अमेरिकेतील शिक्षण संधी : भाग 4

अमेरिकेत कॉलेज प्रवेशासाठी लागणाऱ्या 3 आवश्यक गोष्टी





        मागील भागात आपण अमेरिकेतील शिक्षणपद्धतीचे स्वरूप पहिले. आता आपला येथे शिक्षण घेण्याच्या स्वप्नाच्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे.  पण तुम्हाला माहित आहे का अमेरिकेतील युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घ्यायचा तर काय करावं लागेल ? अमेरिकेतील कॉलेज प्रवेश प्रक्रियेसाठी तुम्हाला कोणत्या  गोष्टींची पूर्तता करावी लागेल ? जर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे माहित नसतील तर हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा . 

             मी अस्मिता खरात Mission Study In America या हब ची Founder आणि USA Admissions Facilitator . येत्या 5 वर्षात 1000 विद्यार्थ्यांना अमेरिकन युनिव्हर्सिटीज मध्ये प्रवेश मिळवून देणे हा माझा ध्यास आहे .  मी तुमच्या मार्गदर्शनासाठी अमेरिकन शिक्षणाच्या संधी हि सिरीज आणली आहे . 

अमेरिकन युनिव्हर्सिटीज मध्ये प्रवेश घेण्यासाठी अनेक गोष्टींची पूर्तता करावी लागते .   सर्वात आधी तुम्ही या  तीन गोष्टींची पूर्तता केली कि नाही हे तुमचे कॉलेज जिथे तुम्ही प्रवेश घेणार आहेत ते पाहतील . तर अंडरग्रॅज्युएट लेवल आणि ग्रॅजुएट लेव्हलला काय  काय बाबी लागतील हे आपण स्वतंत्र पणे पाहुयात . तर या तीन गोष्टी पुढील प्रमाणे.  

Undergraduate  / बॅचलर डिग्री साठी प्रवेश प्रक्रिया : प्रवेशासाठी आवश्यक 3गोष्टी

 1.शैक्षणिक पात्रता / GPA

              GPA म्हणजे grade avarage point . हा तुमच्या 9वि ते 12वि पर्यन्तच्या शैक्षणिक वर्षांत मिळालेल्या गुणांचा average असतो . यात तुमच्या 9वि ते 12वि पर्यन्त होणाऱ्या सर्व परीक्षेच्या गुणांचा समावेश असतो . या गुणाचं average काढून तो अमेरिकेतील GPA scale वर मोजतात . हा 4 पॉईंट scalar असतो . ते कसे मोजतात ते आपण नंतर पाहू . साधारणतः 3-4 मधील GPA चांगला असतो प्रवेश मिळविण्याच्या दृष्टीने .  त्यासाठी तुमची शैक्षणिक प्रगती चांगली ठेवा . प्रत्येक कॉलेजची GPA मोजण्याची पद्धत वेगळी असू शकते .  

2. इंग्लिश लँग्वेज प्रभुत्व टेस्ट : 

               आपल्या देशात इंग्लिश भाषा हि सेकंडरी भाषा आहे . त्यामुळे आपल्या देशातून येथील कॉलेज मध्ये प्रवेश घेण्यासाठी या टेस्ट देणे आवश्यक आहे . साधारणतः TOEFL ( Test of English as a foreign Language) किंवा IELTS ( International English Language Testing System) या पैकी एक टेस्ट द्यावी लागते. प्रत्येक कॉलेजचा acceptance score हा वेगवेगळा असतो . त्यामुळे आपल्याला ज्या कॉलेज मध्ये इंटरेस्ट आहे तिथे संपर्क साधून आपण ती माहिती मिळवू शकतो . त्याप्रमाणे आपला स्कोर असल्यास आपणास ऍडमिशन मिळते. 

       तसेच काही कॉलेज मध्ये या टेस्ट व्यतिरिक्त आणखी दुसऱ्या  इंग्लिश टेस्ट घेण्याचा पर्याय उपलब्ध असतो. त्याची माहिती त्या त्या कॉलेज च्या website वर मिळू शकते किंवा तुम्हाला कॉलेज बरोबर संपर्क साधून मिळू शकते. 

