अमेरिकेतील शिक्षण संधी : भाग 11

या 7 प्रकारे तुम्ही अमेरिकेत कॉलेज मध्ये कॅम्पस जॉब्स करू  शकता .  

              अमेरिकेत शिक्षण घेत असताना जॉब करायची इच्छा आहे ? काही कमाई करून आर्थिक हातभार उचलायचाय ? तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे . 

       मी अस्मिता खरात , Mission Study In America या हब ची Founder आणि USA Admission Facillitator . येत्या 5 वर्षात 1000 मुलांना अमेरिकेतील कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळवून देणे हा माझा ध्यास आहे. 

 अमेरिकेत शिक्षण घेत असताना कॉलेज कॅम्पस वर अनेक प्रकारे तुम्ही जॉब्स करू शकता .साधारणतः 7$ ते 15 $ तासाला असा पे असतो .  असतो .   इंटरनॅशनल स्टुडंट्स साठी आठवड्याला 20 तास पार्ट टाइम काम जिरण्याची परवानगी असते तर समर तसेच दोन सेमिस्टर्स मधील सुट्ट्यांमध्ये फुल्ल टाइम काम परवानगी असते . अर्थात या साठी तुम्हाला ऑफिशिअल गव्हर्मेंट परवाना घ्यावा लागतो . तर हे कॅम्पस जॉब्स कोणते असतात ते आपण या ब्लॉग मध्ये पाहुयात . 

1. कॅफेटेरिया जॉब्स : 



       कॉलेज कॅफेटेरिया मध्ये सर्वर , हेल्पर.  कॅशियर अश्या प्रकारचे जॉब्स कॉलेज स्टुएंट्स साठी उपलब्ध असतात . वेगवेगळ्या टाइम स्लॉट्स मध्ये ते उपलब्ध होत असल्याने तुमच्या सोयीनुसार तुम्ही ते करू शकता . तसेच तणावरहित काम  असल्याने तुम्ही ते एन्जॉय पण करू शकता आणि कॅम्पस लाईफ चा एक वेगळाच अनुभव मिळतो . 

2. IT support : 



         जर तुम्ही टेक्नो सॅव्ही असाल तर तुम्हाला लायब्ररी , ऑफिस,  कॉम्पुटर लॅब्स अश्याठिकाणी टेक्नो हेल्पर म्हणून जॉब मिळू  शकतो .  लायब्ररी मध्ये प्रिंटिंग अससिस्टन्स , IT डिपार्टमेंट मध्ये डेटा ऑपरेटर, कॉम्पुटर टेकनिशिअन अश्या सारखे जॉब्स उपलब्ध असतात . एक चांगला एक्सपेरियन्स म्हणून तुमच्या पुढच्या कॅरीरच्या दृष्टीने चांगला अनुभव ठरतो . 

3. कॅम्पस टूर गाईड : 



        ज्या विद्यार्थ्यांना लोकांशी बोलायला आवडत त्यांच्यासाठी हा खूप चांगला जॉब आहे. कॉलेज मध्ये ऍडमिशन घ्यायच्या आधी किंवा ओरिएंटेशन च्या वेळेस विद्यार्थी आणि पालक कॉलेज कॅम्पस पाहायला येतात . अश्यासाठी कॉलेज कॅम्पस टुर आयोजित करते . अश्या टूर्सचा गाईड म्हणून काम करण्याची विद्यार्थ्यांना संधी मिळते आणि काम करता करता अनेक मैत्र हि जोडता येतात . 

4. फिटनेस अससिस्टन्स : 



          प्रत्येक कॉलज मध्ये विद्यार्थ्यांसाठी जिम असतात . अश्या ठिकाणी फिटनेस अससिस्टन्स म्हणून विद्यार्थ्यांसाठी जॉब्स उपलब्ध असतात . ज्यांना फिटनेस राखण्यात इंटरेस्ट आहे त्यांना हि छानशी संधी असते . तसेच झुंबा , योगा , एरोबिक व्यायाम यात तुमच्या कडे सर्टिफिकेट असेल तर तुम्ही स्पेशल क्लासेस घेऊ शकता . याचबरोबर स्पोर्ट्स खेळात असाल तर स्पोर्ट्स अससिस्टन्स म्हणून जॉब्स असतात . तसेच वेगवेगळे स्पोर्ट्स चे इव्हेंट्स साठी हेल्पर्स च्या पोस्ट्स असतात . 

5. सोशल मीडिया मार्केटिंग : 



              प्रत्येक कॉलेजचे सोशल मीडिया अकाउंट तसेच वेबसाइट असते . ते हॅन्डल करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी जॉब्स उपलब्ध असतात . येथे कॉलेजचे मार्केटिंग केले जाते . जे विद्यार्थी मार्केटिंग मध्ये आहेत त्यांच्यासाठी हा एक्सपेरियन्स करियर साठी चांगला ठरतो .  

6 . लायब्ररी अससिस्टन्स : 



     कॉलेजमध्ये खूप मोठी लायब्ररी असते  व त्यात खूप सारी डिपार्टमेंटस . हि सर्व विद्यार्थ्यांच्या मदतीनेच चालविली जातात . येथे खूप प्रकारचे जॉब्स उपलब्ध असतात . फ्रंट डेस्क पर्सन , मेलिंग डिपार्टमेंट , stocking डिपार्टमेंट , बुक्स एंटरी , डेटा एंटरी  असे अनेक जॉब्स विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतात. तसेच अतिशय शांत असे तणाव विरहित वातावरण असते आणि फावल्यावेळात तुम्ही अभ्यासही करू शकता . 

7. हाय पेयिंग कॅम्पस  जॉब्स: 



           कॉलेज मध्ये दुसऱ्या सेमिस्टर पासून हे जॉब्स उपलब्ध होतात . टीचर अससिस्टन्स , ग्रॅज्युएट अससिस्टन्स , रिसर्च अससिस्टन्स म्हणून जॉब्स असतात . तुमच्या पहिल्या सेमिस्टर मधील ग्रेड आणि तुमच्या प्रोफेसर बरोबर असलेल्या कोऑर्डिनेशन मुळे हे जॉब्स मिळतात . याचा पे खूप जास्त असतो तसेच ट्युशन फी मध्ये  सवलत मिळते . याबद्दल सविस्तर आपण दुसऱ्या ब्लॉग मधून जाणून घेऊयात . 

            तर अश्या प्रकारचे अनेक जॉब्स कॅम्पस मध्ये उपलब्ध असतात . सेमिस्टर सुरु व्हायच्या आधीच त्याची माहिती कॅम्पस मध्ये फ्लायर वा सोशल मीडिया अकाउंट वर दिली जाते . तुम्ही कॉलेज करियर सेंटर मधून सुद्धा याची माहिती मिळवू शकता . 

       जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर like करा , share करा , कंमेंट करा . तुमचा अभिप्राय खूप महत्वाचा आहे . तुमचे काही प्रश्न असतील तर तेही कंमेंट बॉक्स मध्ये नोंदवा . या ब्लॉग खाली माझी youtube व कम्युनिटी ची लिंक देत आहे त्यावर क्लिक करून जॉईन व्हा . तेथे  तुम्हाला आणखीन रिसोर्सेस भेटतील .      

  https://youtu.be/PJIU8VXSKvc           

   https://www.facebook.com/groups/861601097705950/?ref=share    

           तर भेटूयात पुढच्या भागात .

                  धन्यवाद 🙏🏻           

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अमेरिकेतील शिक्षण संधी : भाग 13

अमेरिकेतील शिक्षण संधी :12

अमेरिकेतील शिक्षण संधी : भाग 10