2021 वाटचाल यशपूर्तीकडे : भाग 1

आपलं ध्येय नेमकं काय आहे आणि ते कसं ठरवायचं  जाणून घ्या या 5 गोष्टीं मधून


 

           जसजसं नवीन वर्ष जवळ येऊ लागतं तसतसे डोक्यात अनेक संकल्पना जन्म घेतात . जाणाऱ्या वर्षाचा जमाखर्च मांडला जातो . खरं  तर 2020 मध्ये अश्या काही गोष्टी घडल्या कि कित्येक शतकात अश्या घडल्या नसतील . जितके धक्के बसले तितक्या नवीन संकल्पनाही जन्माला आल्या . असो! हा आजच्या ब्लॉग चा विषय नाही . तर दरवर्षी आपण अनेक संकल्प बनवतो पण थोड्याच दिवसात आपले संकल्प गळून  पडतात . कारण आपण डायरेक्ट संकल्पना मांडतो ,  पण त्या संकल्पनांच्या  पायावर कामच करीत नाही . तर आजचा माझा प्रयत्न त्या दृष्टीनेच .या बेसिक गोष्टीवर जर तुम्ही काम केलेत तर नक्कीच तुमचे संकल्प यशस्वी होतील .  मी विद्यार्थ्यांसाठी काम करते तर या विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेऊनच हा  लेख प्रपंच! 



  तुम्ही आता शिक्षण घेताय पण ज्या क्षेत्रात ते घेताय ते तुम्हाला आवडत नाहीये असे तुम्हाला वाटतंय का ? एक विद्यार्थी म्हणून तुम्ही खूप गोंधळलेल्या मनस्थिती मध्ये आहेत का ? तुमचे डिग्री शिक्षण घेतल्या नंतर तुम्ही काय करणार आहेत हे चित्र तुम्हाला अजूनही अस्पष्ट आहे का ? तुम्ही अजूनही आयुष्यात चाचपडत आहेत असे वाटतेय का ? यातील मनस्थितीतून जर तुम्ही जात असाल तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे . 

                  मी अस्मिता खरात Mission Study In America या हब ची founder आणि USA Admission Facilitator. येत्या 5 वर्षात 1000 मुलांना अमेरिकेतील कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळवून देण्यास मदत करणे हा माझा ध्यास आहे . 

          बरेचदा विद्यार्थी एखाद्या कोर्से मध्ये ऍडमिशन घेतात पण नंतर त्यांना वाटत हे क्षेत्र त्यांच्या साठी नाही आहे . उगीच नाईलाज म्हणून ते पुढे शिकत राहतात . या मागे अनेक कारणे  असतात . त्यापैकी एक म्हणजे पिअर प्रेशर . कोणीतरी मित्राने , भावाने घेतलं म्हणून त्या फील्ड मधेच ऍडमिशन घेतात किंवा पालकांनी सांगितलं म्हणून घेतात किंवा स्वतःच्याच  इच्छेने घेतात पण त्यावेळी मानसिकता नसल्याने मन बदलते व त्या विषयात इंटरेस्ट राहत नाही .अश्या गोंधळलेल्या मनस्थिती मुळे वर्ष वाया जाण्याचा , अभ्यासात  अधोगती होण्याचे तसेच मानसिक खच्चीकरण होण्याचा धोका असतो .  त्यासाठी सर्वात प्रथम आपले ध्येय काय आहे हे शोधून काढणे महत्वाचे ठरते . ते कसे करायचे ते आता आपण या लेखात पाहुयात . 

1. आत्मपरीक्षण करणे ( self introspection): 

 



     सगळ्यात आधी आपल्याला नक्की काय हवे हे पाहणे आवश्यक ठरते . त्यासाठी शांत बसून मनामध्ये डोकावणे आवश्यक आहे . आपल्याला काय नकोय हे पाहिलंत  तर आपल्याला काय हवंय  हे सापडत जाते . आपल्याला कुठल्या गोष्टी करण्यात आनंद मिळतो हे शोधले आणि त्याच्याशी निगडित करिअर ऑपशन्स शोधले तर आपले शिक्षण सुद्धा आपण एन्जॉय करू शकतो . तर हा शोध घेणे खूप महत्वाचे आहे आणि हा शोध आत्मपरीक्षणानेच लागेल . 


