अमेरिकेतील शिक्षण संधी भाग - 5
या 3 गोष्टी तुमच्या अमेरिकेतील युनिव्हर्सिटीमधील प्रवेशासाठी निर्णायक ठरू शकतात. मागील भागात तुम्ही अमेरिकेत कॉलेज मध्ये प्रवेशासाठी लागणाऱ्या 3 आवश्यक व महत्वाच्या गोष्टी पहिल्या . तेंव्हा GPA admission साठी किती महत्वाचा आहे हे तुमच्या लक्षात आले असेल . मग काही जण म्हणतील माझ्याकडे नाहीये इतका high GPA score , मग काय करायचं? मला नाही वाटत मला प्रवेश मिळेल म्हणून . अशाच तर्हेने अनेक जण नाराज होतात आणि अमेरिकेत प्रवेश घ्यायचा विचारच सोडून देतात . पण तुम्हाला असे काहीच करायची गरज नाही . तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे मी देणार आहे . मी अस्मिता खरात Mission Study In America या हब ची founder आणि USA Admissions Facilitator . येत्या 5 वर्षांत 1000 मुलांना अमेरिकेतील विद्यापीठात प्रवेश मिळवून देणे हा माझा ध्यास आहे . यासाठी मी अमेरिकेतील शिक्षणाच्या संधी हि सिरीज सुरु केली आहे . तर तुम्हाला अमेरिकेतील विद्यापीठात ऍडमिशन घ्यायचा विचार सोडून द्यायची काहीच गरज नाही . कारण येथील शिक्षण प...