अमेरिकेतील शिक्षण संधी : भाग 8
अमेरिकेतील कम्युनिटी कॉलेज बद्दल जाणून घेऊया या 5 गोष्टी
अमेरिकेत शिक्षण घेणे आर्थिक दृष्ट्या परवडत नाही असा विचार करताय ? मोठ्या युनिव्हर्सिटी मध्ये ऍडमिशन घेण्याची भीती वाटतेय ? ट्युशन फी चा खर्च कसा कमी करता येईल ? स्कोर कमी आलाय तर ऍडमिशन मिळेल का ? असे प्रश्न जर तुम्हाला पडले असतील तर हा ब्लॉग शेवट पर्यंत नक्की वाचा.
मी अस्मिता खरात , Mission Study In America या हब ची Founder आणि USA Admission Facillitator . येत्या 5 वर्षात 1000 मुलांना अमेरिकेतील कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळवून देणे हा माझा ध्यास आहे .
आज या ब्लॉग मध्ये तुम्ही कम्युनिटी कॉलेज बद्दल जाणून घेणार आहेत. कम्युनिटी कॉलेज म्हणजे जसे आपल्या इकडचे ज्युनिअर कॉलेज किंवा डिप्लोमा कॉलेज हे 12 वि नंतर दोन वर्षाचे असते . कम्युनिटी कॉलेज मध्ये ऍडमिशन घेण्याचे अनेक फायदे आहेत ते आपण सविस्तर पाहुयात .
1. पैशाची बचत :
अमेरिकेतील कॉलेज मध्ये ऍडमिशन साठी भरमसाठ फीस असते . अर्थात तुम्ही scholarships, स्टुडन्ट लोन अथवा तिथे गेल्यावर जॉब्स करून हा खर्च भरून काढू शकता. परंतु तरीही तुम्हाला अगदी परवडणारा पैसे वाचविणारा खात्रीशीर पर्याय हवा असेल तर कम्युनिटी कॉलेज हा खूप छान पर्याय आहे .
तुमच्या 4 वर्षातल्या कॉलज मधील पहिली दोन वर्ष हि सर्वां साठी एकसारखीच असतात. तुम्ही कुठल्याही फील्ड मध्ये असला तरीही एकसारखेच classes असतात. उदा.इंग्लिश, US हिस्टरी किंवा civics , natural science मध्ये chemistry , biology व physics सारखे subjects, आणि कॉलेज मॅथ्स.
या बेसिक दोन वर्षातील कोर्सेस साठी मोठ्या कॉलेजेस मध्ये तुम्हाला एका कोर्से साठी जवळजवळ $1200 ते $1800 पर्यंत फीस द्यावी लागते , पण तोच कोर्से जर तुम्ही community कॉलेज मध्ये केलात तर फक्त $300 ते 700 पर्यंत फीस पडते . म्हणजेच जवळपास $1000 एक एका कोर्से मागे तुमचे वाचतात .
त्याशिवाय कम्युनिटी कॉलेज मधेही तुम्हाला scholarships मिळतात , त्यामुळे अजून एकंदरीत कमी खर्च लागतो . त्यामुळे डायरेक्ट 4 वर्षाच्या कॉलेज मध्ये ऍडमिशन घ्यायच्या ऐवजी जर तुम्ही पहिले दोन वर्ष कम्युनिटी कॉलेज मध्ये करून नंतर पुढील दोन वर्ष 4yr कॉलेज मध्ये ट्रान्सफर करून केलीत तर खूप economically फायद्याचे ठरते .
2. सहज सोपी ऍडमिशन प्रक्रिया :
अमेरिकेत कॉलेज ऍडमिशन साठी TOEFL आणि SAT किंवा ACT परीक्षांचा score आवश्यक असतो . पण बऱ्याच कम्युनिटी कॉलेज मध्ये त्याची आवश्यकता नसते . TOEFL ऐवजी कॉलेज स्टुडंट्स ना एक टेस्ट तिथेच घ्यायला लावते , त्यांची इंग्लिश proficiency टेस्ट करण्यासाठी. त्यानंतर ते आवश्यक असेल तर स्टुडंट्स ना ESL ( English as a secondary language) चा क्लास घ्यायला लावतात . ज्यामध्ये त्यांचे reading , writing आणि speaking चे स्किल सुधारलं जाते .
