अमेरिकेतील शिक्षण संधी : भाग 11
या 7 प्रकारे तुम्ही अमेरिकेत कॉलेज मध्ये कॅम्पस जॉब्स करू शकता .
अमेरिकेत शिक्षण घेत असताना जॉब करायची इच्छा आहे ? काही कमाई करून आर्थिक हातभार उचलायचाय ? तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे .
मी अस्मिता खरात , Mission Study In America या हब ची Founder आणि USA Admission Facillitator . येत्या 5 वर्षात 1000 मुलांना अमेरिकेतील कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळवून देणे हा माझा ध्यास आहे.
अमेरिकेत शिक्षण घेत असताना कॉलेज कॅम्पस वर अनेक प्रकारे तुम्ही जॉब्स करू शकता .साधारणतः 7$ ते 15 $ तासाला असा पे असतो . असतो . इंटरनॅशनल स्टुडंट्स साठी आठवड्याला 20 तास पार्ट टाइम काम जिरण्याची परवानगी असते तर समर तसेच दोन सेमिस्टर्स मधील सुट्ट्यांमध्ये फुल्ल टाइम काम परवानगी असते . अर्थात या साठी तुम्हाला ऑफिशिअल गव्हर्मेंट परवाना घ्यावा लागतो . तर हे कॅम्पस जॉब्स कोणते असतात ते आपण या ब्लॉग मध्ये पाहुयात .
1. कॅफेटेरिया जॉब्स :
कॉलेज कॅफेटेरिया मध्ये सर्वर , हेल्पर. कॅशियर अश्या प्रकारचे जॉब्स कॉलेज स्टुएंट्स साठी उपलब्ध असतात . वेगवेगळ्या टाइम स्लॉट्स मध्ये ते उपलब्ध होत असल्याने तुमच्या सोयीनुसार तुम्ही ते करू शकता . तसेच तणावरहित काम असल्याने तुम्ही ते एन्जॉय पण करू शकता आणि कॅम्पस लाईफ चा एक वेगळाच अनुभव मिळतो .
2. IT support :
जर तुम्ही टेक्नो सॅव्ही असाल तर तुम्हाला लायब्ररी , ऑफिस, कॉम्पुटर लॅब्स अश्याठिकाणी टेक्नो हेल्पर म्हणून जॉब मिळू शकतो . लायब्ररी मध्ये प्रिंटिंग अससिस्टन्स , IT डिपार्टमेंट मध्ये डेटा ऑपरेटर, कॉम्पुटर टेकनिशिअन अश्या सारखे जॉब्स उपलब्ध असतात . एक चांगला एक्सपेरियन्स म्हणून तुमच्या पुढच्या कॅरीरच्या दृष्टीने चांगला अनुभव ठरतो .
3. कॅम्पस टूर गाईड :
ज्या विद्यार्थ्यांना लोकांशी बोलायला आवडत त्यांच्यासाठी हा खूप चांगला जॉब आहे. कॉलेज मध्ये ऍडमिशन घ्यायच्या आधी किंवा ओरिएंटेशन च्या वेळेस विद्यार्थी आणि पालक कॉलेज कॅम्पस पाहायला येतात . अश्यासाठी कॉलेज कॅम्पस टुर आयोजित करते . अश्या टूर्सचा गाईड म्हणून काम करण्याची विद्यार्थ्यांना संधी मिळते आणि काम करता करता अनेक मैत्र हि जोडता येतात .
4. फिटनेस अससिस्टन्स :
प्रत्येक कॉलज मध्ये विद्यार्थ्यांसाठी जिम असतात . अश्या ठिकाणी फिटनेस अससिस्टन्स म्हणून विद्यार्थ्यांसाठी जॉब्स उपलब्ध असतात . ज्यांना फिटनेस राखण्यात इंटरेस्ट आहे त्यांना हि छानशी संधी असते . तसेच झुंबा , योगा , एरोबिक व्यायाम यात तुमच्या कडे सर्टिफिकेट असेल तर तुम्ही स्पेशल क्लासेस घेऊ शकता . याचबरोबर स्पोर्ट्स खेळात असाल तर स्पोर्ट्स अससिस्टन्स म्हणून जॉब्स असतात . तसेच वेगवेगळे स्पोर्ट्स चे इव्हेंट्स साठी हेल्पर्स च्या पोस्ट्स असतात .
5. सोशल मीडिया मार्केटिंग :
प्रत्येक कॉलेजचे सोशल मीडिया अकाउंट तसेच वेबसाइट असते . ते हॅन्डल करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी जॉब्स उपलब्ध असतात . येथे कॉलेजचे मार्केटिंग केले जाते . जे विद्यार्थी मार्केटिंग मध्ये आहेत त्यांच्यासाठी हा एक्सपेरियन्स करियर साठी चांगला ठरतो .
6 . लायब्ररी अससिस्टन्स :
कॉलेजमध्ये खूप मोठी लायब्ररी असते व त्यात खूप सारी डिपार्टमेंटस . हि सर्व विद्यार्थ्यांच्या मदतीनेच चालविली जातात . येथे खूप प्रकारचे जॉब्स उपलब्ध असतात . फ्रंट डेस्क पर्सन , मेलिंग डिपार्टमेंट , stocking डिपार्टमेंट , बुक्स एंटरी , डेटा एंटरी असे अनेक जॉब्स विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतात. तसेच अतिशय शांत असे तणाव विरहित वातावरण असते आणि फावल्यावेळात तुम्ही अभ्यासही करू शकता .
7. हाय पेयिंग कॅम्पस जॉब्स:
कॉलेज मध्ये दुसऱ्या सेमिस्टर पासून हे जॉब्स उपलब्ध होतात . टीचर अससिस्टन्स , ग्रॅज्युएट अससिस्टन्स , रिसर्च अससिस्टन्स म्हणून जॉब्स असतात . तुमच्या पहिल्या सेमिस्टर मधील ग्रेड आणि तुमच्या प्रोफेसर बरोबर असलेल्या कोऑर्डिनेशन मुळे हे जॉब्स मिळतात . याचा पे खूप जास्त असतो तसेच ट्युशन फी मध्ये सवलत मिळते . याबद्दल सविस्तर आपण दुसऱ्या ब्लॉग मधून जाणून घेऊयात .
तर अश्या प्रकारचे अनेक जॉब्स कॅम्पस मध्ये उपलब्ध असतात . सेमिस्टर सुरु व्हायच्या आधीच त्याची माहिती कॅम्पस मध्ये फ्लायर वा सोशल मीडिया अकाउंट वर दिली जाते . तुम्ही कॉलेज करियर सेंटर मधून सुद्धा याची माहिती मिळवू शकता .
जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर like करा , share करा , कंमेंट करा . तुमचा अभिप्राय खूप महत्वाचा आहे . तुमचे काही प्रश्न असतील तर तेही कंमेंट बॉक्स मध्ये नोंदवा . या ब्लॉग खाली माझी youtube व कम्युनिटी ची लिंक देत आहे त्यावर क्लिक करून जॉईन व्हा . तेथे तुम्हाला आणखीन रिसोर्सेस भेटतील .
https://www.facebook.com/groups/861601097705950/?ref=share
तर भेटूयात पुढच्या भागात .
धन्यवाद 🙏🏻







खूपच सुंदर माहिती दिली .ही information खूप useful आहे.Thank you
उत्तर द्याहटवाThank you Bhakti mam
हटवाWah खूप उपयुक्त माहिती जी प्रदेशात शिक्षणासाठी जाणार्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक आहे.
उत्तर द्याहटवाThank you Sunita Mam
हटवा