अमेरिकेतील शिक्षण संधी - भाग 3
चला जाणून घेऊया अमेरिकन उच्चशिक्षणाचे 3 स्तर
मागील भागात तुम्ही अमेरिकेत शिक्षण घेणे तुमच्या करियरच्या दृष्टीने कसे फायदेशीर आहे हे पहिले. आता अमेरिकन शिक्षणाचे ढोबळ स्वरूप पाहणार आहोत . तुम्हाला माहित आहे का अमेरिकेतील उच्चशिक्षण किती विभागात विभागलेले आहे? तुम्हाला undergraduate आणि graduate लेव्हलमधील फरक माहित आहे का ? तुम्हाला माहित आहे का तुम्हाला नक्की कोणत्या लेव्हलला ऍडमिशन घ्यायचे आहे? जर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे ठामपणे माहित नसतील तर हा ब्लॉग नक्की वाचा .
मी अस्मिता खरात Mission Study In America या हब ची Founder आणि USA Admissions Facilitator . मला येत्या 5 वर्षात 1000 मुलांना अमेरिकन युनिव्हर्सिटीज मध्ये प्रवेश मिळवून द्यायचा आहे . मी तुमच्यासाठी USA ऍडमिशन प्रोसेसवर एक सिरीज आणली आहे .
अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घ्यायच्या आधी तुम्हाला हे माहित हवे कि नक्की कुठल्या लेवल प्रवेश घ्यायचाय अन्यथा फॉर्म्स भरताना undergraduate आणि graduate लेवल मध्ये गोंधळ होऊन चुकीचा पर्याय निवडला तर अँप्लिकेशन फीस आणि तुमचा वेळ वाया जाण्याची शक्यता असते . त्यासाठी हे माहित करून घेणे आवश्यक ठरते. तर या भागात मी तुम्हाला अमेरिकन शालेय शिक्षण व्यवस्थेचे ढोबळ स्वरूप ( किंडरगार्डन ते 12 वी ) आणि उच्च शिक्षणाच्या 3 स्तरांची माहिती देणार आहे .
अमेरिकेतील शालेय शिक्षणाचे ढोबळ स्वरूप (K-12 )
या विभागात किंडरगार्डेन पासून 12 वि पर्यन्त शिक्षण मिळते . हे शिक्षण पूर्णपणे मोफत असते . लोकांच्या टॅक्स मधून या शाळा चालतात. या लेवल मध्ये शिक्षण हे प्रत्येक मुलाला कंपलसरी असते. No child left behind हे त्यांच्या एजुकेशन सिस्टिम चे तत्व आहे. त्यामुळे कोणतेही मुल कोणत्याही कारणामुळे शाळा सोडू शकत नाही . तसे झाल्यास पालकांवर कोर्ट केस होऊ शकते. साधारणतः वयाच्या 16 ते 18 वया दरम्यान पर्यंत हा नियम लागू होतो . अगदी दिव्यांग विकलांग मुलांबाबत सुद्धा हा नियम आहे. त्यांच्यासाठी खूप सोयी उपलब्ध असतात आणि त्यांना सर्वांसाठीच्या शाळेतच सामावले जाते. वेगळ्या अशा शाळा नसतात त्यांच्यासाठी पण खूप काळजी घेतली जाते प्रत्येकाची .
K - 12 हा विभाग 3 भागात विभागाला जातो . पहिला असतो एलिमेंटरी लेवल, यात किंडरगार्डेन पासून 5वि पर्यंतची मुले असतात . वयाच्या साधारण 6 व्या वर्षी मुलांची शाळा सुरु होते . तर पहा हा फरक आहे आपल्या शिक्षण पद्धतीत आणि यांच्यात . आपल्याकडे मुल अडीच तीन वर्षाचे होत नाहीतो ऍडमिशन साठी घाई सुरु होते . तर असो . दुसरा विभाग हा मिडल स्कूल अथवा जुनिअर हायस्कूल म्हणून ओळखले जाते . यात इयत्ता 6वि ते 8 वि पर्यत चे वर्ग असतात . तिसरा विभाग हा हायस्कूल म्हणून ओळखला जातो . इयत्ता 9 वि ते 12 वि हि चार वर्ष highschool ची असतात. हि चारही वर्ष कॉलेज ऍडमिशन च्या दृष्टीने खूप महत्वाची ठरतात . या चारही वर्षांत मिळणारे गूण एकत्रितरित्या मोजले जाऊन त्यावर तुमचा GPA काढतात . हा GPA तुमच्या college ऍडमिशन साठी महत्वाचा ठरतो. हायस्कूल पास झाल्यावर तुम्हाला डिप्लोमा मिळतो .
K-12 या वर्गात ऍडमिशन घेणारे इंटरनॅशनल विद्यार्थी हे साधारणतः त्यांच्या पेरेंट्स बरोबर नोकरी निम्मिताने आलेले असतात. यांचे ऍडमिशन खूप सोपे होते कारण No Child Left Behind रूल मुळे प्रत्येकाला ऍडमिशन द्यावेच लागते.
U.S . हायर एजुकेशन सिस्टिम : यात 3 लेव्हल्स असतात .
