अमेरिकेतील शिक्षण संधी : भाग 13

 डॉर्मंस कि अपार्टमेंट ; राहण्यासाठी काय निवडाल ?

          मागच्याच महिन्यात मुलीचे कॉलेजमध्ये ऍडमिशन झाले . तिला राहण्यासाठी काय पर्याय उपलब्ध आहेत म्हणून माहिती मिळावयाला सुरवात केली . तसा ऑनलाईन जाऊन रिसर्च केला होता . पण तिथे प्रत्यक्ष जाऊन पाहायचे ठरविले . तेंव्हा तिच्या बरोबर जाणारे चार फ्रेंड्स आणि त्यांचे पेरेंट्स असे आम्ही आपापल्या कार ने एकत्रित टूर घ्यायाला निघालो . तिथे गेल्यावर आम्ही दिवसभर कॉलेज डॉर्मंस आणि वेगवेगळे स्टुडंट् अपार्टमेंट्स  पहिले. आता डॉर्मंस म्हणजे काय ? स्टुडंट्स अपार्टमेंट्स म्हणजे काय ? ते कसे निवडायचे असे तुम्हाला  प्रश्न पडले  असतील . तर या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या ब्लॉग मध्ये मिळतील . तर हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा . 

मी अस्मिता खरात , Mission Study In America या हब ची Founder आणि USA Admission Facillitator . येत्या 5 वर्षात 1000 मुलांना अमेरिकेतील कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळवून देणे हा माझा ध्यास आहे.

       सगळ्यात आधी आपण यातील फरक पाहुयात . तर डॉर्ममेटोरी किंवा डॉर्मंस म्हणजे कॉलेज कॅम्पस वर असलेली राहण्याची सोय . दोन मुलांमध्ये एक अथवा चार मुलांमध्ये एक रूम अशी रचना असते . प्रायव्हेट रूम्स पण उपलब्ध असतात . इथे भरपूर सोयी असतात . बहुतेक कॉलेजेस पहिल्या वर्षातील undergraduate स्टुडंट्सला डॉर्मंस मध्ये राहण्यासाठी कंपल्शन करतात . अपार्टसमेंट्सच्या तुलनेने डॉर्मंस हे महाग असतात . 

     अपार्टमेंट्स हे कॉलेजच्या बाहेर असतात. डॉर्मंसच्या तुलनेने स्वस्त असतात . इथे निवडीला स्वातंत्र्य असल्याने पैसे सेव्ह करण्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते . 

      या दोन्हीचे फायदे आणि तोटे आता आपण पाहुयात . 

डॉर्मेटरी किंवा डॉर्मंस 





फायदा 

1. डॉर्मंस मध्ये कामाचा व्याप कमी असतो. डॉर्मंस बरोबरच तुम्हाला येथे कॅफेटेरियाचा मिल प्लॅन घेणे बंधनकारक असते. त्यामुळे कूकिंग , डिशवॉशिन्ग यांसारखी कामे करण्याचा वेळ वाचतो . डॉर्मंस  सर्व सुखसोयी युक्त असल्याने तुम्हाला तुमचे लक्ष फक्त अभ्यासावर केंद्रित करता येते . 

2. कॅफेटेरिया अटॅच असल्याने जेवणासाठी फार धावाधाव करण्याची आवश्यकता नसते . 

3. कॉलेज कॅम्पस मधेच डॉर्मंस असल्याने कॉलेज डिपार्टमेंट ते डॉर्मंस हे अंतर चालण्या योग्य असते . तसेच ट्रॅव्हलिंगसाठी होणार खर्च वाचतो . 

4.पूर्ण फर्निश्ड असते . बेड , मॅट्रेस , फ्रीझ, मायक्रोवेव्ह  रूम मध्ये असतात . 

5. बिल्डिंगमध्ये टीव्ही आणि इतर एंटरटेनमेंट च्या सोयी असतात . जिम असते . स्टडी रूम्स असतात , फ्री इंटरनेट . कॉमन किचन जेथे जाऊन तुम्ही तुमचे फूड बनवू शकता . आठवड्यातून तुमचे रूम्स , बाथरूम्स क्लीन करून दिले जातात . हे सर्व तुमच्या डॉर्म च्या फी मधेच असते . 

6. प्रत्येक डॉर्म मध्ये एक ऍडवायजर असतो ते तुम्हाला तुम्हाच्या कॅम्पस लिविंग च्या संदर्भातील अडीअडचणींमध्ये मदत करतात . 

7. सोशल लाइफ : कॅम्पस मध्ये अनेक सोशल ऍक्टिव्हिटीज आयोजित केल्या जातात . मूवी नाईट , फ्री लंच किंवा डिनर , स्टडी ग्रुप्स . एखाद्या विषयातील ट्यूटोरिग आयोजित केले जाते .तसेच  खूप वेगवेगळ्या देशातील विद्यार्थ्यांबरोबर मैत्रीची संधी मिळते . 

8. सेक्युरिटी असते . रात्री ठरविक वेळेनंतर जायला बंधन असते . शिस्त असते . 

तोटे

1. अपार्टमेंटच्या तुलनेने  महाग असते . 

2. कॅफेटेरिया मिल प्लॅन घेणे बंधनकारक असल्याने तुम्हाला तिथलं फूड आवडो अथवा न आवडो तुम्हाला ते घ्यावाच लागत . 

