अमेरिकेतील शिक्षण संधी : 14
मेजर आणि मायनर म्हणजे काय ?
माझी एक भाची अमेरिकेतील कॉलेज ऍडमिशन साठी तयारी करत होती . तेंव्हा तिला कॉलेज वेबसाईटवर मेजर मायनर यासारखे शब्द आढळले . ते म्हणजे नक्की काय समजून घेताना तिचा गोंधळ उडाला. अमेरिकेत कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतो तेंव्हा अनेक नवीन शब्द ऐकायला मिळतात . मेजर , मायनर , कॉन्सन्ट्रेशन . या शब्दांनी नक्कीच गोंधळ उडू शकतो . तर यांचा अर्थ , त्याचे फायदे काय ? असे अनेक प्रश्न तिच्यासारखेच तुम्हालाही पडू शकतात . तर या ब्लॉगमध्ये याबद्दल अधिक माहिती उलगडून दाखविली आहे . तेंव्हा हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा .
मी अस्मिता खरात , Mission Study In America या हब ची Founder आणि USA Admission Facillitator . येत्या 5 वर्षात 1000 मुलांना अमेरिकेतील कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळवून देणे हा माझा ध्यास आहे.
जेंव्हा कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळते , त्यावेळेस तुमची कॉलेज advisor बरोबर मीटिंग होते . या मीटिंग मध्ये तुम्हाला तुमचे मेजर, मायनर सिलेक्ट करायचे असतात. तर या टर्म्स काय आहेत हे आता पाहुयात .
मेजर :
उदाहरण द्यायचं झालं तर ..
मेजर इन बायोलॉजि
मेजर इन केमिकल इंजिनीरिंग
मेजर इन फायनान्स
मेजर इन मास कम्युनिकेशन
बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित असते कि त्यांना कशात मेजर करायचे आहे . पण काही विद्यार्थी असेही असतात कि त्यांचे नीट डिसिजन झालेले नसते , मग ते आपला मेजर बदलू शकतात . साधारण पहिल्या दोन वर्षात तुम्ही मेजर डिसाईड करणे आवश्यक असते . तसे नाही झाले तर मग डिग्री मिळायला एक दोन सेमिस्टर उशीर होतो तसेच ट्युशन फी आणि लिव्हींग खर्चही वाढतो .त्यासाठी योग्य वेळेत मेजर डिसाइड करणे आवश्यक असते . बरेचसे विद्यार्थी पहिल्या वर्षानंतर आपला मेजर बदलतात .
बऱ्याच युनिव्हर्सिटीज विद्यार्थ्यांना अनडिसायडेड मेजर घेण्याची संधी देतात जेणे करून स्टुडंट्स त्यांना नक्की काय करायचंय ते एक दोन वर्षात डिसाईड करू शकतात . पण काही युनिव्हर्सिटी मध्ये मात्र मेजर आधीच डिसाईड करणे आवश्यक असते .
मायनर :

मायनर म्हणजे तुमचा दुसरा शैक्षणिक पर्याय ज्यात तुम्हाला आवड असते किंवा जो तुमच्या मेजरला सपोर्ट करतो. मायनर घेणे हे ऑपशनल असते. मायनर घेण्यासाठी खूप कमी पण आवश्यक अश्या कोर्सेची requirement असते . यासाठी तुम्ही तुमच्या ऍडवायजर बरोबर बोलून तुमचा स्टडी प्लॅन करा म्हणजे वेळेमध्ये तुमची डिग्री कंप्लिट होईल .
खूपदा असे होते कि तुम्ही जे शिक्षण घेत असतो त्याबरोबरीने दुसऱ्याही काही गोष्टीमध्ये इंटरेस्ट असतो. अश्यावेळेस मायनर घेणे फायद्याचे ठरते . उदा. एखादया विद्यार्थ्याला त्याच्या मेजर बरोबरच चित्रकला , म्युझीक , डान्स या सारख्या गोष्टीमध्येही इंटरेस्ट असतो . तो हे विषय मायनर मध्ये घेऊन त्याचा आणखी अभ्यास करू शकतो .
कधी कधी आणखी एक्सट्रा सब्जेक्ट जे तुमच्या मेजर ला फायद्याचे ठरतील असेही मायनर तुम्ही घेऊ शकता . उदा . एखाद्या विद्यार्थ्याने बिजनेस हा मेजर घेतलाय तर त्याच्या जोडीला फायनान्स घेऊ शकतो .
काही पॉप्युलर मेजर मायनरची उदाहरणे पुढीलप्रमाणे :
लिटरेचर आणि म्युसिक
कॉम्पुटर सायन्स आणि ड्रॉईंग
बिझनेस आणि फायनान्स ,
बिझनेस आणि फॉरीन लँगवेज
ऍग्रीकल्चर आणि एनव्हायरमेंटल सायन्स
अश्या प्रकारचे मेजर मायनर घेतले तर ते फ्यूचरच्या दृष्टीने फायद्याचे ठरतात . जेंव्हा तुम्ही जॉब इंटरव्हिव साठी जाता तेंव्हा ते खूप इम्प्रेसिव्ह ठरत . तुमच्या एम्प्लॉयरला समजते कि तुम्ही एका पेक्षा जास्त कामाचा ट्रेस हाताळू शकता . मल्टिटास्किंग आहात. तसेच मायनरच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या छंदांना नेक्स्ट लेवलला नेऊ शकता . तर अश्यातर्हेने मायनर तुमच्या छंदाना वाव देते तसेच तुमच्या करिअरला फायदेशीर ठरतात .
आता तुम्हाला मेजर आणि मायनर म्हणजे नक्की काय हे समजलेच असेल. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर like करा , share करा , कंमेंट करा . तुमचा अभिप्राय खूप महत्वाचा आहे . तुमचे काही प्रश्न असतील तर तेही कंमेंट बॉक्स मध्ये नोंदवा . या ब्लॉग खाली माझी youtube व कम्युनिटी ची लिंक देत आहे त्यावर क्लिक करून जॉईन व्हा . तेथे तुम्हाला आणखीन रिसोर्सेस भेटतील .
https://www.facebook.com/groups/861601097705950/?ref=share
तर भेटूयात पुढच्या भागात .
धन्यवाद 🙏🏻


Excellent Information. Really important for Indian students as they are not exposed to this style of education. Keep it up.
उत्तर द्याहटवाThank you sir 🙏🏻
हटवाKhup chan mahiti.. Major and minor exactly kay aahe chan explain kele.
उत्तर द्याहटवाThank you Kalpna Mam
हटवाVery important for the students in india . Major minor concept great explaning blog. Keep writing 🙏🏻
उत्तर द्याहटवाThank you Bhakti
हटवाVery important for the students in india . Major minor concept great explaning blog. Keep writing 🙏🏻
उत्तर द्याहटवाThank you
हटवा