अमेरिकेतील शिक्षण संधी : भाग 9
2021मध्ये कॉलेज ऍडमिशन प्रक्रियेमध्ये झालेले 3 बदल.
कोव्हीड मुळे सगळ्या जगात उलथापालथ झाली . अनेक गोष्टी बदलल्या . काही उद्यागधंदे बंद झाले तर काही ऑनलाईन आले. शाळा कॉलेजेस बंद झाले पण नवीन पद्धतीने ऑनलाईन शाळा सुरु झाल्या . अश्याच प्रकारचा बदल अमेरिकेतील कॉलेज ऍडमिशन पद्धतीतसुद्धा झाला. अनेक आव्हाने विद्यार्थ्यांसमोर सध्या आहेत . त्यासाठीच थोडा दिलासा म्हणून बर्याचश्या कॉलेजेसने त्यांच्या ऍडमिशन पद्धतीत काही बदल केले आहेत . तर हे बदल कोणते हे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवट पर्यंत वाचा .
मी अस्मिता खरात , Mission Study In America या हब ची Founder आणि USA Admission Facillitator . येत्या 5 वर्षात 1000 मुलांना अमेरिकेतील कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळवून देणे हा माझा ध्यास आहे .
आंतरराष्ट्रीय विध्यार्थ्यांना अमेरिकेत ऍडमिशन घ्यायचे असेल तर काही टेस्ट्स घ्याव्या लागतात . त्या टेस्ट्स मध्ये आवश्यक तो स्कोर असेल तरच ऍडमिशन मिळते . पण या वर्षी बऱ्याच कॉलेजेसने कोव्हीडमुळे ऍडमिशन प्रोसेस मध्ये थोडी शिथिलता आणली आहे . कोव्हीडमुळे जगभरातील बरीचशी टेस्ट सेंटर्स बंद आहेत हे त्या मागील मुख्य कारण . तर हे कोणते बदल आहेत हे आता पाहुयात .
1. स्टँडर्डईज्ड टेस्ट स्कोर घेणे रद्द :
2. इंग्लिश प्रोफेशिअन्सी टेस्ट स्कोर घेणे रद्द:
आपल्याकडे इंग्लिश हि सेकंडरी लँगवेज असल्यामुळे अमेरीकेतील युनिव्हर्सिटीज मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला इंग्लिश प्रोफिशिअन्सी टेस्ट घ्यावी लागते . या टेस्ट मुळे तुमची इंग्लिश बोलण्याची , लिहिण्याची , ऐकण्याची व वाचण्याची ऍबिलिटी टेस्ट केली जाते . पण कोव्हीडमुळे जगभरातील बरेचसे टेस्ट सेंटर्स बंद असल्याने काही काही कॉलेजेस ने या टेस्ट चे स्कोर waive केले आहेत . यामुळे तुमच्या पैशाची व वेळेची बचत होणार आहे .
3. इतर गोष्टी :
या वर्षी 2021 मध्ये ऍडमिशन प्रक्रिया खरंच वेगळी आहे . दरवर्षी या स्टँडर्डईज्ड टेस्ट्स , इंग्लिश प्रोफिशिअन्सी टेस्ट्स ऍडमिशन साठी महत्वाचे फॅक्टर्स आहेत . पण या वर्षी त्यामध्ये शिथिलता आल्यामुळे कॉलेज कुठल्या गोष्टी लक्षात घेणार हे पाहणे महत्वाचे ठरते. कॉलेजेस यावेळी इतरगोष्टीं बाबत सिलेक्टिव्ह असतील . ते तुमचा अकॅडेमिक एक्ससिल्लेन्स, एक्सट्राकरिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये तुम्ही किती बेस्ट असाल हे पाहिलं . त्याचबरोबर तुमचे पर्सनल स्टेटमेंट म्हणजेच essay खूप महत्वाचा आहे . त्यासाठी essay writing वर खूप काम करा , स्पेल्लिंग , ग्रामर व्यवस्थित असेल हे पहा . एक्स्पर्ट कडुन चेक करून घ्या. तेंव्हा Good Luck 👍
तर आता तुम्हाला समजले असेलच कि आता यावर्षी कॉलेजला apply करणे किती फायद्याचे आहे . जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर like करा , share करा , कंमेंट करा . तुमचा अभिप्राय खूप महत्वाचा आहे . तुमचे काही प्रश्न असतील तर तेही कंमेंट बॉक्स मध्ये नोंदवा . या ब्लॉग खाली माझी youtube व कम्युनिटी ची लिंक देत आहे त्यावर क्लिक करून जॉईन व्हा . तेथे तुम्हाला आणखीन रिसोर्सेस भेटतील .
https://www.facebook.com/groups/861601097705950/?ref=share
तर मग भेटूयात पुढच्या भागात . धन्यवाद 🙏🏻



Khupach chhan
उत्तर द्याहटवाThank you 🙏🏻
हटवाUseful blog 🙏🙏
उत्तर द्याहटवाThank you 🙏🏻
हटवाअस्मिता तुझ्या ब्लॉग मुळे अनेक विद्यार्थ्यांचे समस्या सुटतील खूप सुंदर लिहिला आहेस. अमेरिकेत किती छान शिक्षणाच्या संधी आहेत.God Bless You dear
उत्तर द्याहटवाThank you 🙏🏻
हटवाखूपच छान. च्या गोष्टी ची इन्फोर्मेशन मिळणे जरुरीच आहे त्या सर्व गोष्टी cover केल्याबद्दल Thank you🙏
उत्तर द्याहटवाThank you 🙏🏻
हटवाखूप छान माहिती
उत्तर द्याहटवा