अमेरिकेतील शिक्षण संधी भाग - 5

 या 3 गोष्टी तुमच्या अमेरिकेतील युनिव्हर्सिटीमधील प्रवेशासाठी  निर्णायक ठरू  शकतात. 

               मागील भागात तुम्ही  अमेरिकेत कॉलेज मध्ये प्रवेशासाठी लागणाऱ्या 3 आवश्यक व महत्वाच्या गोष्टी पहिल्या . तेंव्हा GPA admission साठी किती महत्वाचा आहे हे तुमच्या लक्षात आले असेल . मग काही जण म्हणतील माझ्याकडे नाहीये इतका high GPA score , मग काय करायचं? मला  नाही वाटत मला प्रवेश मिळेल म्हणून . अशाच तर्हेने अनेक जण नाराज होतात आणि अमेरिकेत प्रवेश घ्यायचा विचारच सोडून देतात . पण तुम्हाला असे काहीच करायची गरज नाही . तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे मी देणार आहे . 

मी अस्मिता खरात Mission Study In America या हब ची founder आणि USA Admissions Facilitator . येत्या 5 वर्षांत 1000 मुलांना अमेरिकेतील विद्यापीठात प्रवेश मिळवून देणे हा माझा ध्यास आहे . यासाठी मी अमेरिकेतील शिक्षणाच्या संधी हि सिरीज सुरु केली आहे . 

तर तुम्हाला अमेरिकेतील विद्यापीठात ऍडमिशन घ्यायचा विचार सोडून  द्यायची काहीच गरज नाही . कारण येथील शिक्षण पद्धती हि खूप वेगळी आहे.आपल्या कडचे   कॉलेज प्रवेश हे फक्त गुणांच्या टक्केवारीवर अवलंबून असते . ज्याला जितके टक्के जास्त त्याचा प्रवेश निश्चित . परंतु अमेरिकेतील युनिव्हर्सिटीज मधील प्रवेश प्रक्रिया हि सरळसोट मार्कांवर आवलंबून नसते तर यात अनेक गोष्टींचा विचार केला जातो . शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आणखी काही गोष्टींचा विचार प्रवेश प्रक्रियेत केला जातो. मागच्या भागात सांगितल्या प्रमाणे GPA , TOEFL  score , कॉलेज टेस्ट या गोष्टी आवश्यक आहेच पण या गोष्टीं बरोबरच आणखीन काही गोष्टींचा सुद्धा विचार केला जातो .  या गोष्टी कोणत्या ते आपण पाहुयात . तर या पुढील 3 गोष्टी तुमच्या प्रवेशासाठी निर्णायक ठरू शकतात . 

1. Extra curricular activities:

 तुम्ही तुमच्या क्लास रूमच्या बाहेर काय करता यावरून तुमच्यात काय क्वालिटीज आहेत आणि तुम्ही तुमच्या बरोबर कुठल्या क्वालिटीज कॉलेजमध्ये घेऊन  येणार हे तुमच्या extracurricular ऍक्टिव्हिटी काय आहेत हे सांगते. 

Extracurricular activities मध्ये स्पोर्ट्स, छंद , community साठी केलेली समाजसेवा , अगदी तुम्ही शिकत असताना करत असलेला जॉब हे सुद्धा येते. कॉलेज पहाते कि  तुम्ही एखादा स्पोर्ट काही वर्षांपासून खेळत  आहेत का ? उदा. टेनिस, फ़ुटबाँल, क्रिकेट , ट्रॅक इ .  जर तुम्ही काही छंद जोपासले असतील. जसे चित्रकला, गायन इत्यादी . , किंवा तुम्ही तुमच्या community साठी काही समाजसेवा करत आहेत का अगदी रिलिजिअस सेवा सुद्धा बघतात. इतकाच काय तर शिक्षण घेत असताना जर तुम्ही पार्ट टाइम किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत जॉब करत असाल तर ते सुद्धा एक्सट्रा curricular ऍक्टिव्हिटीज मध्ये येते. 

यासाठी तुम्हाला एक किंवा दोन गोष्टीवर फोकस करून त्यातच काही वर्ष इन्व्हॉल्व्हमेंट आवश्यक आहे . म्हणजेच भराभर अनेक वेगवेगळ्या clubs , ऍक्टिव्हिटीज मध्ये गुंतून ऑल राउंडर बनण्याचा प्रयत्न करण्या पेक्षा एकदा दुसरा स्पोर्ट , छंद , समाजसेवेत तुम्ही प्राविण्य मिळावा . यातून कॉलेजला तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी किती प्याशनेट आहेत, तुमच्यातले नेतृत्व गुण , सामाजिक बांधिलकी हे समजेल . तसेच  कॉलेज ला समजेल कि तुम्ही एकाद्या गोष्टीत किती म्यॅच्युअर आणि रिस्पॉन्सिबल आहेत . अश्या गुणांनी युक्त व्यक्ती कॉलेज मधेही अशीच म्यॅच्युरिटी आणि रेस्पिन्सिबिलिटी दाखवतील अशी त्यांना खात्री असते. असे विद्यार्थी त्यांना त्यांच्या कॉलेज मध्ये हवे असतात . यामुळे तुमच्या एक्सट्रॅकररिकलर ऍक्टिव्हिटीज सुद्धा तुमच्या ऍडमिशन प्रोसेस मध्ये एक प्लस पॉईंट ठरू शकतो. 

