2021 वाटचाल यशपूर्तीकडे : भाग 2
विद्यार्थ्यांच्या जीवनात रिफ्लेक्टिव्ह थिंकिंगचे महत्व जाणून घ्या या 5 गोष्टीतून
2021 कडे वाटचाल करीत असताना नवीन वर्षासाठी संकल्प बनविण्याच्या दृष्टीने आधी आपली बेसिक कौशल्य कशी मजबूत करायची या दृष्टीने हा लेखन प्रपंच ! मागील भागात आपण ध्येय कशी ठरवायची यावर विचार केलात . यात तुम्ही ध्येय शोधण्यासाठी आत्मनिरीक्षण करणे हि पहिली पायरी आहे हे पहिले . तर या भागात आत्मनिरीक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या जीवनात रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग किती महत्वाचे आहे हे पाहुयात .
मी अस्मिता खरात , Mission Study In America या हब ची Founder आणि USA Admission Facillitator . येत्या 5 वर्षात 1000 मुलांना अमेरिकेतील कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळवून देणे हा माझा ध्यास आहे .
विद्यार्थ्यांच्या जीवनात यशपूर्तीसाठी रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग ला अनन्यसाधारण महत्व आहे . पण रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग म्हणजे काय ? ते कसे साध्य करायचे ? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील . तर या ब्लॉग मध्ये तुम्ही रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग बद्दल अधिक विस्ताराने पाहणार आहात .
.
रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग म्हणजे काय ?
आज तुम्ही नववर्षा निमित्त संकल्प करत आहात, म्हणजेच काय तुम्हाला तुमच्या आयुष्यात आज पेक्षा अधिक चांगले बदल हवे आहेत आणि त्यासाठी स्वतःचे आत्मपरीक्षण करणे जास्त महत्वाचे ठरते . या आत्मपरीक्षणात तुम्ही तुमच्या आधीच्या अनुभवांवरून शिकू शकता . तेंव्हा काय चुका झाल्या तुमच्या कडून , त्या टाळण्यासाठी काय करावे लागेल , अजून काय सुधारणा करता येतील या सारख्या प्रश्नांचे विवेचन करता येईल . यासाठी रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग उपयोगी ठरते . रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग तुम्हाला एक वास्तववादी दृष्टिकोन देते , परिस्थिती स्पष्ट करते, तसेच ठामपणे निर्णय घेऊन परिस्थिती बदलण्यासाठी आत्मविश्वास देते . सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमच्या अनुभवांचे रूपांतर आंतरिक दृष्टी मध्ये करते .
एक विद्यार्थी म्हणून रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग द्वारे तुम्ही केलेल्या चुका अथवा आलेले अपयश , चुकीचे घेतलेले निर्णय याचा आढावा घेऊ शकता. अपयश टाळण्यासाठी काय बदल केले जाऊ शकतात , वाईट सवयींच्या जागी कोणत्या चांगल्या सवयी अंगिकारू शकतो जेणेकरून अपयशाचा मार्ग यशाने भरून निघेल याचा विचार करू शकता . तुमच्या मनातील गोंधळाचे कारण शोधून काढू शकता आणि त्यावर ऍक्शन घेऊन तुमचे ठाम असे ध्येय ठरवू
5 पद्धती ज्याद्वारे तुम्ही रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग स्वतःमध्ये आत्मसात करू शकता :
1. खास वेळ काढा :
आत्मपरीक्षण करण्यासाठी एक ठराविक वेगळा वेळ काढणे आवश्यक आहे . त्याशिवाय रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग शक्य नाही . कारण आज मल्टि टास्किंगचा जमाना आहे , एकाच वेळेस अनेक गोष्टी डोक्यात चालू असतात. पण आत्मपरीक्षणाची हे योग्य नाही . त्यासाठी तुम्हाला एक शांत , निवांत असा वेळ काढावा लागेल . मग तो एखादा तास दिवसातून असेल व आठवडा , महिनाभरातुन एखादा ठराविक वेळ असेल . असा वेळ काढून शांतपणे सर्व गोष्टींचा आढावा घ्यायचा .
2. डिस्ट्रॅक्शन टाळा :
जेंव्हा तुम्ही आत्मपरीक्षण करायला बसाल तेंव्हा पूर्णपणे डिस्ट्रॅक्शन फ्री वातावरणात बसा . जिथे तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही . तसेच फोन , इतर इलेक्ट्रॉनिक मीडिया ज्याने लक्ष विचलित होईल ते सर्व लांब ठेवा . म्हणजे तुम्ही स्वतःवर फोकस करू शकाल . शक्यतो रोज पहाटे जेंव्हा सर्व झोपलेले असतील अथवा उशिरा रात्री शांत बसून आढावा घ्या .
