अमेरिकेतील शिक्षण संधी : भाग 13
डॉर्मंस कि अपार्टमेंट ; राहण्यासाठी काय निवडाल ?
मागच्याच महिन्यात मुलीचे कॉलेजमध्ये ऍडमिशन झाले . तिला राहण्यासाठी काय पर्याय उपलब्ध आहेत म्हणून माहिती मिळावयाला सुरवात केली . तसा ऑनलाईन जाऊन रिसर्च केला होता . पण तिथे प्रत्यक्ष जाऊन पाहायचे ठरविले . तेंव्हा तिच्या बरोबर जाणारे चार फ्रेंड्स आणि त्यांचे पेरेंट्स असे आम्ही आपापल्या कार ने एकत्रित टूर घ्यायाला निघालो . तिथे गेल्यावर आम्ही दिवसभर कॉलेज डॉर्मंस आणि वेगवेगळे स्टुडंट् अपार्टमेंट्स पहिले. आता डॉर्मंस म्हणजे काय ? स्टुडंट्स अपार्टमेंट्स म्हणजे काय ? ते कसे निवडायचे असे तुम्हाला प्रश्न पडले असतील . तर या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या ब्लॉग मध्ये मिळतील . तर हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा .
मी अस्मिता खरात , Mission Study In America या हब ची Founder आणि USA Admission Facillitator . येत्या 5 वर्षात 1000 मुलांना अमेरिकेतील कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळवून देणे हा माझा ध्यास आहे.
सगळ्यात आधी आपण यातील फरक पाहुयात . तर डॉर्ममेटोरी किंवा डॉर्मंस म्हणजे कॉलेज कॅम्पस वर असलेली राहण्याची सोय . दोन मुलांमध्ये एक अथवा चार मुलांमध्ये एक रूम अशी रचना असते . प्रायव्हेट रूम्स पण उपलब्ध असतात . इथे भरपूर सोयी असतात . बहुतेक कॉलेजेस पहिल्या वर्षातील undergraduate स्टुडंट्सला डॉर्मंस मध्ये राहण्यासाठी कंपल्शन करतात . अपार्टसमेंट्सच्या तुलनेने डॉर्मंस हे महाग असतात .
अपार्टमेंट्स हे कॉलेजच्या बाहेर असतात. डॉर्मंसच्या तुलनेने स्वस्त असतात . इथे निवडीला स्वातंत्र्य असल्याने पैसे सेव्ह करण्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते .
या दोन्हीचे फायदे आणि तोटे आता आपण पाहुयात .
डॉर्मेटरी किंवा डॉर्मंस
फायदा
1. डॉर्मंस मध्ये कामाचा व्याप कमी असतो. डॉर्मंस बरोबरच तुम्हाला येथे कॅफेटेरियाचा मिल प्लॅन घेणे बंधनकारक असते. त्यामुळे कूकिंग , डिशवॉशिन्ग यांसारखी कामे करण्याचा वेळ वाचतो . डॉर्मंस सर्व सुखसोयी युक्त असल्याने तुम्हाला तुमचे लक्ष फक्त अभ्यासावर केंद्रित करता येते .
2. कॅफेटेरिया अटॅच असल्याने जेवणासाठी फार धावाधाव करण्याची आवश्यकता नसते .
3. कॉलेज कॅम्पस मधेच डॉर्मंस असल्याने कॉलेज डिपार्टमेंट ते डॉर्मंस हे अंतर चालण्या योग्य असते . तसेच ट्रॅव्हलिंगसाठी होणार खर्च वाचतो .
4.पूर्ण फर्निश्ड असते . बेड , मॅट्रेस , फ्रीझ, मायक्रोवेव्ह रूम मध्ये असतात .
5. बिल्डिंगमध्ये टीव्ही आणि इतर एंटरटेनमेंट च्या सोयी असतात . जिम असते . स्टडी रूम्स असतात , फ्री इंटरनेट . कॉमन किचन जेथे जाऊन तुम्ही तुमचे फूड बनवू शकता . आठवड्यातून तुमचे रूम्स , बाथरूम्स क्लीन करून दिले जातात . हे सर्व तुमच्या डॉर्म च्या फी मधेच असते .
6. प्रत्येक डॉर्म मध्ये एक ऍडवायजर असतो ते तुम्हाला तुम्हाच्या कॅम्पस लिविंग च्या संदर्भातील अडीअडचणींमध्ये मदत करतात .
7. सोशल लाइफ : कॅम्पस मध्ये अनेक सोशल ऍक्टिव्हिटीज आयोजित केल्या जातात . मूवी नाईट , फ्री लंच किंवा डिनर , स्टडी ग्रुप्स . एखाद्या विषयातील ट्यूटोरिग आयोजित केले जाते .तसेच खूप वेगवेगळ्या देशातील विद्यार्थ्यांबरोबर मैत्रीची संधी मिळते .
8. सेक्युरिटी असते . रात्री ठरविक वेळेनंतर जायला बंधन असते . शिस्त असते .
तोटे :
1. अपार्टमेंटच्या तुलनेने महाग असते .
2. कॅफेटेरिया मिल प्लॅन घेणे बंधनकारक असल्याने तुम्हाला तिथलं फूड आवडो अथवा न आवडो तुम्हाला ते घ्यावाच लागत .
3. तितकीशी प्रायव्हसी नसते .