याचप्रमाणे SAT किंवा ACT च्या ऐवजी , कॉलेज placement टेस्ट ( college entry level test ) घ्यायला लागते . या टेस्ट मध्ये तुमचं इंग्लिश reading , writing आणि maths मधील प्रभुत्व टेस्ट करतात . काही कॉलेजेस SAT किंवा ACT चा लो स्कोर सुद्धा स्वीकारते. तसेच खूप महत्वाची गोष्ट म्हणजे बरेचश्या कम्युनिटी कॉलेज मध्ये open admission policy असते . म्हणजेच ते कोणालाही ऍडमिशन साठी अडवत नाही . जर तुम्ही apply केलत तर तुम्हाला ते ऍडमिशन देणाराच त्यामुळे ज्याचा स्कोर कमी आहे पण अमेरिकेत जाऊन शिक्षण घ्यायची तीव्र इच्छा आहे अश्यां साठी कॅम्युनिटी कॉलेज हा योग्य पर्याय आहे .
तसेच पॉप्युलर कॉलेज मधली ऍडमिशन साठी खूप स्पर्धा असते . , पण तेच ट्रान्सफर स्टुडन्ट साठी नसते . याचप्रमाणे 4yr ट्रॅडिशनल कॉलेज चे कम्युनिटी कॉलेज बरोबर पार्टेर्नरशीप असते . त्यामुळे जर तुमचे तुम्हाला हव्या त्या कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळाली नसेल आणि तुम्ही त्या कॉलेज शी संलग्न कम्युनिटी कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतले तर दोन वर्षानंतर आपोआप 4yr कॉलेज मध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळते आणि तुम्हाला हव्या त्या कॉलेज मधून डिग्री घेण्याचे स्वप्न पूर्ण होते .
3. तुमची ट्रान्सक्रिप्ट upgrade करायची संधी :
कॉलज scholarship मुळे तुमचा खुपसा आर्थिक भार कमी होतो . scholarship मिळण्यासाठी तुमचा GPA चांगला हवा . GPAचांगला नसेल तर अर्थातच scholorship कमी मिळते , तुम्हाला हव्या त्या कॉलेज ला ऍडमिशन मिळत नाही .
परंतु जर तुम्ही कम्युनिटी कॉलेज ला ऍडमिशन घेतलंत तर या बाबतीत फायदा होऊ शकतो . कम्युनिटी कॉलेजेस हे छोटे असल्याने क्लासरूम मधील विध्यार्थी संख्या खूप कमी असते त्यामुळे प्रोफेसर्स हि तुमच्या कडे वैयक्तिक लक्ष देतात . त्यामुळे प्रत्येक क्लास मध्ये तुम्हाला A grade मिळू शकतो . अश्या तर्हेने तुम्हाला तुमचे transcript खूप पॉवरफुल बनवता येते आणि दोन वर्ष कम्युनिटी कॉलेज पूर्ण केल्यानंतर तिसऱ्या वर्षी तुम्ही 4yr कॉलेज ला जुनिअर इयर मध्ये हव्या त्या नामांकित कॉलेज मध्ये ऍडमिशन घेऊ शकता . त्यावेळेस कॉम्पिटिशन सुद्धा कमी असते . तसेच हे ट्रान्सक्रिप्ट वापरून तुम्ही scholarships साठी पण स्वीकृत होऊ शकता .
4. लवचिकता :
नुकतेच highschool मधून graduate झालेल्या मुलं साठी कम्युनिटी कॉलेज खूप फायद्याचे ठरते . ग्रॅजुएट झाल्यानंतर त्यांची या वयात पर्सनल ग्रोथ होत असते .. त्यांच्या आवडी निवडी बदलत असतात . अश्या वेळेस आहे तो मेजर बदलून दुसरा घेण्याकडे कल असतो . आणि जर तुम्ही टॉपच्या कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतलेले असेल आणि मेजर बदलला वरील प्रमाणे तर तुमच्या वेळेचे तसेच पैशाचे नुकसान होते . कारण बरेचसे subjects हे नवीन मेजर बदलून घेतल्यास , तिथे काउन्ट होत नाहीत . म्हणजेच त्या कोसेर्स साठी तुम्ही जे काही पैसे इन्व्हेस्ट केले होते ते वाया जातात . पण तोच निर्णय तुम्ही कम्युनिटी कॉलेज मध्ये सहजतेने घेऊन शकता , कारण फीस कमी असल्याने नुकसान कमी होते. तसेच या दोन वर्षात तुम्हाला खरंच काय कॅरियर करायचे आहे त्याचा शोध घेऊ शकता . वेगवेगळे कोर्सेस एक्सप्लोर करू शकता .
