
हटवापरदेशी जाणारे विद्यार्थी साठी खुप चागली माहीती! धन्यवाद
उत्तर द्याहटवाThank you dada 🙏🏻
हटवा