2. ध्येय ठरवा ( set goals) : 

     


        ध्येय कसे ठरवणार ? ध्येय म्हणजे ते जे तुमच्यासाठी सर्वात महत्वाचे आहे , जे तुम्हाला प्रेरित करते काम करण्यासाठी , जे केल्यानंतर काहीतरी मिळणार असते आणि जे तुम्हाला तुमच्या भविष्याचे मोठे चित्र दाखवेल . 

      असे करण्यासाठी आधी स्वतःला प्रश्न विचारा . तुमच्या का चे उत्तर शोधा. तुम्हाला तुमच्या आयुष्याकडून काय हवंय , आता काय हवंय  , एखाद वर्षाने काय हवंय  किंवा आणखी काही काय वर्षाने हवंय  हे स्पष्ट करा आणि आपले ध्येय  ठरवा . असे ध्येय जेंव्हा तुम्ही ठरवता तेंव्हा ती तुमच्या आयुष्याची सर्वाधिक महत्वाची गोष्ट ठरते . ती करण्यासाठी तुम्ही झपाटून जाता . 

     खास करून विद्यार्थ्यांना स्पष्टपणे माहित हवे कि त्यांना नक्की काय करायचंय . कारण आज ते जे शिक्षण घेत आहेत त्यावरच त्यांच्या भविष्याचा पाया  असतो . जे शिक्षण घेत आहेत ते आवडीचं हवे , त्यानंतर काय डिग्री मिळणार आहे , त्या डिग्री चा पुढील शिक्षणासाठी अथवा नोकरी , व्यवसाय मिळवण्यासाठी काय आणि कसा उपयोग होणार आहे हे स्पष्ट हवे . हे स्पष्ट चित्र असले कि तुम्ही जोमाने अभ्यास करत एक एक पायरी पुढे जाता . अन्यथा पूर्ण आयुष्य निरर्थकपणे जगण्याची वेळ येते . 

         

3. SMART ध्येय ठरवा : 


       येथे SMART म्हणजे फक्त हुशार नाही , तर SMART या शब्दातील प्रत्येक लेटर पासून एक एक वर्ड बनतो जो तुमच्या ध्येयाशी निगडित आहे . 

S- Specific:  तुमची ध्येयं हि निश्चित हवी . जे तुम्हाला स्पष्ट्पणे माहित हवे . तुम्हाला काय करायचंय हे स्पष्टपणे तुम्हाला माहित हवे . उदा.  बॅचलर ऑफ सायन्स , हे करताना तुम्हाला आधीच माहित हवे कि तुम्ही कुठल्या सब्जेक्ट मध्ये करणार आहात आणि त्यापुढील कुठल्या करिअर ऑपशन मध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे आधीच हे स्पष्ट हवे . 

M- Measurable: तुमची ध्येय हि तुम्हाला मोजता यायला हवी . म्हणजे इतक्या दिवसात इतकं उद्दिष्ट मिळायला हवे हे स्पष्ट हवे . किती आणि केंव्हा या दोन प्रश्नांच्या फूटपट्टीवर मोजता यायला हवे . आपल्याला आपला यश मोजता आले कि समजतं कि आपण आपल्या ध्येयाच्या दिशेने योग्य वाटचाल करत आहे .

 उदा . तुमचे रिपोर्ट कार्ड . प्रत्येक परीक्षेत मिळालेल्या मार्कांचे मूल्यमापन करून समजते तुमची प्रोग्रेस होतेय कि नाही . 

A- Set attainable goals : म्हणजे खूप आवाक्या बाहेरची गोल सेट करू नका . खूप अवघड ध्येय पण नको कि त्या पर्यंत पोहचायच्या आधीच आत्मविश्वास डळमळीत होऊन ध्येय पर्यंतचा प्रवास अर्धवट सोडून द्याल . स्वतःचे योग्य मूल्यमापन करून , स्वतःच्या क्षमता जोखून goals ठरवा . 

उदा . डायरेक्ट देशाचा पंतप्रधान होणार अथवा चंद्रावर जाणार अशी नकोत . 

R: Set Relevant goals : तुम्ही ज्यात तुमचे करिअर करणार आहेत त्याच्याशी निगडीतच goals ठरवा . तुमची छोटी छोटी उद्दिष्ट त्या दृष्टीने आखा . 