4. दोन मुलांमध्ये एक , चार मुलांमध्ये दोन अशी बाथरूम्स असतात . काही ठिकाणी कॉमन बाथरूम्स असतात . सेपरेट बाथरूम उपलब्ध नसते
5. रूम्स छोट्या असतात . दोन किंवा चार पार्टनर्स बरोबर शेअर करावी लागते . बेड साईझ पण छोटी असते . रूममध्ये मोकळी जागा अशी फार कमी असते .
6. येण्या जाण्यावर वेळेचे बंधन असल्याने उशिरापर्यंत लायब्ररीमध्ये बसता येत नाही .
अपार्टमेंट्स :
फायदे
1. डॉर्मंसच्या तुलनेने स्वस्त असतात .
2. राहण्यासाठी खूप चॉईस असते .
3. प्रायव्हसी खूप असते . प्रत्येकाला सेपरेट रूम आणि बाथरूम असते .
त्यामुळे अभ्यासावर फोकस करता येते .
4. फूडमध्ये पैसे वाचतात . तुम्ही स्वतः जाऊन ग्रोसरी करता येत असल्याने व स्वतः कूकिंग करत असल्याने डॉर्मंसच्या तुलनेने तुमचे पैसे खाण्यापिण्यावर वाचतात व तुम्हाला हवे ते तुम्ही बनवून खाऊ शकता .
5. रूम्स मोठ्या असतात . फुल्ली फर्निश्ड किचन असते. हवे तेंव्हा कूक करू शकता . लिविंग रूम , टीव्ही असतो .
6. रिस्ट्रिक्शन्स कमी असतात . कधीही बाहेर जाऊ येऊ शकता .
तोटे
1. कॅम्पस पासून दूर असल्याने पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा स्वतःच्या कार ने ट्रॅव्हलिंग करावे लागते . ट्रॅव्हलिंग चा खर्च वाढतो .
2. स्वतःच कूकिंग करत असल्याने वेळ वाया जातो . खास करून टेस्ट्स , सबमिशनच्या वेळेस ताण येतो . आरोग्यावर परिणाम होऊ शकतो .
3. युटिलिटी बिल्स म्हणजे कूकिंग गॅस , वॉटर , इलेकट्रीसिटीचे बिल्स तुम्हाला भरावे लागतात . तसेच कार असेल तर पार्किंग फी, जिम फी असे ऍडिशनल खर्च असतात .
4. सोशल लाइफ तितकेसे स्ट्रॉंग नसल्याने एकटेपणा जाणवू शकतो .
5. सिक्युरिटी तितकीशी स्ट्रॉंग नसते .
6. रूमचे मेंटेनन्स , रूम , बाथरूम क्लीनिंग स्वतःलाच करावं लागतं .
7. वर्षभर राहणे बंधनकारक असल्याने रूम आवडली नसली तरीही कॉन्ट्रॅक्ट मूळे सोडता येत नाही
आता तुम्हाला या दोन्हीची माहिती मिळाली आहे . तर तुमचे स्वतःच्या प्रायॉरिटीज लक्षात घेऊन तुम्ही कुठे राहायचं ते ठरवू शकता . ग्रॅज्युएट स्कूलला जाणारी मुले तशी रिस्पॉन्सिबल असतात . त्यामुळे बहुतेक करून ती अपार्टमेंट्स मध्ये राहणे पसंत करतात . तर अंडरग्रॅज्युएटला जाणारी मुले वयाने तशी लहान असल्याने एखाद वर्ष डॉर्मंस मध्ये जरूर राहून पाहावे. नवीन देश , नवीन कॉलेज, वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले विद्यार्थी याचे दडपण डॉर्मंसच्या वातावरणात कमी होते आणि उरलेली बाकीचे वर्ष तुम्ही अपार्टसमेन्ट मध्ये राहू शकता .
So good luck 👍
जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर like करा , share करा , कंमेंट करा . तुमचा अभिप्राय खूप महत्वाचा आहे . तुमचे काही प्रश्न असतील तर तेही कंमेंट बॉक्स मध्ये नोंदवा . या ब्लॉग खाली माझी youtube व कम्युनिटी ची लिंक देत आहे त्यावर क्लिक करून जॉईन व्हा . तेथे तुम्हाला आणखीन रिसोर्सेस भेटतील .
https://www.facebook.com/groups/861601097705950/?ref=share
तर भेटूयात पुढच्या भागात .
धन्यवाद 🙏🏻

खूप सुंदर ब्लॉग अस्मिता.खूप छान presentation. 👌👌
उत्तर द्याहटवाछान सविस्तर माहिती.
मुलांना छान उपयोग होईल ह्या माहितीचा
Thank you Kirti mam.
हटवाGreat information. Feel easy for childrens . nicely explained each point
उत्तर द्याहटवाThanks Bhakti
हटवाGreat information. Feel easy for childrens . nicely explained each point
उत्तर द्याहटवाKhup chan mahiti dhili
उत्तर द्याहटवाखूप सुंदर सादरीकरण आहे Dorm आणि Apartment संदर्भात... परदेशी शिक्षणासाठी उपयुक्त माहिती
उत्तर द्याहटवाThank you sir 🙏🏻
हटवाVery informative tips Asmita ma'am 👍
उत्तर द्याहटवाThank you
हटवा