2021 वाटचाल यशपूर्तीकडे : भाग 4

 विद्यार्थ्यांनो या 5 प्रकारे स्वतः मध्ये स्वयंशिस्त रुजावा 

      2021 कडे वाटचाल करीत असताना नवीन वर्षासाठी संकल्प बनविण्याच्या दृष्टीने आधी आपली बेसिक कौशल्य कशी मजबूत करायची या दृष्टीने हा लेखन प्रपंच ! 

  विद्यार्थ्यांचे रोजचे आयुष्य हे खूप धावपळीचे असते . रोजचे शैक्षणिक वेळापत्रक , classes , सबमिशन्स, एक्सट्रा स्टडीज . तेव्हा वेळेचे गणित सांभाळणे खूप आवश्यक असते . पण जर तुम्हाला हे वेळेचे व्यवस्थापन नीट जमत नसेल , जर तुम्ही सबमिशन्स , टेस्ट जधी आहे हे विसरत असाल, तुम्हाला अभ्यासाला वेळ मिळत नाहीये असे वाटेत असेल तर हा ब्लॉग शेवट पर्यंत वाचा .

मी अस्मिता खरात , Mission Study In America या हब ची Founder आणि USA Admission Facillitator . येत्या 5 वर्षात 1000 मुलांना अमेरिकेतील कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळवून देणे हा माझा ध्यास आहे 

  अयशस्वी आणि यशस्वी व्यक्तीं मध्ये दोन गोष्टींचा फरक असतो एक मेहनत आणि दुसरी स्वयंशिस्त ! एक विद्यार्थी म्हणून आपल्या शैक्षणिक जीवनात यशस्वी ठरण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला मेहनीतीच्या जोडीला स्वयंशिस्त लावून घेणे खूप फायद्याचे ठरते. हि स्वयंशिस्त त्याला अनेक प्रकारे फायद्याची ठरते . पुढील 5 प्रकारे तुम्ही स्वतःला शिस्त  लावू शकता .  

1.  ऑर्गनाईज्ड रहा :



                 एक विद्यार्थी म्हणून तुम्ही प्रत्येक बाबतीत जर तुम्ही ऑर्गनाईज्ड राहिलात तर वेळ वाचविण्यास खूप मदत होते. आपली स्टडी बुक्स आणि इतर सामान तुमच्या रोजच्या अभ्यासाच्या जागेवर ठेवा. रोजच्या वेळापत्रका प्रमाणे  बॅग भरा. म्हणजे गोष्टी वेळच्या वेळेस सापडतील . प्रत्येक गोष्टीत व्यवस्थितपणा , आटोपशीरपणा असला कि कामे सुरळीत होतात . 

2. अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा आणि त्याला चिकटून राहा : 



         अभ्यासासाठी एक ठराविक वेळापत्रक तयार करा. रोज किती तास अभ्यास  करणार , कुठे बसून करणार , कुठल्या वेळेस करणार हे नियमित असले पाहिजे . म्हणजे त्या गोष्टीची सवय होते व अभ्यासाला हुरूप येतो . काही जणांना पहाटे लवकर उठून अभ्यास केलेला लक्षात राहतो तर काही जणांना उशिरा रात्री जागून अभ्यास करण्याची सवय असते . तर आपला हा prime time शोधून काढा ज्या वेळेस तुम्ही पूर्ण  कॉन्सन्ट्रेशन देऊन अभ्यास कराल . रोज किती तास. म्हणजे 2 तास , 4 तास असे फिक्स ठरवून रोज तितकाच वेळ अभ्यासाला बसलं पाहिजे . तसेच रोज एकाच ठिकाणी बसून अभ्यास करायची सवय असली कि अभ्यास  करायला हुरूप येतो व तुम्ही तुमच्या ध्येयाला चिटकून राहता. 

3. नोट्स काढा : 


 

          रोजच्या रोज क्लास मध्ये टीचर शिकवत असताना किंवा lecture झाल्यावर त्या विषयाची नोट्स काढा . पुस्तके वाचतानाही महत्वाच्या पॉईंट चे नोट्स काढा . असे केल्याने ऐनवेळेस परीक्षेच्या वेळेस ताण येणार नाही . तसेच हे नोट्स रोजच्या रोज वाचण्याची सवय लावा . 

4. प्लॅनर वापरा : 



      प्लॅनर  वापरण्याचा खूप फायदा होतो . प्लॅनर मध्ये आधीच सगळ्या गोष्टी नोंद करून ठेवायच्या म्हणजे विसर पडत नाही . तुमच्या महत्वाच्या टेस्ट्स, submissions च्या तारखा , इतर काही ऍक्टिव्हिटीज याच्या नोंदी प्लॅनर मध्ये आधीच लिहून ठेवायच्या . इतकंच  काय  रोज सकाळी उठल्यावर काय काय करायचे आहे ती to do list सुद्धा यात लिहिली कि गोष्टी खूप सोप्या होतात . रोज प्लॅनर मधील गोष्टींचा आढावा घेतला कि त्या गोष्टी वेळच्या वेळी करणे सोपे जाते व ऐन वेळी येणार तणाव , धावपळ वाचते . 

5. सोशल मीडियाचा वापर ठराविक वेळेतच करा : 



          आज काल अँडॉईड फोन्स , कॉम्प्युटर्स सर्वांकडे असतात त्यामुळे सोशल मीडियाचा वापरही वाढला आहे . खूप जण त्याच्या आहारी जातात आणि स्वतःचे शैक्षणिक नुकसान करतात . सोशल मीडिया पूर्ण वाईट आहे असे नाही , त्याचा योग्य वापर करता येतो . पण त्यासाठी स्वतःवर काही बंधने घाला . जसे ठराविक वेळेत आणि ठराविक कालावधीसाठी त्याचा वापर करायचा. उदा . असे  ठरवायचं कि दिवसातून दोन वेळेसच  सकाळ संद्याकाळी फक्त 15 मी. साठीच चेक करणार . आवश्यक त्या गोष्टीच पाहणार . यामुळे अति वापरावर आळा बसतो , वेळ वाचतो आणि तो वेळ तुम्ही महत्वाच्या  गोष्टी करण्यासाठी वापरू शकता. 

        तर या अतिशय बेसिक अश्या सवयी  आहेत पण त्या जर तुम्ही लावून घेतल्या तर तुम्ही एक अतिशय शिस्तप्रिय विद्यार्थी होऊन तुमच्या ध्येयप्राप्तीकडे वाटचाल कराल . 


जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर like करा , share करा , कंमेंट करा . तुमचा अभिप्राय खूप महत्वाचा आहे . तुमचे काही प्रश्न असतील तर तेही कंमेंट बॉक्स मध्ये नोंदवा . या ब्लॉग खाली माझी youtube व कम्युनिटी ची लिंक देत आहे त्यावर क्लिक करून जॉईन व्हा . तेथे  तुम्हाला आणखीन रिसोर्सेस भेटतील . 



https://youtu.be/PJIU8VXSKvc

https://www.facebook.com/groups/861601097705950/?ref=share


    तर भेटूयात पुढच्या भागात . धन्यवाद 🙏🏻              


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अमेरिकेतील शिक्षण संधी : भाग 13

अमेरिकेतील शिक्षण संधी :12

अमेरिकेतील शिक्षण संधी : भाग 10