अमेरिकेतील शिक्षण संधी : भाग 9

  2021मध्ये कॉलेज ऍडमिशन  प्रक्रियेमध्ये झालेले 3 बदल. 

       कोव्हीड मुळे सगळ्या जगात उलथापालथ झाली . अनेक गोष्टी बदलल्या . काही उद्यागधंदे बंद झाले तर काही ऑनलाईन आले. शाळा कॉलेजेस बंद झाले पण नवीन पद्धतीने ऑनलाईन शाळा सुरु झाल्या . अश्याच प्रकारचा बदल अमेरिकेतील कॉलेज ऍडमिशन पद्धतीतसुद्धा झाला. अनेक आव्हाने विद्यार्थ्यांसमोर सध्या आहेत . त्यासाठीच थोडा दिलासा म्हणून बर्याचश्या कॉलेजेसने त्यांच्या ऍडमिशन पद्धतीत काही बदल केले आहेत . तर हे बदल कोणते हे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवट पर्यंत वाचा . 

            मी अस्मिता खरात , Mission Study In America या हब ची Founder आणि USA Admission Facillitator . येत्या 5 वर्षात 1000 मुलांना अमेरिकेतील कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळवून देणे हा माझा ध्यास आहे . 

          आंतरराष्ट्रीय विध्यार्थ्यांना अमेरिकेत ऍडमिशन घ्यायचे असेल तर काही टेस्ट्स घ्याव्या लागतात . त्या टेस्ट्स मध्ये आवश्यक तो स्कोर असेल तरच ऍडमिशन मिळते . पण या वर्षी बऱ्याच कॉलेजेसने कोव्हीडमुळे ऍडमिशन प्रोसेस मध्ये थोडी शिथिलता आणली आहे . कोव्हीडमुळे जगभरातील बरीचशी टेस्ट सेंटर्स बंद आहेत हे त्या मागील  मुख्य कारण . तर हे कोणते बदल आहेत हे आता पाहुयात . 

1. स्टँडर्डईज्ड टेस्ट स्कोर घेणे रद्द :  



         आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना अमेरिकेतील युनिव्हर्सिटीज मध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल तर काही स्टँडर्डाइज टेस्ट घेणे आवश्यक आहे . परंतु कोव्हीड मुळे जगभरातील बरीचशी परीक्षाकेंद्र हि बंद आहेत . त्यामुळे बऱ्याच कॉलेजेस ने काही काही टेस्ट्स रद्द केले आहेत .  Undergraduate लेवल साथीच्या ऍडमिशन साठी  लागणारे SAT किंवा ACT टेस्ट्स चे स्कोर त्यांनी waive केले आहेत . ते नसले तरी चालतील . तसेच graduate लेवल ऍडमिशन साठी लागणारे GRE  स्कोर बऱ्याच कॉलेजेस ने waive केले आहेत . तर काहींनी सगळ्या कोर्से साठी waive न करता काही सिलेक्टिव्ह कोर्से साठी waive केले आहेत . इतकंच काय सगळ्यात डिमांडिंग अश्या MBA प्रोग्रॅम साठी पण आवश्यक असणारे GMAT सुद्धा काही कॉलेजेस ने waive केले आहेत . 
      तर काही कॉलेजेस ने कंडिशनल म्हणजेच आता ऍडमिशन घ्यायचे नंतर एक वर्षभरात त्या टेस्ट पास करायच्या अशी शिथिलता दिली आहे . 
     या शिथिलतेमुळे जे विद्यार्थी 2021 साली ऍडमिशन घेणार आहेत त्यांचा खूप प्रकारे फायदा होणार आहे. या टेस्ट्स च्या तयारीसाठी खूप वेळ लागतो आणि टेस्ट फी पण जास्त असते. तर तुमच्या वेळेची  आणि पैशांची बचत होणार आहे . 

  2. इंग्लिश प्रोफेशिअन्सी टेस्ट स्कोर घेणे रद्द: 


      आपल्याकडे इंग्लिश हि सेकंडरी लँगवेज असल्यामुळे अमेरीकेतील युनिव्हर्सिटीज मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला इंग्लिश प्रोफिशिअन्सी टेस्ट घ्यावी लागते . या टेस्ट मुळे तुमची इंग्लिश बोलण्याची , लिहिण्याची , ऐकण्याची व वाचण्याची ऍबिलिटी टेस्ट केली जाते . पण कोव्हीडमुळे जगभरातील बरेचसे टेस्ट सेंटर्स बंद असल्याने काही काही कॉलेजेस ने या टेस्ट चे स्कोर  waive केले आहेत .  यामुळे तुमच्या पैशाची व वेळेची बचत होणार आहे . 

3. इतर गोष्टी : 


     या वर्षी 2021 मध्ये ऍडमिशन प्रक्रिया खरंच वेगळी आहे . दरवर्षी या स्टँडर्डईज्ड टेस्ट्स , इंग्लिश प्रोफिशिअन्सी टेस्ट्स ऍडमिशन साठी महत्वाचे फॅक्टर्स आहेत . पण या वर्षी त्यामध्ये शिथिलता आल्यामुळे कॉलेज कुठल्या गोष्टी लक्षात घेणार हे पाहणे महत्वाचे ठरते. कॉलेजेस यावेळी इतरगोष्टीं बाबत सिलेक्टिव्ह असतील . ते तुमचा अकॅडेमिक एक्ससिल्लेन्स, एक्सट्राकरिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये तुम्ही किती बेस्ट असाल हे पाहिलं . त्याचबरोबर तुमचे पर्सनल स्टेटमेंट म्हणजेच essay खूप महत्वाचा आहे . त्यासाठी essay writing वर खूप काम करा , स्पेल्लिंग , ग्रामर व्यवस्थित असेल  हे पहा . एक्स्पर्ट कडुन चेक करून घ्या. तेंव्हा Good Luck 👍 

           तर आता तुम्हाला समजले असेलच कि आता यावर्षी कॉलेजला apply करणे किती फायद्याचे आहे .   जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर like करा , share करा , कंमेंट करा . तुमचा अभिप्राय खूप महत्वाचा आहे . तुमचे काही प्रश्न असतील तर तेही कंमेंट बॉक्स मध्ये नोंदवा . या ब्लॉग खाली माझी youtube व कम्युनिटी ची लिंक देत आहे त्यावर क्लिक करून जॉईन व्हा . तेथे  तुम्हाला आणखीन रिसोर्सेस भेटतील .      

  https://youtu.be/PJIU8VXSKvc           

   https://www.facebook.com/groups/861601097705950/?ref=share    

  तर मग भेटूयात पुढच्या भागात . धन्यवाद 🙏🏻

टिप्पण्या

  1. अस्मिता तुझ्या ब्लॉग मुळे अनेक विद्यार्थ्यांचे समस्या सुटतील खूप सुंदर लिहिला आहेस. अमेरिकेत किती छान शिक्षणाच्या संधी आहेत.God Bless You dear

    उत्तर द्याहटवा
  2. खूपच छान. च्या गोष्टी ची इन्फोर्मेशन मिळणे जरुरीच आहे त्या सर्व गोष्टी cover केल्याबद्दल Thank you🙏

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अमेरिकेतील शिक्षण संधी : भाग 13

अमेरिकेतील शिक्षण संधी :12

अमेरिकेतील शिक्षण संधी : भाग 10