अमेरिकेतील शिक्षणाच्या संधी - भाग 1
अमेरिकेत शिक्षण : स्वप्न नव्हे सत्य
परेदशी शिक्षण हे बऱ्याच मुलांचे स्वप्न असते . त्यामध्ये जर अमेरिकेत हि शिक्षण घेण्याची संधी मिळाली तर सोने पे सुहागाचं . अनेकांना अमेरिकेचं आकर्षण असते . USA मध्ये जगातील सर्वाधिक इंटरनॅशनल स्टुडंट्स आढळतात . त्यातील बरेचसे हे उच्च शिक्षण घेणारे असतात. दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत आहे.
तुमचंही हेच स्वप्न आहे का ? अथवा एक पालक म्हणू. तुमच्या मुलांनी अमेरिकेत उच्च शिक्षण घ्यायला हवं अशी तुमची इच्छा आहे का ? पण तुम्हाला माहित नाही त्यासाठी काय करावे लागेल आणि माहितीच्या अभावी तुम्ही तो विचार येथेच सोडून देत आहेत का ? असे असेल तर जरा थांबा आणि हि लेखमाला नक्की वाचा !
मी अस्मिता खरात Mission Study In America या हब ची founder आणि USA Admissions Facilitator. तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून मी हा छोटासा प्रयत्न करत आहे. मी एक लेखमाला सुरु करत आहे ज्यात मी अमेरिकेत शिक्षणासाठी येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करणार आहे . मला खात्री आहे तुम्हाला हि नक्की उपयोगी पडेल.
बऱ्याचदा असे होते कि तुम्हाला यासंदर्भात फारशी माहिती नसल्यामुळे तुम्ही तो मार्ग स्वीकारताच नाही, तर कधी कधी तुमच्यातील न्यूनगंड मुळे तो मार्ग अश्यक्यप्राय वाटतो , ते फारच महागडं प्रकरण असेल म्हणून आपण त्या वाटेकडे जाताच नाही . परंतु योग्य माहिती आणि आर्थिक पाठबळ कसे जमवता येईल हे जर माहित झालं तर नक्कीच याचा अनेक जण लाभ घेतील.
अमेरिकेतील शिक्षण हे महागडं तर आहेच पण उच्चशिक्षणासाठी जर तुम्हाला काही इंटर्नशिप , फेलोशिप यासारख्या संधी शिक्षण घेत असताना मिळाल्या तर खूप अर्थाने तुम्हाला आर्थिक हातभार लाभू शकतो . परंतु या गोष्टींची माहिती नसल्याने आपण विचार सोडून देतो . त्या साठी हि लेखमाला सुरु करण्याचा मानस .
या लेखमालेत तुम्हाला अमेरिकेतील शिक्षण पद्धत , आपल्यासाठी उपलब्ध संधीं आणि त्यासाठी काय करावे, कसे करावे लागेल , केंव्हा करावे लागेल याचा आढावा घेतला जाईल. जर योग्य वयात तुम्हाला हे मार्गदर्शन मिळाले तर निश्चितच आधीपासून तुम्ही त्या साठी तयारी करायला लागलं , तुमची आर्थिक गणिते जुळवाल आणि एक दिवस नक्कीच तुमचं अमेरिकेतील शिक्षणाचं स्वप्न पूर्ण कराल हि आशा आहे.
जर तुम्हाला हा लेख आवडला तर आपला अभिप्राय कळवा. हा ब्लॉग like करा , share करा . येथे खाली माझ्या फेसबुक आणि युट्युब ची लिंक देत आहे त्यावर क्लिक करून जॉईन व्हा , subscribe आणि like करा. तेथे तुम्हाला या विषयावर आणखीन माहिती मिळेल . आपला अभिप्राय खूप महत्वाचा आहे. धन्यवाद !
https://www.facebook.com/groups/861601097705950/?ref=share
तर भेटूयात पुढच्या भागात !

Nice intro
उत्तर द्याहटवाThank you 🙏🏻
हटवाNice article for parents and students looking for higher education in USA.
उत्तर द्याहटवाThank you
उत्तर द्याहटवाVery nice intro keep it up
उत्तर द्याहटवाThank you Mam.
हटवाVery nice Mam
उत्तर द्याहटवाTyping mistake zaleli ahe sudharna Kara.
Thank you lakshat Annu dilya baddal. Check karate.
हटवाGrate. ..
उत्तर द्याहटवाThank you
हटवाHelpful article
उत्तर द्याहटवाThank you 🙏🏻
हटवाAsmita khupch important topic ,best wishes 🎉
उत्तर द्याहटवाWaiting for next 🤝
Thank you 🙏🏻
हटवाखुप छान आहे ब्लाॅग 👌
उत्तर द्याहटवा