अमेरिकेतील शिक्षणाच्या संधी - भाग 2
7 कारणे तुम्ही अमेरिकेत शिक्षण का घ्यावे ?
जगामध्ये आणखीनही काही देश आहेत जिथे शिक्षणासाठी विद्यार्थी जातात मग अमेरिकाच का? असे काय आहे अमेरिकन शिक्षण पद्धतीत कि तुम्ही इतर ठिकाण सोडून अमेरिकेची निवड करत आहेत ?या तुमच्या प्रश्नांची उत्तरे मी घेऊन आली आहे.
मी अस्मिता खरात Mission Study In America या हब ची founder आणि USA Admission Facilitator . मला येत्या 5 वर्षात 1000 मुलांना अमेरिकन युनिव्हर्सिटीज मध्ये प्रवेश मिळवून द्यायचा आहे .
इंटरनॅशनल स्टुडन्ट म्हणून प्रवेश करण्याच्या आधी तुम्हाला हे माहित हवं कि तुम्हाला तिथे काय दर्जाच्या सेवा मिळणार आहे. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या भागात मिळणार आहे . इथे मी एकूण 7 कारणे देत आहेत जे तुमचा अमेरिकेत शिक्षण घेण्याचा निर्णय अजून दृढ करणार आहे.
1. उत्तम अभ्यासक्रम :-
अमेरिकन डिग्री हि जगातील सर्वोत्तम डिग्री म्हणून ओळखली जाते. अतिशय उत्तम अश्या युनिव्हर्सिटी आणि त्यांचे डिग्री प्रोग्रॅम जवळ जवळ सर्वच क्षेत्रात आहेत. त्यांच्या unergraduate लेवल अभ्यासक्रमात पारंपरिक शिक्षणपद्धतीबरोबरच प्रोफेशनल प्रोग्रॅम्स उपलब्ध आहेत. तसेच graduate लेव्हल अभ्यासक्रमात पारंपरिक अभ्यासक्रमाबरोबरच डायरेक्ट त्या क्षेत्रात काम करून अनुभव मिळवण्याची संधी उपलब्ध असते. तसेच त्या क्षेत्रातील दिग्गजां बरोबर संशोधनाची संधी मिळू शकते.
2. शिक्षणाच्या विविध संधी : -
एकट्या US मध्ये हजारो कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीज आहेत . काही कॉलेजेस पारंपरिक शैक्षणिक तत्वांवर भर देतात तर काही प्रॅक्टिकल्स , नोकरीच्या अनुषंगाने उपयोगी येणाऱ्या स्किल्स वर भर देतात ; तर काही कॉलेजेस आर्टस् , सायन्स अथवा टेक्निकल फील्ड वर भर देतात . याचाच अर्थ असा कि तुम्ही कुठल्याही क्षेत्रात अभ्यास करायचे ठरवले असेल तर तुमच्या समोर त्या क्षेत्रातील अनेक विविध प्रोग्रॅम्स उपलब्ध आहेत निवड करण्यासाठी .
3. टेकनॉलॉजिचा वापर :-
अमेरिकन युनिव्हर्सिटीज टेकनॉलॉजि वापरण्या मध्ये अग्रेसर आहेत. तेथील विद्यार्थ्यांना संशोधनासाठी हायटेक टेकनॉलॉजि , संशोधन साधने, रिसोर्सस उपलब्ध आहेत . जरी तुम्ही सायन्स आणि इंजिनीरिंग मधील विध्यार्थी नसाल तरीही तुमचे संशोधन हे. लेटेस्ट टेकनॉलॉजिचा वापर करून शिकण्याची संधी तुम्हाला मिळते. तसेच जगभरातील तुमच्या क्षेत्रातील तज्ज्ञ , शिक्षक , संशोधक यांच्याशी. तुम्हाला जोडून घेण्याचा मार्ग भेटतो.
4. संशोधन, शिक्षक तसेच ट्रैनिंग च्या संधी :-
जर तुम्ही graduate लेवल चे विध्यार्थी असाल तर तुम्हाला शिकता शिकताच टीचिंगचा अथवा संशोधनाच्या संधी मिळू शकतात . त्यातून तुम्हाला आर्थिक मदत सुद्धा होऊ शकते . तुम्हाला तुमच्या फील्ड मध्ये टीचर्स असिस्टन्स रिसर्च असिस्टन्स म्हणून एकाद्या स्पेशिअल प्रोजेक्ट वर काम करून पैसे मिळविण्याची संधी मिळते. हा अनुभव तुमच्या भावी करिअर च्या दृष्टीने खूप उपयोगी ठरतो . हा अनुभव नुसते शिक्षण घेण्यापेक्षा एकाद्या क्षेत्रातील सखोल ज्ञान मिळण्यासारखे मौलिक आहे .