फर्स्ट लेवल : UNDERGRADUATE level / बॅचलर डिग्री -
12 वि झाल्या नंतर undergraduate लेवल ला कॉलेज अथवा युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश मिळतो . यासाठी GPA आणि कॉलेज एंटरन्स एक्सामचा score महत्वाचा ठरतो . प्रत्येक कॉलेजचा acceptance score वेगवेगळा असतो . या गोष्टी आपण नंतर डिटेल मध्ये पाहुयात .
Undergraduate कोर्से हा 4 वर्षाचा असतो . तो पूर्ण केल्यानंतर तुम्हाला bachelor’s डिग्री भेटते. आपल्या इथे जसे 12 वी झाल्यावर डायरेक्ट मेडिकल अथवा law प्रवेश मिळतो तसे येथे नसते. येथे मेडिकल अथवा law कोर्स करण्याआधी 4वर्षाची बॅचलर डिग्री मिळवावी लागते. यातील दोन वर्षामध्ये तुम्हाला काही आवश्यक classes पूर्ण करावे लागतात जसे literature , शाश्त्र , social स्टडी , आर्टस् , इतिहास . यामध्येही निवडीसाठी भरपूर चॉईस असतो. या दोन वर्षात तुमचे फौंडेशन हे पुढील अभ्यासक्रमासाठी चांगलं बनते. खूप विद्यार्थी हे दोन वर्ष community कॉलेज मध्ये पूर्ण करतात कारण ते आर्थिकदृष्टया स्वस्त पडते . पुढील दोन वर्ष तुम्ही तुमचा मेजर कोर्से करता ज्यात तुम्हाला डिग्री भेटते. अमेरिकेतील उच्च शिक्षण हे लवचिक असल्याने तुम्ही अनेक वेळा तुमचा मेजर बदलू शकता.
सेकंड लेवल : ग्रॅजुएट लेवल फॉर मास्टर्स डिग्री
जर तुम्हाला तुमच्या करियर मध्ये अजून पुढे जायचं असेल तर मास्टर्स ग्रॅजुएट डिग्री प्रोग्रॅम ला प्रवेश घ्यावा लागतो. हा प्रोग्रॅम एक अथवा दोन वर्षाचा असू शकतो . MBA प्रोग्रॅम हा खूप पॉप्युलर असून दोन वर्षाचा असतो. तर जर्नालिसम , लायब्ररी सायन्स सारखे प्रोग्रॅम एक वर्षाचे असतात. हे प्रोग्रॅम्स मध्ये विद्यार्थाना एक मोठा शोधनिबंध म्हणजेच मास्टर्स थिसीस लिहावा लागतो किंवा एखादा मास्टर्स प्रोजेक्ट पूर्ण करावा लागतो.
थर्ड लेव्हल : ग्रॅजुएट इन डॉक्टरेट डिग्री
बऱ्याच ग्रॅजुएट स्कूल्स मध्ये डॉक्टरेट करण्यासाठी मास्टर्स डिग्री असणे आवश्यक असते , पण काही कॉलेजेस मध्ये डायरेक्ट डॉक्टरेट प्रोग्रॅमला सुद्धा ऍडमिशन मिळू शकते जरी तुम्ही मास्टर्स केले नसेल तरीही . हा प्रोग्रॅम तीन ते सहा वर्षाचा असतो जेथे तुम्हाला एकाच वेळेस मास्टर्स आणि डॉक्टरेट डिग्री मिळू शकते .
डॉक्टरेट मध्ये जास्त करून सेमिनार्स , रिसर्च , थिसीस रायटिंग वर भर असतो . तुम्हाला तुमचे स्वतःचे रिसर्च पेपर पब्लिश करावे लागतात जे कधी आधी पब्लिश झाले नसतील अश्या विषयांवर .
भारतातून येणारे बहुतांश विद्यार्थी हे मास्टर्स आणि डॉक्टरेट डिग्री प्रोग्रॅमला प्रवेश घेतात . इंटरनॅशनल विद्यार्थी म्हणून इथे प्रवेश करण्यासाठी काही प्रवेश परीक्षा असतात तसेच काही आवश्यक गोष्टींची पूर्तता करावी लागते . त्या गोष्टी कोणत्या आहेत हे आपण पुढील भागात पाहू यात .
आता मला खात्री आहे कि तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळाली असतील . जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर तुमचा अभिप्राय नक्की कळवा . तुम्ही like किंवा share करू शकता . या site वर तुम्हाला माझे आधीचे भागही वाचायला मिळतील . येथे खाली माझ्या. फेसबुक ग्रुप आणि youtube ची लिंक देत आहे त्यावर क्लिक करून ग्रुप जॉईन करा , subscribe करा . धन्यवाद 🙏🏻
https://www.facebook.com/groups/861601097705950/?ref=share
तर भेटूया पुढील भागात ! !!!!





खूपच चांगल्या पद्धतीने माहिती दिलीत.
उत्तर द्याहटवाथँक यु
हटवाExcellent Asmita
उत्तर द्याहटवाThank you
हटवाExcellent Asmita
उत्तर द्याहटवाखूप छान मार्गदर्शन
उत्तर द्याहटवाThank you
हटवा