2. College essay or writing sample



प्रत्येक युनिव्हर्सिटी अथवा कॉलेजच्या बेसिक ऍडमिशन requirements या वेगवेगळ्या असतात.  काही कॉलेजेसच्या ऍडमिशन प्रोसेस मध्ये essay लिहिणे कंपलसरी  असते तर काहीं मध्ये ते ऑपशनल असते तर काहींमध्ये त्याची आवश्यकता नसते. पण बरेचसे टॉप कॉलेजेस मध्ये essay लिहिणे आवश्यक असते.Essay मधून तुम्ही स्वतःला व्यक्त करता आणि तुमचे वेगळेपण दिसून येऊ शकते. यामुळे केवळ तुमचे लिहिण्याचे  कौशल्य  दिसत नाही तर ऍडमिशन कमिटीला तुमच्याबद्दल  अधिक जाणून घ्यायची संधी मिळते. 

          Essay writing तुमच्या ऍडमिशन प्रोसेस मध्ये खूप निर्णायक ठरू शकते. जेंव्हा खुपश्या अँप्लिकेन्ट्समध्ये शैक्षणिक गुणवत्तेमध्ये म्हणजेच मार्क्स मध्ये कट टू कट स्पर्धा असते अश्यावेळेस एक स्ट्रॉंग essay खूप महत्वाचा ठरतो. आणि त्या अँप्लिकेन्ट चे ऍडमिशन होते. अगदी बॉर्डर लाईन वर असलेल्या स्टुडन्ट साठी सुद्धा एक चांगल्या पद्धतीने लिहिलेला essay एक हुकमी एक्का ठरून त्याला ऍडमिशन मिळवून देऊ शकतो . पण त्याच बरोबर एक वाईट पद्धतीने लिहिला essay एखाद्या चांगली गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी घातक ठरू शकतो . त्यासाठी essay लिहिल्यावर तो खूपदा review करणे , स्पेल्लिंग चेक करणे आवश्यक असते. 

3. Recommendation letter


           बहुतेक कॉलेज मध्ये ऍडमिशन साठी recommendation लेटर आवश्यक असते . हे लेटर्स डायरेक्ट तुमच्या स्कूल कॉन्सलर्स आणि टीचर्स काढून मागविले जाते. हि लेटर्स स्कूल कडूनच इलेकट्रोनिकली युनिव्हर्सिटीजला पाठवले जाते.  हि लेटर्स जे टीचर्स आणि काउन्सेलर्स तुम्हाला व्यक्तिशः जाणतात , ज्यांना तुमच्यातले कौशल्य , तुमच्या अचिएव्हमेंट्स आणि पेर्सोनालिटी बद्दल माहिती असते त्यांच्याकडून मागविले जातात . 

या रेकंमेंडेशन letters ला पण एक value असते. कारण ते ऍडमिशन कमिटीला तुमच्याबद्दल अश्या गोष्टी सांगू शकते जे तुमचे शैक्षणिक ग्रेड्स सांगू शकत नाही . तुम्ही कोण आणि कशी व्यक्ती आहेत हे त्यांना समजते. 

               आता तुमच्या लक्षात आलेच असेल कि अमेरिकेत शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच तुमचे व्यक्तिमत्व , तुमच्यातील कलागुण , तुमची समाज , तुमची जीवनाकडे पाहण्याची वृत्ती या गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या आहेत आणि या गुणांना सुद्धा प्रवेश प्रक्रियेच्या वेळेस पुरेपूर  संधी दिली जाते . तेंव्हा प्रवेश ना घेण्याचा विचार सोडून द्या आणि तयारीला लागा ! 

               मी अस्मिता खरात तुमची USA Admissions Facilitator तुम्हाला मार्गदर्शन करायला नेहमी तत्पर आहे. तेंव्हा तुमचे काही प्रश्न असल्यास मला खाली कंमेंट मध्ये कळवा . तुम्हा हा भाग आवडला असल्यास तुमचा अभिप्राय नोंदवा ! Like करा , share करा. खाली माझ्या youtube आणि फेसबुक ची लिंक देत आहे त्याला कृपया subscribe  करा !!! 

https://www.facebook.com/groups/861601097705950/?ref=share


https://youtu.be/PJIU8VXSKvc


तर भेटूया पुढील भागात ! धन्यवा 🙏🏻



टिप्पण्या

  1. खूपच छान
    उपयुक्त मार्गदर्शन
    खूप मोठं काम करत आहात ताई

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अमेरिकेतील शिक्षण संधी : भाग 13

अमेरिकेतील शिक्षण संधी :12

अमेरिकेतील शिक्षण संधी : भाग 10