2021 वाटचाल यशपूर्तीकडे : भाग 6
एक पालक म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना त्यांचे ध्येय निश्चित करण्यास मदत करा या 3 स्टेप्स मधून ; एक स्वानुभव .
मी अस्मिता खरात , Mission Study In America या हब ची Founder आणि USA Admission Facillitator . येत्या 5 वर्षात 1000 मुलांना अमेरिकेतील कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळवून देणे हा माझा ध्यास आहे
मूल जेंव्हा जन्माला येते तेंव्हा नकळत आपण त्यांना एक प्रॉमिस देतो सतत त्याच्या पाठीशी राहण्याचे . पण काळाच्या ओघात मुले जसजशी मोठी होतात हे प्रॉमिस कुठेतरी हरवून जाते . एक अंतर वाढते आपल्यात आणि मुलामध्ये. पण एक पालक म्हणून आपण आपल्या मुलांसाठी सतत एक मार्गदर्शकाची भूमिका बजावली पाहिजे . पण त्या मध्ये अधिकारवानी नको , तर एक मैत्रीपूर्ण संवाद हवा. ज्यात तुम्ही मुलांच्या बरोबर बसून त्यांचे प्रॉब्लेम सोडविण्यात एक अर्थपूर्ण चर्चा करून सोलुशन काढाल . तर हे कसे करायचे हे आता पाहुयात .
1. मुलांचे निरीक्षण करा आणि त्यांच्याशी बोला :
मुले छोटी असो वा मोठी त्यांचे सतत त्यांच्या नकळत निरीक्षण करा . जर काही बदल जाणवत असेल त्यांच्या वागणुकीत तर त्याकडे दुर्लक्ष करू नका . त्यांना मदतीची गरज असू शकते . मोकळे पणाने शांतपणे त्यांच्याशी संवाद साधा . त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते समजून घ्या. मी जेंव्हा माझ्या मुलाशी बोलले तेंव्हा समजलं कि online studies त्याला आवडत नाहिये. कोर्सेस हार्ड असल्याने त्याला जी हेल्प हवी आहे ती मिळत नाहीये . जेणेकरून त्याचा GPA थोडा डाउन झाला होता व त्याला नैराश्य जाणवत होते . कोर्से मधला इंटरेस्ट पण कमी व्हायला लागला होता . Physical ऍक्टिव्हिटी पण करत नसल्याने एक सुस्तपणा आला होता . तर यातून त्याला बाहेर काढून परत त्याला ट्रॅक वर न्यायचं होते.
जेंव्हा अश्या पद्धतीने आपण बोलतो तेंव्हा निश्चितच मुले आपल्याशी त्यांचे प्रॉब्लेम्स share करतात .
2. काही प्रश्न विचारून त्यांचे ध्येय निश्चित करायला मदत करा :
खूपदा आपण नुसत्या सूचना देतो असे कर तसे कर . पण नुसत्या सूचना देऊन मुले त्यांच्या निर्णय पर्यंत पोहचत नाहीत . त्यासाठी त्यांच्या जवळ बसून शांत पणे काही प्रश्न विचारून विचार करायला भाग पाडा . मी माझ्या मुलाला काही प्रश्न लिहून एका कागदावर दिले आणि शांत पणे दोन तीन दिवस त्यावर विचार करून उत्तरे शोधायला लावली . असे केले तेंव्हा त्याला त्याचा मार्ग उलगडला . ते प्रश्न साधारण पाने असे होते
- असे तुला काय करायला आवडेल कि त्यातून तुला आनंद मिळेल ?
- असे काय केले म्हणजे तुला वाटते त्यातून तुला आर्थिक उत्पन्न तू जेवढे अपेक्षा करतो त्याप्रमाणे मिळेल. ?
- त्यासाठी तू घेतोय ते शिक्षण योग्य आहे का ? कि तुला आणखीन स्वतःला upgrade करावे लागेल ?
- तू ज्या जॉब चा अथवा करिअर चा विचार करतोस त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या requirements जेंव्हा तुझे शिक्षण पूर्ण होईल तेंव्हा तुझ्याकडे असतील का ? त्या requirements पूर्ण करण्यासाठी तुला आत्ता काय करावे लागेल ?
तर अश्या प्रकारचे प्रश्न विचारून आपण आपल्या मुलांना विचार करायला भाग पडून त्यांचे आताचे तसेच काही वर्षानंतरचे ध्येय ठरवायला एक पालक म्हणून मदत करू शकता .
त्याच प्रमाणे physical ऍक्टिव्हिटी साठी मी त्याला सांगितलं कि तू असे ध्येय ठेव कि दोन वर्षाने तू triathlon च्या बेसिक लेवल मध्ये भाग घेतोय . हे त्याला excercise करण्यासाठी सेल्फ motivate करण्यासाठी आवश्यक होते . मग आम्ही ठरविले कि त्याने रोज किती किलोमीटर running आणि सायकलिंग केले पाहिजे . आणि हे सगळं वर्क झालं .
तर तुम्हीही हे जरून पहा आणि तुमच्या मुलांच्या ध्येय निश्चितीत सहभागी व्हा अशातर्हेने. मला खात्री आहे तुमच्या मुलांना हे आवडेल आणि तुमच्यातला संवाद हि वाढेल .
3. त्यांना action घ्यायला लावा:
ध्येय ठरविल्यानंतर मुले त्या दृष्टीने actions घेत आहेत कि नाही ते पहा . नसेल तर त्यांना त्याची आठवण करून द्या . मी माझ्या मुलाला गोल बुक मध्ये गोल लिहायला लावली . नंतर त्याला to do list चे महत्व सांगून तो रोजच्या रोज लिहितोय कि नाही , तसेच रात्री त्यातील किती गोष्टी त्याने complete केल्या हे पाहायला सुरवात केली . मला सांगायला खूप आनंद होतोय कि त्याने तसे करण्यास सुरवात केली . आज तो रोज ठराविक किमी रनिंग आणि सायकलिंग करत आहे . त्याच प्रमाणे इतरही गोष्टीवर रोज to do list प्रमाणे actions घेण्यास सुरवात केली आहे .
तर अश्या प्रकारे तुम्हीही तुमच्या मुलांशी बोलून, त्यांचा विश्वास संपादन करत त्यांना त्यांचे ध्येय निश्चित करण्यास मदत करू शकता. या प्रक्रियेत तुमच्यातला संवादही वाढतो यापेक्षा आनंदाची गोस्ट ती कुठली ! तर चला मग 2021 साठी एक नव्याने पाऊल उचलूयात .
जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर like करा , share करा , कंमेंट करा . तुमचा अभिप्राय खूप महत्वाचा आहे . तुमचे काही प्रश्न असतील तर तेही कंमेंट बॉक्स मध्ये नोंदवा . या ब्लॉग खाली माझी youtube व कम्युनिटी ची लिंक देत आहे त्यावर क्लिक करून जॉईन व्हा . तेथे तुम्हाला आणखीन रिसोर्सेस भेटतील .
https://www.facebook.com/groups/861601097705950/?ref=share
तर भेटूयात पुढच्या भागात . धन्यवाद 🙏🏻




Chan
उत्तर द्याहटवाThank you 🙏🏻
हटवा