3. तितकीशी प्रायव्हसी नसते . 

4.  दोन मुलांमध्ये एक , चार मुलांमध्ये दोन अशी बाथरूम्स असतात . काही ठिकाणी कॉमन बाथरूम्स असतात . सेपरेट बाथरूम उपलब्ध नसते 

5. रूम्स छोट्या असतात . दोन किंवा चार पार्टनर्स बरोबर शेअर करावी लागते . बेड साईझ पण छोटी असते . रूममध्ये मोकळी जागा अशी फार कमी असते . 

6. येण्या जाण्यावर वेळेचे बंधन असल्याने उशिरापर्यंत लायब्ररीमध्ये बसता येत नाही . 

अपार्टमेंट्स : 



फायदे 

1. डॉर्मंसच्या तुलनेने स्वस्त असतात . 

2. राहण्यासाठी खूप चॉईस असते . 

3. प्रायव्हसी खूप असते . प्रत्येकाला सेपरेट रूम आणि बाथरूम असते . 

त्यामुळे अभ्यासावर फोकस करता येते . 

4. फूडमध्ये पैसे वाचतात .  तुम्ही स्वतः जाऊन ग्रोसरी करता येत असल्याने  व स्वतः कूकिंग करत असल्याने डॉर्मंसच्या तुलनेने तुमचे पैसे खाण्यापिण्यावर वाचतात व तुम्हाला हवे ते तुम्ही बनवून खाऊ शकता . 

5. रूम्स मोठ्या असतात . फुल्ली फर्निश्ड किचन असते. हवे तेंव्हा कूक करू शकता . लिविंग रूम , टीव्ही असतो . 

6. रिस्ट्रिक्शन्स कमी असतात . कधीही बाहेर जाऊ येऊ शकता . 

तोटे  

1. कॅम्पस पासून दूर असल्याने पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा स्वतःच्या कार ने ट्रॅव्हलिंग करावे लागते . ट्रॅव्हलिंग चा खर्च वाढतो . 

2. स्वतःच कूकिंग करत असल्याने वेळ वाया जातो . खास करून टेस्ट्स , सबमिशनच्या वेळेस ताण येतो . आरोग्यावर परिणाम होऊ शकतो . 

3. युटिलिटी बिल्स म्हणजे कूकिंग गॅस , वॉटर , इलेकट्रीसिटीचे बिल्स तुम्हाला भरावे लागतात . तसेच कार असेल तर पार्किंग फी, जिम फी असे ऍडिशनल खर्च असतात . 

4. सोशल लाइफ तितकेसे स्ट्रॉंग नसल्याने एकटेपणा जाणवू शकतो . 

5. सिक्युरिटी तितकीशी स्ट्रॉंग नसते . 

6. रूमचे मेंटेनन्स , रूम , बाथरूम क्लीनिंग स्वतःलाच करावं लागतं . 

7. वर्षभर राहणे बंधनकारक असल्याने रूम आवडली नसली तरीही कॉन्ट्रॅक्ट मूळे सोडता येत नाही 

     आता तुम्हाला या दोन्हीची माहिती मिळाली आहे . तर तुमचे स्वतःच्या प्रायॉरिटीज लक्षात घेऊन तुम्ही कुठे राहायचं ते ठरवू शकता . ग्रॅज्युएट स्कूलला जाणारी मुले तशी रिस्पॉन्सिबल असतात . त्यामुळे बहुतेक करून ती अपार्टमेंट्स मध्ये राहणे पसंत करतात . तर अंडरग्रॅज्युएटला जाणारी मुले वयाने तशी लहान असल्याने एखाद वर्ष डॉर्मंस मध्ये जरूर राहून पाहावे. नवीन देश , नवीन कॉलेज, वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले विद्यार्थी याचे दडपण डॉर्मंसच्या वातावरणात कमी होते आणि उरलेली बाकीचे वर्ष तुम्ही अपार्टसमेन्ट मध्ये राहू शकता . 

So good luck 👍

      जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर like करा , share करा , कंमेंट करा . तुमचा अभिप्राय खूप महत्वाचा आहे . तुमचे काही प्रश्न असतील तर तेही कंमेंट बॉक्स मध्ये नोंदवा . या ब्लॉग खाली माझी youtube व कम्युनिटी ची लिंक देत आहे त्यावर क्लिक करून जॉईन व्हा . तेथे  तुम्हाला आणखीन रिसोर्सेस भेटतील .      

  https://youtu.be/PJIU8VXSKvc           

   https://www.facebook.com/groups/861601097705950/?ref=share    

          तर भेटूयात पुढच्या भागात .

                  धन्यवाद 🙏🏻           




टिप्पण्या

  1. खूप सुंदर ब्लॉग अस्मिता.खूप छान presentation. 👌👌
    छान सविस्तर माहिती.
    मुलांना छान उपयोग होईल ह्या माहितीचा

    उत्तर द्याहटवा
  2. खूप सुंदर सादरीकरण आहे Dorm आणि Apartment संदर्भात... परदेशी शिक्षणासाठी उपयुक्त माहिती

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अमेरिकेतील शिक्षण संधी :12

अमेरिकेतील शिक्षण संधी : भाग 10