3. आपलं प्लॅनर अथवा कॅलेंडर रेग्युलरली रिव्हिव करा :
हे खूप महत्वाचे आहे . जर आपण आपलं प्लॅनर , कॅलेंडर , गोल बुक , जर्नल किंवा प्रोग्रेस रिपोर्ट वेळोवेळी रिव्हिव केला कि आपल्याला समजतं कि तुमची प्रोग्रेस योग्य दिशेने होत आहे कि नाही . नसेल होत तर काय बदल आपल्यामध्ये करावे लागतील , कुठली हेल्प लागेल या सारख्या गोष्टींचा आढावा घेता येतो .
उदा. प्रोग्रेस रिपोर्ट वेळोवेळी पाहून आपल्या परफॉर्मन्स मध्ये वेळोवेळी प्रगती होत आहे कि नाही हे विद्यार्थ्यांना समजते .
4. स्वतःला योग्य प्रश्न विचारा :
प्रश्न मनामध्ये विचार प्रक्रियेला चालना देतात . यासाठी जेव्हाही तुम्ही आत्मपरीक्षणाला बसाल तेंव्हा स्वतःला प्रश्न विचारा , यातून तुम्हाला अनेक इनसाइट्स मिळतील . एखाद्या परिस्थिती मागील कारण जाणून घेण्यासाठी का , कसे , कश्यामुळे , काय करता येईल या सारखे अनेक प्रश्न त्या परिस्थिती चे उकलन करून देईल , सोल्युशन्स मिळवून देईल . त्या कडे बघण्याचा योग्य दृष्टीकोनही देईल .
उदा . विद्यार्थ्यांना हवे तसे यश मिळत नसेल तर त्यामागची कारणमीमांसा जाणून घेता येईल . काय बदल अभ्यास पद्धतीत वा वेळेच्या गुंतवणुकीत करता येईल याचा अंदाज येतो व त्याप्रमाणे आपल्या स्टडी प्लॅन मध्ये बदल करून प्रगतीपथावर पुन्हा जाता येईल .
5. विचार आणि कृती यांची सांगड घाला :
आत्मपरीक्षण करताना जे विचार तुमच्या मनात निर्माण झाले अथवा जी सोल्युशन्स तुम्हाला मिळाली त्यावर त्वरित ऍक्शन घेतली पाहिजे . अन्यथा ते विचार तेथेच विरून जाण्याची शक्यता असते . त्यासाठी योग्य ते प्लॅनिंग करून ते विचार लगेच कृतीत आणा .
उदा . विद्यार्थ्याला समजेल कि मला अजून जास्त वेळ बसून अभ्यास करायची गरज आहे , तर त्याप्रमाणे तो रोजच्या स्टडी अवर्स मध्ये लगेच वाढ करून अमलात आणण्याचा प्रयत्न करेल . जास्त वेळ इन्व्हेस्ट केलात तर अर्थातच रिजल्ट तुमच्या मना प्रमाणेच येईल आणि तुम्हाला हवे ते यश मिळेल .
अशातर्हेने रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग तुमच्या मनात डोकावून तुम्हाला विचारप्रवृत्त करते आणि तुमच्या ध्येय प्राप्तीच्या दृष्टीने एक पाऊल पुढे उचलते . तुमचे ध्येय ठरविण्या साठी तर हे एक पॉवरफुल टूल आहे . यासाठी रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग विचारांमध्ये बिंबवा आणि आपले ध्येय निश्चित करा .
जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर like करा , share करा , कंमेंट करा . तुमचा अभिप्राय खूप महत्वाचा आहे . तुमचे काही प्रश्न असतील तर तेही कंमेंट बॉक्स मध्ये नोंदवा . या ब्लॉग खाली माझी youtube व कम्युनिटी ची लिंक देत आहे त्यावर क्लिक करून जॉईन व्हा . तेथे तुम्हाला आणखीन रिसोर्सेस भेटतील .
https://www.facebook.com/groups/861601097705950/?
तर भेटूयात पुढच्या भागात . धन्यवाद 🙏🏻







Very informative
उत्तर द्याहटवाThank you.
हटवाखूप छान 👍
उत्तर द्याहटवाThank you
हटवाVery nice and focussed.... आत्मपरीक्षण जरुरी.
उत्तर द्याहटवाGood explanation
उत्तर द्याहटवाEvery body have to adopt this habit
Thank you.
हटवा