अमेरिकेतील शिक्षणाच्या संधी : भाग 7
या दोन गोष्टी तुम्हाला अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी मिळणाऱ्या स्कॉलरशिप बद्दल माहिती देतील.
अमेरिकेतील शिक्षण संधी या सीरिजच्या सातव्या भागात तुमचे स्वागत आहे . मागील भागात तुम्ही कॉलेज अँप्लिकेशनसाठी लागणाऱ्या गोष्टी पहिल्या . आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि स्कॉलरशिप कशा असतात ? त्या कशा शोधायच्या ? यासगळ्याचे उत्तर तुम्हाला या भागात मिळणार आहे .
मी अस्मिता खरात Mission Study In America या हब ची founder आणि USA Facilitator. येत्या 5 वर्षात 1000 विद्यार्थ्यांना अमेरिकेतील विद्यापीठात ऍडमिशन मिळून देणे हा माझा ध्यास आहे .
तर या भागात आपण कुठकुठल्या scholarships उपलबध असतात आणि त्या कुठे शोधायच्या हे पाहुयात .
Types of scholarships :
1. Need based scholarships:
हि शिष्यवृत्ती मुख्यत्वा त्या विद्यर्थ्यांना दिली जाते ज्यांच्या फॅमिलीचे इनकम खूप कमी आहे आणि ज्यांच्याकडे उच्चशिक्षणासाठी काहीच फंडिंग उपलब्ध नसते . एक ठरविक उत्पन्न मर्यादेच्या आत उत्पन्न असणार्यांनाच हि संधी मिळू शकते. परंतु हि scholarship देताना विद्यार्थ्यांचा ऍकेडेमिक प्रोग्रेस पाहून दिली जाते .
2 Merit based scholarships:
हि scholarship निव्वळ मेरिट वर दिली जाते . यात फक्त academic नाही तर internship , शिकताना जर तुम्ही कुठल्या प्रोजेक्ट वर काम केले असेल तर , वर्क experience , पेपर्स किती पब्लिश झालेत , त्याची quality , इत्यादी पाहिलं जाते. तसेच समाजउपयोगी एकाद्या सामाजिक उपक्रमात असलेला तुमचा सहभाग. नुसते गुणच नाही तर अश्या अनेक गोष्टींचा विचार या scholarships साठी केला जातो.
3 Special scholarships for Indian Students :
जर विद्यार्थ्यांला एकाद्या special subject साठी स्टडी करायचा असेल तर या scholarships उपलब्ध असतात . उदा. एखादा स्पोर्ट्स त्यासाठी मिळते जशी टेनिस , फुटबॉल किंवा एखाद. मेडिकल फील्ड मधील specialization जसे ओरल कॅन्सर , डिसॅबिलिटी इत्यादी . खास करून PhD साठी दिली जाते.
Sources of scholarships:
या scholarships कुठून मिळतात व कोण देते हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचे हे उत्तर . हे पुढील रिसोर्सेस scholarships देतात.
1.The Government:
बहुतेक देशांचे सरकार बाहेरील देशातील विद्यार्थ्यांना scholarships देतात . त्याचप्रमाणे अमेरिका सरकारही भारतीय विद्यार्थ्यांना गुणवत्ते प्रमाणे शिष्यवृत्ती देते.
याच प्रमाणे आपले. भारतीय केंद्र सरकार तसेच राज्य सरकार देखील कमी उत्त्पन्न गटातील विध्यार्थ्यांना तसेच अनुसूचित जाती जमाती , आदिवासी समाजातील हुशार मुलांना भरगोस शिष्यवृत्ती देते .
2. Universities:
जास्त करून scholarships या विद्यापीठांकडून पुरवल्या जातात . जवळ जवळ सगळीच अमेरिकेतील युनिव्ह्ररसिटीज भारतीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पुरवतात . तुम्हाला तुम्ही जिथे ऍडमिशन घेणार आहेत त्या विद्यापीठांच्या इंटरनॅशनल स्टुडन्ट सेंटर शी कॉन्टॅक्ट साधून याची माहिती मिळवू शकता .
3. Big Corporate Companies:
जगभरातील मोठ्या कंपन्या उदा. Google , Facebook हे परदेशातून येऊन शिक्षण घेणाऱ्या मुलांना शिष्यवृत्ती पुरवतात . खासकरून अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात संशोधन करणाऱ्या मुलांना याचा लाभ मिळू शकतो .
4. Social organizations or trusts:
अनेक मोठे व्यावसायिक , सोशिअल वर्कर्स एकत्र येऊन ट्रस्ट उभा करतात आणि त्यातून परदेशात जाऊन शिक्षण घेऊ इच्छिणार्यांना शिष्यवृत्ती दिली
5. Philanthropist:
काही समाजसेवक , businessman स्वतः काही scholarships पुरवतात. त्या मिळवण्यासाठी प्रत्येकाचे काही निकष असतात .
आता तुम्हाला समजलं असेलच कि या scholarships कुठल्या असतात आणि कोण पुरवत . तरी सुद्धा योग्य त्या scholarships शोधणे हे खूप वेळखाऊ काम असते. पण मला खात्री आहे तुम्ही ते नक्की व्यवस्थित कराल .
जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर तो like करा, share करा आणि तुमचा अभिप्राय देखील नोंदवा . तुमचे काही प्रश्न असतील तर ते कंमेंट बॉक्स मध्ये नोंदवा . खाली माझी फेसबुकची लिंक देत देत आहे त्या वर क्लिक करून ग्रुप वर जॉईन व्हा . युट्युब ची लिंकही दिली आहे ते subscribe करा. तिथे तुम्हाला आणखी sources मिळतील .
तर भेटूया पुढच्या भागात ! धन्यवाद 🙏🏻









Very Important information
उत्तर द्याहटवाThank you Madhura
हटवावा
उत्तर द्याहटवाअप्रतिम,
उपयुक्त मार्गदर्शन मॅडम
Thank you
हटवाअस्मिता मॅडम खूपच सुरेख माहिती देता.
उत्तर द्याहटवाThank you 🙏🏻
हटवा