अमेरिकेतील शिक्षण संधी : भाग 10

अमेरिकेतील कॉलेज मधील सेमिस्टर टर्म्स विषयी जाणून घ्या 5 गोष्टी या ब्लॉग मधून. 



  अमेरिकेतील कॉलेज ऍडमिशन प्रक्रिया तशी गुंतागुंतीचीच पण तरीही फायदेशीरच आहे . फ्लेक्सिबल असल्या मुळे विद्यार्थ्यांची सोय हि महत्वाची ठरते . आपल्या इथे कॉलेज टर्म्स हि साधारण जून , जुलै मध्ये सुरु होतात व तेंव्हाच ऍडमिशन घेता येते, मध्येच  ऍडमिशन घेता येत नाही . पण अमेरिकेत मात्र वेगवेगळ्या दोन टर्म्स intake असतात व दोन्ही वेळेस ऍडमिशन घेता येते. त्याची आधीच माहिती असेल तर व्यवस्थित फायदा घेता येतो . तर या कोणत्या टर्म्स ते मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये सांगणार आहे तर हा ब्लॉग शेवट पर्यंत वाचा . 

        मी अस्मिता खरात , Mission Study In America या हब ची Founder आणि USA Admission Facillitator . येत्या 5 वर्षात 1000 मुलांना अमेरिकेतील कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळवून देणे हा माझा ध्यास आहे. 

          अमेरिकेतील सेमिस्टर सिस्टिम हि दोन सेशन्स मध्ये विभागलेली  असते . प्रत्येक सेमिस्टर हे साधारणतः 15 आठवड्यांचे असते . प्रत्येकामध्ये 4 ते 6 classes घेऊ शकतात व   दोन्ही च्या मध्ये समर आणि विंटर ब्रेक असतो . या बद्दल अधिक   माहिती विस्ताराने जाणून घ्या . 

1. Fall semester:



 हे साधारणतः ऑगस्ट एन्ड किंवा सप्टेंबर च्या फर्स्ट वीक मध्ये सुरु होते व डिसेंबर 15 पर्यंत संपते . यात तुम्ही 4 ते 6 classes घेऊ शकता . 

2. Spring semisters : 



    हे जानेवारी  मध्ये सुरु होते ते मे पर्यंत चालते . यातही तुम्ही 4 ते 6 पर्यंत classes घेऊ शकता . जर तुमचं fall मध्ये ऍडमिशन नाही झालं तर स्प्रिंग मधे घेऊन कोर्से चालू करता येतो . 

3. दोन वेळा ऍडमिशन होण्याची कारणे : 

       दरवर्षी हजारो स्टुडंट्स कॉलेजेस ला apply करतात त्यामुळे सगळ्याच मुलांना fall सेमिस्टर मध्ये सामावून घेणे कॉलेज ला शक्य नसते . मग उरलेल्याना स्प्रिंग मध्ये ऍडमिशन दिले जाते . 

   तर काही वेळा विद्यार्थ्यांना काही कारणानं मुळे  fall सेमिस्टरला apply करणे शक्य होत नाही . कधी फॅमिली issues असतात, कधी हेल्थ समस्या  , कुणाचा आर्थिक प्रॉब्लेम , तर कधी apply करायला उशीर होतो .  अश्या काही कारणांमुळे ज्यांना fall मध्ये apply करणे शक्य होत नाही ते स्प्रिंग सेमिस्टर ला apply  करतात .  

4. Fall  आणि Spring  सेमिस्टरचे तुलनात्मक फायदे तोटे : 

  a.  इंटरनॅशनल स्टुडंट्स ला ऍडमिशन च्या वेळेस खूपदा कागदपत्रांची पूर्तता करण्यास वेळ लागतो . त्यामुळे जर काही कारणाने फॉल मध्ये ऍडमिशन न झाल्यास स्प्रिंग मध्ये ऍडमिशन मिळते . त्यामुळे पूर्ण वर्ष वाया ना जाता कोर्से सुरु होतो . 

b. इंटरनॅशनल स्टुडंट्स एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर जॉब करू शकतात . Teaching assistant आणि  research assistant jobs वर्षभर मिळतात . पण समर जॉब्स करण्यासाठी फॉल मध्ये ऍडमिशन घेणार्यांना जास्त फायदा होतो . कारण फॉल पासून समर पर्यंत त्यांचे दोन सेमिस्टर्स पूर्ण होऊन एक वर्ष पूर्ण होते . त्यामुळे ते समर जॉब्स किंवा इंटर्नशिप करू शकतात. परंतु स्प्रिंग मध्ये ऍडमिशन घेतल्यास त्यांचे समर पर्यंत एकच  सेमिस्टर पूर्ण होते आणि त्यांना समर इंटर्नशिप साठी पुढच्या समर पर्यंत थांबावे लागते . तसेच समर मध्ये तुम्ही fulltime काम करून तुमची कमाई सुरु करू शकतात . त्यामुळे इथे fall मध्ये ऍडमिशन घेणे फायद्याचे ठरते . 

c. कॉलेजेस सगळे classes  स्प्रिंग मध्ये उपलब्ध करत नाही . विध्यार्थी संख्येवर पण ते अवलंबून असते . त्यामुळे spring मध्ये ऍडमिशन घेतल्यास हवे ते classes तुम्हाला मिळतीलच असे नाही . 

5. Summer सेमिस्टर  : 



            स्प्रिंग सेमिस्टर झाल्यावर जवळजवळ 3 महिन्याचा समर ब्रेक असतो . यात तुम्ही जॉब किंवा इंटर्नशिप करू शकता किंवा समर classes  घेऊन तुमचा course लवकर संपवू शकता . Summer 1 व समर 2 अश्या दोन पार्टस मध्ये समर सेमिस्टर विभागलेले असते . बरेचसे भारतीय विद्यार्थी हे जास्तीत जास्त classes घेऊन दोन वर्षाचा कोर्से दिड वर्षातच संपवतात  आणि इंटर्नशिप व इतर जॉब्स करून कमाई करू लागतात . 

     अश्या तर्हेने दोन सेमिस्टर intake असण्याचे काही फायदे काही तोटे आहेत . तर तुमच्यासाठी काय महत्वाचे आहे त्यानुसार तुम्ही त्या वेळेस ऍडमिशन घ्यायचा निर्णय घ्या. 

            जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर like करा , share करा , कंमेंट करा . तुमचा अभिप्राय खूप महत्वाचा आहे . तुमचे काही प्रश्न असतील तर तेही कंमेंट बॉक्स मध्ये नोंदवा . या ब्लॉग खाली माझी youtube व कम्युनिटी ची लिंक देत आहे त्यावर क्लिक करून जॉईन व्हा . तेथे  तुम्हाला आणखीन रिसोर्सेस भेटतील .      

  https://youtu.be/PJIU8VXSKvc           

   https://www.facebook.com/groups/861601097705950/?ref=share    

  तर मग भेटूयात पुढच्या भागात . धन्यवाद 🙏🏻








टिप्पण्या

  1. अस्मिता मस्त लेख पूर्ण वाचला उपयुक्त आहे

    उत्तर द्याहटवा
  2. परदेशी जाणारे विद्यार्थी साठी खुप चागली माहीती! धन्यवाद

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अमेरिकेतील शिक्षण संधी : भाग 13

अमेरिकेतील शिक्षण संधी :12