अमेरिकेतील शिक्षणाच्या संधी : भाग 7

                 या दोन गोष्टी तुम्हाला अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी मिळणाऱ्या  स्कॉलरशिप बद्दल माहिती देतील. 


  
        अमेरिकेतील शिक्षण संधी या सीरिजच्या सातव्या भागात तुमचे स्वागत आहे . मागील भागात तुम्ही कॉलेज अँप्लिकेशनसाठी लागणाऱ्या गोष्टी पहिल्या . आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि  स्कॉलरशिप कशा असतात ? त्या कशा शोधायच्या ? यासगळ्याचे उत्तर तुम्हाला या भागात मिळणार आहे . 
 
मी अस्मिता खरात Mission Study In America या हब ची founder आणि USA Facilitator.  येत्या 5 वर्षात 1000 विद्यार्थ्यांना  अमेरिकेतील विद्यापीठात ऍडमिशन मिळून देणे हा माझा ध्यास आहे .
 
       तर या भागात आपण कुठकुठल्या scholarships उपलबध असतात आणि त्या कुठे शोधायच्या हे पाहुयात . 
   
Types of scholarships : 

1. Need based scholarships: 
हि शिष्यवृत्ती मुख्यत्वा त्या विद्यर्थ्यांना दिली  जाते ज्यांच्या फॅमिलीचे  इनकम खूप कमी आहे आणि ज्यांच्याकडे उच्चशिक्षणासाठी काहीच फंडिंग उपलब्ध नसते . एक ठरविक उत्पन्न मर्यादेच्या आत उत्पन्न असणार्यांनाच हि संधी मिळू शकते. परंतु हि scholarship देताना विद्यार्थ्यांचा ऍकेडेमिक  प्रोग्रेस पाहून दिली जाते . 


 2 Merit based scholarships: 
हि scholarship निव्वळ मेरिट वर दिली जाते . यात फक्त academic नाही तर internship ,  शिकताना जर तुम्ही कुठल्या प्रोजेक्ट वर काम केले असेल तर , वर्क experience , पेपर्स किती पब्लिश झालेत , त्याची quality , इत्यादी पाहिलं जाते. तसेच समाजउपयोगी एकाद्या सामाजिक उपक्रमात असलेला तुमचा सहभाग. नुसते गुणच नाही तर अश्या अनेक गोष्टींचा विचार या scholarships साठी केला जातो. 

3 Special scholarships for Indian Students : 
जर विद्यार्थ्यांला एकाद्या special subject साठी स्टडी करायचा असेल तर या scholarships उपलब्ध असतात . उदा. एखादा स्पोर्ट्स त्यासाठी मिळते जशी टेनिस , फुटबॉल किंवा एखाद. मेडिकल फील्ड मधील specialization जसे  ओरल कॅन्सर , डिसॅबिलिटी इत्यादी . खास करून PhD साठी दिली जाते. 


 

Sources of scholarships:
या scholarships कुठून मिळतात व कोण देते हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचे हे उत्तर . हे पुढील रिसोर्सेस scholarships देतात. 

1.The Government
बहुतेक देशांचे सरकार बाहेरील देशातील विद्यार्थ्यांना scholarships देतात . त्याचप्रमाणे अमेरिका सरकारही भारतीय विद्यार्थ्यांना गुणवत्ते प्रमाणे शिष्यवृत्ती देते. 
याच प्रमाणे आपले. भारतीय केंद्र सरकार तसेच राज्य सरकार देखील कमी उत्त्पन्न गटातील विध्यार्थ्यांना तसेच अनुसूचित जाती जमाती , आदिवासी समाजातील हुशार मुलांना भरगोस शिष्यवृत्ती देते .  



2. Universities: 
जास्त करून scholarships या विद्यापीठांकडून पुरवल्या जातात . जवळ जवळ सगळीच अमेरिकेतील युनिव्ह्ररसिटीज भारतीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पुरवतात . तुम्हाला तुम्ही जिथे ऍडमिशन घेणार आहेत त्या विद्यापीठांच्या इंटरनॅशनल स्टुडन्ट सेंटर शी कॉन्टॅक्ट साधून याची माहिती मिळवू शकता . 




3. Big Corporate Companies
जगभरातील मोठ्या कंपन्या उदा. Google , Facebook हे परदेशातून येऊन शिक्षण घेणाऱ्या मुलांना शिष्यवृत्ती पुरवतात . खासकरून अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात संशोधन करणाऱ्या मुलांना याचा लाभ मिळू शकतो . 


4. Social organizations or trusts: 
अनेक मोठे व्यावसायिक , सोशिअल वर्कर्स एकत्र येऊन ट्रस्ट उभा करतात आणि त्यातून परदेशात जाऊन शिक्षण घेऊ इच्छिणार्यांना  शिष्यवृत्ती दिली 


5. Philanthropist: 
काही समाजसेवक , businessman स्वतः काही scholarships पुरवतात. त्या मिळवण्यासाठी प्रत्येकाचे काही निकष असतात . 



            आता तुम्हाला समजलं असेलच कि या scholarships कुठल्या असतात आणि कोण पुरवत . तरी सुद्धा योग्य त्या  scholarships शोधणे हे खूप वेळखाऊ काम असते. पण मला खात्री  आहे तुम्ही ते नक्की व्यवस्थित कराल . 
           जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर तो like करा, share करा आणि तुमचा अभिप्राय देखील नोंदवा . तुमचे काही प्रश्न असतील तर ते कंमेंट बॉक्स मध्ये नोंदवा . खाली माझी फेसबुकची लिंक देत  देत आहे त्या वर क्लिक करून ग्रुप वर जॉईन व्हा . युट्युब ची लिंकही दिली आहे ते subscribe करा. तिथे तुम्हाला आणखी sources मिळतील .  
           तर भेटूया पुढच्या भागात !  धन्यवाद 🙏🏻





टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अमेरिकेतील शिक्षण संधी : भाग 13

अमेरिकेतील शिक्षण संधी :12

अमेरिकेतील शिक्षण संधी : भाग 10