या टेस्टसाठीचे टेस्ट सेंटर्स जगभरात असतात आणि त्यांचा फॉरमॅट सगळीकडे सारखाच असतो . जेंव्हा तुम्ही टेस्ट साठी रजिस्टर कराल तेंव्हा तुम्ही कुठल्या कॉलेजला apply करत आहत ते नोंदण्याचा पर्याय असतो .  लगेच नाही  नोंदविले तरी चालते ,  परंतु जर तुम्ही ते नोंदवलेत तर टेस्टिंग सेंटर तुमचा रिजल्ट डायरेक्ट तुमच्या कॉलेजला पाठवून देतात . असे केल्याने तुमचे पैसे वाचतात , अन्यथा नंतर रिजल्ट  पाठवायचा असेल तर परत वेगळे  भरावे लागतात . तसेच TOEFLचा रिजल्ट हा दोन वर्षापर्यंत व्हॅलिड असतो त्यामुळे योग्य वेळीच हि टेस्ट घ्यावी . 

3. Standerdized टेस्ट / कॉलेज प्रवेश टेस्ट : 

            अमेरिकेत बॅचलर्स डिग्री अथवा अंडरग्रॅज्युएट डिग्री प्रवेशा  साठी काही स्टँडर्डाइज  टेस्ट द्याव्या लागतात . या टेस्ट म्हणजे SAT( Scholastic Assessment Test) अथवा ACT ( American College Testing) या पैकी एक द्यावी लागते . काही कॉलेजेस मध्ये SAT subject test देणेही आवश्यक असतात. त्या त्या कॉलेजशी संपर्क साधल्यास तुम्हाला हि इन्फॉर्मशन मिळू शकते . या टेस्ट साठीचे सेंटर्स जगभरात असतात . त्यांचा एक स्टॅंडर्ड फॉरमॅट असतो . तुमचा स्कोर  हा तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन ऑफिसला एक युनिफॉर्म इंटरनॅशनल मेजरींग रिजल्ट देईल जो तुमची पात्रता दुसऱ्या विद्यार्थ्या बरोबर मोजेल . इथे सुद्धा तुम्हाला तुमचा रिजल्ट कुठल्या कॉलेजला पाठवायचा हा पर्याय असेल . 

SAT टेस्ट हि मॅथ्स , क्रिटिकल रिडींग आणि रायटिंग वर आधारित असते. हि मल्टिपल चॉईस एक्साम  असते. तसेच essay writing पर्यायी एक्साम असते. या एक्सामचा स्कोर 400 to 1600 या scale वर मोजला जातो . हि टेस्ट college board घेते. 

ACT टेस्ट हि मॅथ्स , इंग्लिश , रिडींग आणि सायन्स या चार विषयांवर आधारित असते. हि मल्टिपल चॉईस एक्साम असते. या बरोबरच ऑपशनल रायटिंग ची एक्साम घेऊ शकतो . या परीक्षेचा score 1-36 या scale वर मोजला जातो . प्रत्येक कॉलेजचा acceptance score वेगवेगळा असतो . 

SAT subject test :काही कॉलेजेस मध्ये SAT subject टेस्ट घेणे अनिवार्य असते. यामध्ये तुमचे त्या विषयात किती प्राविण्य आहे हे मोजले जाते. तुम्हाला जो मेजर विषय घ्यायचाय त्या विषयाची टेस्ट घेणे आवश्यक असते. उदा. इंजिनीरिंग साठी मॅथ्स टेस्ट , प्रिमेड साठी सायन्स मधील बायोलॉजि , केमिस्ट्री  टेस्ट , लिटरेचर साठी इंग्लिश , इतिहास अथवा फ्रेंच , जपानी सारख्या भाषांची टेस्ट घेतली जाते. या टेस्ट सुद्धा कॉलेज बोर्ड घेते. 