उदा. अमेरिकीतलं युनिव्हर्सिटी मध्ये उच्चशिक्षण घ्यायचाय मग त्या साठी GPA maintain ठेवणे , स्टँडर्डाइज्ड टेस्ट्स साठी तयारी करणे , त्या पास होणे इत्यादी . 

T : Set time bound goals : प्रत्येक गोल साठी एक निश्चित  deadline हवी . त्यामुळे तुम्हाला तुमची प्रगती ओळखता येते आणि तुमचे यश केंव्हा तुम्हाला सेलेब्रेट करता येईल हे तुम्हाला आधीच माहित असते .जेंव्हा अशी deadline असते तेंव्हा तुम्ही तुमचे सगळे प्रयत्न लावून त्यावर मेहनत करता आणि तुमच्या ध्येय लवकर मिळवता .  

उदा. साल 2021 मध्ये अमेरिकेतील युनिव्हर्सिटी मध्ये ऍडमिशन घेणे . 2023 मध्ये मास्टर्स पूर्ण  करून जॉब मिळवणे. असे timebound आणि मोजता येण्यासारखी ध्येय ठरवणे . 


4. ध्येय लिहून ठेवा: 



  ध्येय नेहमी लिहून ठेवावीत . नुसतं मनात  ठेवलं तर काळानुसार विसरली जाण्याची शक्यता असते . तेंव्हा एखाद्या वहीत अथवा छोट्या डायरीत, किंवा एखाद्या मोठ्या कागदावर लिहून ते स्पष्ट सतत समोर दिसेल अश्या ठिकाणी लावा . त्यातील भाषा हि भविष्य काळा पेक्षा वर्तमान काळ असावी . तसेच ध्येय हि नेहमी पेन्सिल ने लिहावी व त्यावर तारीख  टाकावी . म्हणजे जरी काही कारणामुळे त्या तारखे पर्यंत तुमचं ध्येय नाही पूर्ण झालं  तरी ते खोडून पुढची तारीख टाकावी . पण नाही झालं म्हणणं हिरमुसले न होता प्रयत्न सतत चालू ठेवावेत . 


5. ध्येयाकडे वाटचाल करा : 



        आता अश्या  प्रकारे ध्येय निश्चित झाल्यावर त्यासाठी योग्य तो action प्लॅन तयार करा . त्या ध्येय पूर्ती साठी नक्की काय काय करावं लागणार , काय गोष्टी लागणार या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन योग्य तो action plan करा . आपल्या ध्येयाकडे हळूहळू वाटचाल करा आणि आपले ध्येय साध्य करा . उदा. जर एखाद्या विद्यार्थ्याला GRE घ्यायचीय तर त्या परीक्षेची तारखा लक्षात ठेऊन , त्या संदर्भात पुस्तके , नोट्स तयार करून , रोज अथवा आठवड्याला किती तास अभ्यासाला द्यावी लागतील याचे calculation करून त्याप्रमाणे स्टडी प्लॅन बनवायचा आणि अभ्यास  करायचा . 

     हा ब्लॉग वाचल्यानंतर आता निश्चितच तुमची गोंधळली अवस्था दूर झाली असणार . तर चला मग आपापली ध्येय निश्चित करा आणि एका उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने  वाटचाल करा . यश तुमचेच आहे . 

जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर like करा , share करा , कंमेंट करा . तुमचा अभिप्राय खूप महत्वाचा आहे . तुमचे काही प्रश्न असतील तर तेही कंमेंट बॉक्स मध्ये नोंदवा . या ब्लॉग खाली माझी youtube व कम्युनिटी ची लिंक देत आहे त्यावर क्लिक करून जॉईन व्हा . तेथे  तुम्हाला आणखीन रिसोर्सेस भेटतील .


  https://youtu.be/PJIU8VXSKvc


https://www.facebook.com/groups/861601097705950/?ref=share


            तर भेटूयात पुढच्या भागात . धन्यवाद 🙏🏻



         

टिप्पण्या

  1. Very nice madam. Definately it will be useful to bring clarity in the minds of students and they will be SMART in setting goals too. Thx

    उत्तर द्याहटवा
  2. वा, अतिशय सुंदर ब्लॉग
    प्रत्येक विद्यार्थ्यांने या गोष्टींचा नक्कीच विचार करावा.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अमेरिकेतील शिक्षण संधी : भाग 13

अमेरिकेतील शिक्षण संधी :12

अमेरिकेतील शिक्षण संधी : भाग 10