अमेरिकेतील शिक्षण संधी : भाग 6
या 5 गोष्टी अमेरिकेतील कॉलेज साठी अँप्लिकेशन भरताना उपयोगी ठरू शकतात .
अमेरिकेतील शिक्षण संधी या सीरिजच्या सहाव्या भागात तुमचे स्वागत आहे. मागील दोन भागात तुम्ही कॉलेज ऍडमिशन साठी काय काय रिक्वायरमेंट्स आहेत हे पाहिलं . आता तुम्ही कॉलेज अँप्लिकेशन भरायला सुरवात करायचा विचार करत असाल . पण तुम्हाला माहित आहे का कि कॉलेज अँप्लिकेशन मध्ये काय काय माहिती भरावी लागेल?कुठल्या गोष्टींची आधीच जमवाजमव करावी लागेल ? जर तुमचं उत्तर नाही असे असेल तर हा ब्लॉग शेवट पर्यंत वाचा .
जर तुम्हाला आधीच माहित असेल कि कॉलेज अँप्लिकेशन मध्ये काय काय माहिती भरावी लागेल आणि जर त्या गोष्टी तुमच्या हाताशी असतील तर तुमचा खूप वेळ , मनस्ताप वाचू शकतो आणि आवश्यक गोष्टींची आधीच जमवाजमव करून ठेवता येते. तर या 5 गोष्टी तुम्हाला कॉलेज अँप्लिकेशन मध्ये विचारू शकतात.
1. Select proper option :
सगळ्यात आधी तुम्हाला कशाला ऍडमिशन घ्यावयायचे आहे ते विचारातील , म्हणजे Undergradute Or Graduate असा ऑप्शन विचारतील. जर तुम्ही undergraduate निवडलात तर पुन्हा 4yr वर 2यर असा option येईल. पण जर तुम्ही graduate ऑप्शन निवडला तर पुन्हा Masters or doctorate असा ऑप्शन येईल . तेंव्हा योग्य तो पर्याय निवडा . तसेच International or Domestics असाही ऑप्शन असेल.
2. Biographical Information :
यात तुमची पर्सनल इन्फॉर्मशन विचारतील जसे नाव, पत्ता , ई-मेल , emergency contact नंबर, फॅमिली education बॅकग्राऊंड , race , religion यासारखी माहिती विचारली जाईल . तसेच तुमची recidential इन्फॉर्मशन जसे नॅशनॅलिटी , स्टेट पुरवावी लागते.
3.Educational Background :
या मध्ये तुमची शैक्षणिक माहिती विचारली जाते . तुमचे हायस्कूल , कॉलेज केले असेल याची इन्फॉर्मशन , म्हणजे कोणते ते कोणते इयर हायस्कूल किंवा कॉलेज मध्ये होता , त्यांचे परफेक्ट नाव , passout इयर , क्रेडिट अवर्स इत्यादी . तेंव्हा अँप्लिकेशन भरताना जवळ सर्टिफिकेट्स ठेऊन व्यवस्थित माहिती भरली पाहिजे . अन्यथा प्रोसेसिंगला वेळ लागून मनस्ताप होऊ शकतो .
तसेच तुमचे कॉलेज एंटरन्स टेस्टचे टेस्ट स्कोर उदा.SAT, ACT, GRE , TOEFL, IELTS यांची माहिती . म्हणजे कधी घेतली त्याचे डिटेल्स द्यावे लागतील.
4. Extracurricular and Volunteering
येथे तुम्हाला volunteer सर्विसेस चे hours . तसेच तुम्ही कुठल्या क्लब चे मेंबर असाल उदा. Maths क्लब , science क्लब तर त्यांची इन्फॉर्मशन . किती वर्ष केलेत ते , जर तुम्हाला काही अवॉर्ड्स , सर्टिफिकेट्स मिळाले असतील त्याचे डिटेल्स द्यावे लागतात.
तसेच जर तुम्ही kahi extracurricular ऍक्टिव्हिटीज करत असाल उदा. पैंटिंग, गायन , प्ले किंवा एकदा कुठलाही खेळ खेळत असाल जसे क्रिकेट , टेनिस, फुटबॉल इत्यादी तर त्याची डिटेल माहिती द्यावी लागेल . त्यात जर काही अवॉर्ड्स , सर्टिफिकेट्स मिळाले असतील तर त्याची माहिती द्यावी लागेल . तेंव्हा आधीपासूनच हे सर्व सर्टिफिकेट्स वगैरे इन्फॉर्मशन आधीपासूनच गोळा करून ठेवा .
5. Employment Information :
यात तुम्ही जर काही जॉब केला असेल , समर जॉब , इंटर्नशिप किंवा काही समर ऍक्टिव्हिटीज त्याचे डिटेल्स यात द्यावे लागतात . नसेल काही experience तर काहीच हरकत नाही . पण केला असेल तर व्यवस्थित त्याचे डिटेल्स , सर्टिफिकेट ऑफ एक्सपेरिन्स घेऊन ठेवा . हा अनुभव तुमच्यासाठी प्लस पॉईंट ठरू शकतो कॉलेज ऍडमिशन च्या दृष्टीने .
आता हा ब्लॉग वाचून तुम्हाला एक साधारण आयडिया आली असेलच कि कॉलेज अँप्लिकेशन कसे असते आणि त्यासाठी तुम्हाला काय काय माहिती गोळा करून ठेवावी लागेल . तर मग चला आणि तयारीला लागा !
जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर तुमचा अभिप्राय मला नक्की कळवा . तुमचे काही प्रश्न असतील तर तेही कंमेंट मध्ये नोंदवा . मी नक्की तुमच्या प्रश्नांची उत्तरे देईल . हा ब्लॉग like करा आणि share करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यां पर्यंत पोहचावा . तुम्हाला USA कॉलेज ऍडमिशन संदर्भात काही मार्गदर्शन हवे असेल तर नक्की माझ्याशी कॉन्टॅक्ट करा . खाली माझ्या फेसबुक ग्रुप ची लिंक देत आहे त्यावर क्लिक करून ग्रुप जॉईन करा . तिथे तुम्हाला अजून रिसोर्सस मिळतील . तसेच माझ्या youtube ची लिंक देत आहे त्याला subscribe करा .
तर भेटूया पुढच्या भागात ! धन्यवाद 🙏🏻






अतिशय सुंदर
उत्तर द्याहटवाआणि उपयुक्त मार्गदर्शन
थँक यु उचिता
हटवाखूपचं informative
उत्तर द्याहटवाThank you
हटवाFantastic ..Thank you
उत्तर द्याहटवाThank you sir 🙏🏻
हटवाVery useful information 👍
उत्तर द्याहटवाThank you 🙏🏻
हटवाKhoop chan mahiti keep it up 👍🙏
उत्तर द्याहटवाThank you Vidya🙏🏻
हटवाWonderful information..
उत्तर द्याहटवाThank you Smita tai 🙏🏻
हटवाGreat information
उत्तर द्याहटवाअस्मिता खूप छान लिहिला आहेस ब्लॉग आणि खूप उपयुक्त माहिती दिलीस नक्कीच या माहिती चा आपल्या मुलांना फायदा होईल
उत्तर द्याहटवाThank you 🙏🏻
हटवाKhup chan mahiti 👏👏👏👏k👌👌👌👌
उत्तर द्याहटवाThank you 🙏🏻
हटवाKhup chhan
उत्तर द्याहटवाThank you 🙏🏻
हटवाThank you
उत्तर द्याहटवा