ग्रॅजुएट / मास्टर्स डिग्री साठी प्रवेश प्रक्रिया : प्रवेशासाठी आवश्यक 3 गोष्टी पुढीलप्रमाणे-

1. शैक्षणीक पात्रता / GPA : ग्रॅजुएट  डिग्री प्रोग्रॅम साठी बॅचलर्स डिग्री असणे आवश्यक आहे . तसेच यामध्ये तुमचा GPA 3 ते 4 च्या दरम्यान हवा . काही कॉलेजेस 2.75 GPA सुद्धा स्वीकारतात. 

2. इंग्लिश लँग्वेज प्रभुत्व टेस्ट :  इथे सुद्धा प्रवेशासाठी TOEFL किंवा IELTS टेस्ट चा स्कोर द्यावे लागेल . 

3. Standardized tests/ कॉलेज प्रवेश टेस्ट : तुम्ही कुठल्या प्रोग्रॅमला प्रवेश घेताय त्यानुसार तुम्हाला ती कॉलेज इंटरन्स टेस्ट द्यावी लागते. GRE, GMAT, MCAT, LSAT या काही परीक्षा आहेत . 

GRE: ( Graduate Record Exam ) अनेक विषयांसाठी हि इंटरन्स एक्साम द्यावी लागते . यामध्ये 3 सेकशन्स असतात :quantitative reasoning, verbal reasoning , analytical writing. यामधील verbal आणि quantitative sections हे 170 पॉईंट्स मध्ये मोजले जातात , तर रायटिंगचा भाग हा 1-6 या scale वर मोजला जातो . 

GMAT: ( Graduate Management Admission Test ) हि टेस्ट MBA अथवा ज्यांना बिजनेस मध्ये ग्रॅजुएट करायचे आहे त्यांना घ्यावी लागते. या टेस्ट मध्ये एकूण 4 सेकशन्स असतात: quantitative section, verbal section, integrated reasoning section आणि analytical writing assessment. हि टेस्ट 800 पॉईंट्स ची असते . 

MCAT: ( Medical College Admission Test) ज्या विध्यार्थाना वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घ्यायचा आहे त्यांना हि परीक्षा द्यावी लागते. यात multiple choice section असतो जो 118-132 च्या रेंज मध्ये असतो . तसेच काही subject test : फिजिकल सायन्स , verbal reasoning, biological science या लेखी परीक्षा द्याव्या लागतात . 

LSAT : ( Law School Admission Test) ज्या मुलांना कायद्याचे शिक्षण घ्यायचे आहे त्यांना हि प्रवेश परीक्षा द्यावी लागते . यात तुम्हाला logical reasoning, reading comprehension, analytical reasoning तसेच एक essay लिहावा लागतो . या टेस्ट चा acceptable स्कोर हा 120-180 असतो. 

            तर आपण या भागात अंडरग्रॅज्युएट व ग्रॅजुएट लेव्हलला ऍडमिशन घेण्यासाठी कोणकोणत्या 3 आवश्यक गोष्टी आहेत हे पहिले. याशिवाय आणखीन कोणत्या गोष्टी प्रवेश घेण्यासाठी लागतात ते आपण हळू हळू पुढील भागांमध्ये पाहुयात . जर तुम्हाला हा लेख आवडला तर like आणि share करा. आपला अभिप्राय खूप महत्वाचा आहे . तर comment बॉक्समध्ये आपला अभिप्राय नोंदवा. येथे खाली मी माझ्या facebook ग्रुप आणि youtube ची लिंक देत आहे . त्यावर क्लिक करून ग्रुप जॉईन करा ,subscribe करा. तेथे तुम्हाला आणखी resources मिळतील . धन्यवाद  🙏🏻

https://www.facebook.com/groups/861601097705950/?ref=share


https://youtu.be/PJIU8VXSKvc


तर भेटूया पुढच्या भागात ! 









टिप्पण्या

  1. Asmita tai great information with very minute details. keep writing blogs on same so we get valuable information from you .thank you

    उत्तर द्याहटवा
  2. महत्त्वाची माहिती, सोप्या शब्दात

    उत्तर द्याहटवा
  3. मस्तच माहीती आहे.छान लिहीले आहेस. Keep it up

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अमेरिकेतील शिक्षण संधी : भाग 13

अमेरिकेतील शिक्षण संधी :12

अमेरिकेतील शिक्षण संधी : भाग 10