5. लवचिक अभ्यासक्रम :-.
हा अमेरिकेतील अभ्यासक्रमातील सर्वात चांगला आणि सोयीस्कर भाग आहे . येथील प्रत्येक अभ्यासक्रम हा व्यवस्थित आखलेला असतो आणि प्रत्येकाच्या काही ठराविक रिक्वायरमेंट्स असतात . तरीही त्या रिक्वायरमेंट्स पूर्ण करण्यासाठी खूप सारे कोर्सेसचे पर्याय उपलब्ध असतात . त्यातून तुम्ही तुमच्या आवडी नुसार कोर्सेस निवडू शकता. खासकरून undergraduate लेवल वर खूप लवचिकता असते.
6. आंतरराष्ट्रीय स्टुडंट्स साठी सपोर्ट सर्विस :-
प्रत्येक कॉलेज , युनिव्हर्सिटी मध्ये इंटरनॅशनल स्टुडन्ट ऑफिस असते . या ऑफिस चे उद्दिष्ट हे इंटरनॅशनल स्टुडंट्स ला मदत करणे हे असते . अमेरिकेत शिक्षण घेणे. हा खूप मोठा अनुभव आहे. येथे येणाऱ्या स्टुडंट्स साठी शैक्षणिक आणि सांस्कृतिक वातावरणामध्ये खूप तफावत असते. हि तफावत दूर करण्यासही अथवा येथील गोष्टीशी जुळवून घेण्यासाठी हि सपोर्ट सर्विस खूप उपयोगी ठरते. अनेक बाबतीत ते विद्यार्थ्यांची मदत करतात. उदा . काही प्रश्न जसे व्हिसा स्टॅटस , finantial situation , हौसिंग, कॅम्पस ची ओळख , हेल्थ चे प्रश्न, नोकरीच्या संधी इत्यादी ...
7. ग्लोबल एजुकेशन आणि करियर च्या संधी :-
परदेशी शिक्षणाचा अनुभव हा एक हुकमाचा एक्का असतो नोकरी शोधण्यासाठी . नोकरी देणाऱ्या कंपन्या या ज्ञान , अनुभव. अश्या अनेक गुणांच्या शोधात असतात जे अमेरिकेत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यां मध्ये आढळते. US मधील कंपन्या देखील असे एम्प्लॉयीस शोधतात कि जे फक्त वेगवेगळ्या भाषाच नाही तर वेगवेगळ्या कल्चर मध्ये त्यांचा बिसनेस वाढवतील . केवळ अमेरिकेतीलच नाही तर अनेक इंटरनॅशनल कंपन्या स्ट्रॉंग इंटरनॅशनल graduate स्टुडंट्स शोधात असतात . म्हणून जर दूरचा विचार केला तर अमेरिकेत शिक्षण घेणे खूप फायद्याचे आहे . खूप मागणी असते त्यांना.
मला आता खात्री आहे कि हे सर्व वाचल्यावर तुम्हाला अमेरिकेत शिक्षण घेणे का व कसे फायदेशीर आहे हे समजले असेलच . मला वाटत तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील . आता पुढच्या भागात. आपण अमेरिकेतील शिक्षणाचे स्वरूप कसे असते हे पाहू यात . जर हा लेख आपल्याला आवडला तर like आणि comment करा. आपला अभिप्राय खूप महत्वाचा आहे . धन्यवाद !!!
https://www.facebook.com/groups/861601097705950/?ref=share
तर भेटू या आता पुढल्या भागात !







Great..,.. Please let me send all notes and all blogs. Thank you and have a great day.
उत्तर द्याहटवाSure sir . I will.
हटवाhttps://guidetostudyinamerica.blogspot.com/2020/08/3.html?m=1
हटवाhttps://guidetostudyinamerica.blogspot.com/2020/08/4.html?m=1
हटवामस्तच अस्मिता. ..
उत्तर द्याहटवाThank you
हटवाNice information madam! Keep posting!
उत्तर द्याहटवाThank you 🙏🏻
हटवाखूप छान. अनेकांना या blog चा फायदा होईल
उत्तर द्याहटवाThank you Mrunal
हटवाMast tai.. Attractive topic. .
उत्तर द्याहटवाThank you Swati
हटवाKhupch chan
उत्तर द्याहटवाThank you 🙏🏻
हटवाKhupach chhan
उत्तर द्याहटवाBest information
उत्तर द्याहटवाThank you
हटवाNice insights
उत्तर द्याहटवाखूप छान very nice
उत्तर द्याहटवाThank you Maya
हटवाVery important information to make one strong to get educated in USA...very useful,Mam!u keep reader curious for ur next jotting.very nice👌
उत्तर द्याहटवा