अमेरिकेतील शिक्षण संधी : भाग 4
अमेरिकेत कॉलेज प्रवेशासाठी लागणाऱ्या 3 आवश्यक गोष्टी . मागील भागात आपण अमेरिकेतील शिक्षणपद्धतीचे स्वरूप पहिले. आता आपला येथे शिक्षण घेण्याच्या स्वप्नाच्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे. पण तुम्हाला माहित आहे का अमेरिकेतील युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घ्यायचा तर काय करावं लागेल ? अमेरिकेतील कॉलेज प्रवेश प्रक्रियेसाठी तुम्हाला कोणत्या गोष्टींची पूर्तता करावी लागेल ? जर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे माहित नसतील तर हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा . मी अस्मिता खरात Mission Study In America या हब ची Founder आणि USA Admissions Facilitator . येत्या 5 वर्षात 1000 विद्यार्थ्यांना अमेरिकन युनिव्हर्सिटीज मध्ये प्रवेश मिळवून देणे हा माझा ध्यास आहे . मी तुमच्या मार्गदर्शनासाठी अमेरिकन शिक्षणाच्या संधी हि सिरीज आणली आहे . अमेरिकन युनिव्हर्सिटीज मध्ये प्रवेश घेण्यासाठी अनेक गोष्टींची पूर्तता करावी लागते . सर्वात आधी तुम्ही या तीन गोष्टींची पूर्तता केली कि नाही हे तुमचे कॉलेज जिथे तुम्ही प्र...