5 . आणखी काही फायदे :
इंटरनॅशनल स्टुडंट्स जे कम्युनिटी कॉलेज मधून अमेरिकेत शिक्षण सुरु करतात , त्यांना OPT time ( optional practical training) साठी जे युनिव्हर्सिटी मधून शिक्षण सुरु करतात त्यांच्या पेक्षा जास्त वेळ करण्याची परवानगी दिली जाते . OPT म्हणजे तुम्ही ज्या फील्ड मध्ये स्टडी करतात त्यात प्रॅक्टिकल ट्रैनिंग घ्यायची संधी . हे ट्रैनिंग पेड असते . म्हणजेच तुम्हाला पुढील शिक्षणासाठी पैसे कमवायची संधी मिळते आणि काम करण्याचा अनुभवही .
तसेच कम्युनिटी कॉलेज चे क्लास साईझ हि युनिव्हर्सिटीतील क्लासरूम पेक्षा छोटी असते . एका क्लास मध्ये फक्त 15 ते 20 मुले असतात . त्यामुळे प्रोफेसर्स , इतर स्टुडंट्स बरोबर तुमचे बॉण्डिंग बनते . त्यांच्या कडुन तुम्हाला योग्य तो प्रोफेशनल गायडन्स , मदत , आधार मिळू शकतो . तसेच मोठ्या कॉलेज ला गेल्यावर होणार गोंधळेपणा, भीती येथे नसते त्यामुळे नवीन देशात अड्जस्ट व्हायला मदत हिते .
अश्या तऱ्हेने सुरवातीचे दोन वर्ष कम्युनिटी कॉलेज मध्ये ऍडमिशन घेणे फायदेशीर ठरते .
जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा , शेयर करा. आणि कंमेंट मध्ये तुमचे मत नोंदवा . तुमचे काही प्रश्न असतील तर तेही कंमेंट बॉक्स मध्ये नोंदवा . या ब्लॉग खाली माझी youtube व कम्युनिटी ची लिंक देत आहे त्यावर क्लिक करून जॉईन व्हा . तेथे तुम्हाला आणखीन रिसोर्सेस भेटतील .
https://www.facebook.com/groups/861601097705950/?ref=share
तर भेटूयात पुढील भागात . धन्यवाद 🙏🏻





Khoopach chhan mahiti Asmita mam great
उत्तर द्याहटवाThank you Sweta
हटवाAsmita kharch khupch chan lihila ahes blog images perfect
उत्तर द्याहटवाThank you Maya
हटवाKhupach chhan, excellent👍
उत्तर द्याहटवाThank you 🙏🏻
हटवाKhup useful information Asmita. Nicely written. Good images. Power to you Dear.
उत्तर द्याहटवाThank you Kirti
हटवाअस्मिता खूप महत्वाची माहिती तुझ्या ब्लॉग मध्ये आहे कारण आर्थिक चिंता आणि आर्थिक पाठबळ यामुळे मुलं अमेरिकेत शिक्षणासाठी जाऊ शकत नाहीत पण ह्या ब्लॉग मध्ये तू खूपच महत्त्वाचा मुद्दा आणि मुलांच्या फायद्याचा लिहिला आहेस त्यामुळे त्यांचं अमेरिकेत जाण्याचे स्वप्न आणि शिक्षणाच्या संधी त्यांना सहज उपलब्ध होतील धन्यवाद
उत्तर द्याहटवाखूप छान अस्मिता खूप छान लेख आहे हा आजच्या पिढीसाठी फार उपयुक्त आहे सगळ्यांनी याचा फायदा करून घ्यावा
उत्तर द्याहटवाधन्यवाद...!
खूप छान अस्मिता खूप छान लेख आहे हा आजच्या पिढीसाठी फार उपयुक्त आहे सगळ्यांनी याचा फायदा करून घ्यावा
उत्तर द्याहटवाधन्यवाद...!
खूप छान अस्मिता खूप छान लेख आहे हा आजच्या पिढीसाठी फार उपयुक्त आहे सगळ्यांनी याचा फायदा करून घ्यावा
उत्तर द्याहटवाधन्यवाद...!
Thank you
हटवाखूप छान अस्मिता तू तुझ्या ब्लॉगमधून खरंच आपल्या मुलांसाठी छान मार्गदर्शन करते.
उत्तर द्याहटवाKeep it up.
Thank you Kalpana
हटवावा, खूपच सुंदर काम करत आहेस अस्मिता ताई तू
उत्तर द्याहटवाकिती सोप्या शब्दात सांगतेस सर्व
थँक यु उचित मॅडम
हटवा